Raksha Bandhan 2022 : लाडक्या बहिणीसाठी रक्षाबंधनाला गिफ्ट घ्यायचंय? मग भावांसाठी 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन्स
Raksha Bandhan 2022 Gift : या रक्षाबंधनाला तुम्हाला सुद्धा तुमच्या बहिणीला खास गिफ्ट देऊन खुश करायचं असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी काही खास गिफ्ट ऑप्शन्स घेऊन आलो आहोत.
Raksha Bandhan 2022 Gift : बघता बघता रक्षाबंधनचा सण अवघ्या एक दिवसांवर येऊन ठेपला आहे. भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा असा हा सण. या निमित्ताने बहिण भावाला राखी बांधते तर भाऊ बहिणीला छानसं गिफ्ट देतो. वर्षातून एकदा येणाऱ्या या दिवसाची प्रत्येक बहिण आतुरतेने वाट बघत असते. तर, या रक्षाबंधनाला तुम्हाला सुद्धा तुमच्या बहिणीला खास गिफ्ट देऊन खुश करायचं असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी काही खास गिफ्ट ऑप्शन्स घेऊन आलो आहोत. जे पाहून तुमच्या बहिणीच्या चेहऱ्यावर नक्कीच आनंद दिसेल. तर हे गिफ्ट्स नेमके कोणते? चला जाणून घेऊयात.
1. Smartwatch :
तुमची बहिण जर तिच्या फिटनेसची काळजी घेत असेल तर तिच्या फिटनेससाठी स्मार्टवॉच हा सर्वोत्तम पर्याय आहे. उत्तम स्मार्टवॉच दोन ते तीन हजारात बाजारात उपलब्ध आहेत. हे स्मार्टवॉच एका चार्जमध्ये पाच ते सात दिवसांचा बॅकअप देते. याशिवाय, तुम्हाला यामध्ये बीपी, हार्टबीट, स्टेप काउंट आणि ब्लड ऑक्सिजन मोजणे यांसारखी विशेष फीचर्स देखील मिळतील.
2. Headphone :
गाणं ऐकायला कोणालाही आवडतं. तुमची बहिण देखील गाणं ऐकण्याची शौकीन असेल तर तुम्ही तिच्यासाठी चांगल्या दर्जाचे हेडफोन गिफ्ट नक्कीच करू शकता. रक्षाबंधनाला भेटवस्तू देण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. हे हेडफोन स्टायलिश फोल्डेबल डिझाईनसह येतात जे खूपच आरामदायी आहेत. यामध्ये तुम्हाला सुमारे 10 तासांचा प्लेबॅक टाईम मिळतो.
3. Power Bank :
आजकाल सर्वच गोष्टी मोबाईलच्या एका क्लिकवर अवलंबून झाल्या आहेत. त्यामुळे अर्थातच फोनची बॅटरी लवकर संपते. हाच विचार करून जर तुम्ही तुमच्या बहिणीला पॉवर बॅंक गिफ्ट केली तर ती खुश तर होईलच पण त्याचबरोबर तिची अडचणही दूर होईल.
4. Wireless Buds :
उत्तम हेडफोन बरोबरच वायरलेस बड्स हा देखील गिफ्टसाठी बेस्ट ऑप्शन आहे. जर तुमच्या बहिणीला गाणी ऐकण्याची आवड असेल, तर तुम्ही तिला कोणतीही वायरलेस बड भेट म्हणून देऊ शकता. भेटवस्तू देण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे. हे डिव्हाईस तुम्हाला 22 तासांपर्यंत बॅटरी बॅकअप देऊ शकते. यामध्ये तुम्हाला इमर्सिव्ह गेम मोड आणि उत्तम आवाजाची गुणवत्ता यांसारखी फीचर्स मिळतील.
5. Smart Band :
रक्षाबंधनाच्या गिफ्टसाठी स्मार्ट बँड हा एक चांगला पर्याय आहे. हे गिफ्ट तुम्ही तीन हजारांच्या बजेटमध्ये खरेदी करू शकता. फिटनेसची आवड असलेल्या लोकांसाठी हा एक चांगला गिफ्ट पर्याय आहे. विशेष म्हणजे हे बँड अतिशय ट्रेंडी आणि उत्तम गिफ्ट पर्याय आहेत.
महत्वाच्या बातम्या :