Raksha Bandhan 2022 Muhurta : उद्या रक्षाबंधन! जाणून घ्या भद्रकालची वेळ, का बांधू नये या काळात राखी?
Raksha Bandhan 2022 Muhurta : या वर्षी रक्षाबंधन सणाच्या दिवशी भद्रकाल कधी सुरू होईल ते जाणून घेऊया.
Raksha Bandhan 2022 Muhurta : रक्षाबंधनाचा सण उद्या म्हणजेच 11 ऑगस्ट रोजी साजरा होणार आहे. यंदा रक्षाबंधनावरही भद्राकालची सावली आहे. या काळात राखी बांधणे अशुभ मानले जाते. या वर्षी रक्षाबंधन सणाच्या दिवशी भद्रकाल कधी सुरू होईल ते जाणून घेऊया.
जाणून घ्या भद्रकालची वेळ
भद्रकाल - 11 ऑगस्ट 2022 रोजी, भाद्र पूंछ संध्याकाळी 5:17 वाजता सुरू होईल आणि 6.18 वाजता संपेल. त्यानंतर भाद्र मुख सायंकाळी 6.18 पासून सुरू होऊन रात्री 8 वाजेपर्यंत राहील. या दरम्यान बहिणींनी भावाच्या मनगटावर राखी बांधणे टाळावे. काही कारणास्तव भद्रकालात राखी बांधावी लागली तर प्रदोषकाळात अमृत, शुभ आणि लाभाची वेळ पाहून राखी बांधता येईल. 11 ऑगस्ट रोजी अमृत काल संध्याकाळी 6.55 ते 8.20 पर्यंत असेल.
रक्षाबंधन शुभ काळ
रक्षाबंधन हे भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक आहे. भावाच्या दीर्घायुष्यासाठी आणि प्रगतीसाठी या दिवशी बहीण त्याला रक्षासूत्र बांधते. 11 ऑगस्ट रोजी सकाळी 9.28 ते रात्री 9.14 हा राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त आहे.
भाद्रात राखी का बांधू नये?
भाद्र काळात राखी बांधणे अशुभ मानले आहे. पौराणिक आख्यायिकेनुसार, भद्रकालमध्ये लंकेचा राजा रावणाच्या बहिणीने राखी बांधली होती, ज्यामुळे रावणाचा नाश झाला.
भद्रकाल अशुभ मानले जाते?
भद्रकालमध्ये राखी बांधणे अशुभ मानले जाते, त्यामागे एक आख्यायिका अशी आहे की, शनिदेवाच्या बहिणीचे नाव भद्रा होते. भद्राचा स्वभाव अतिशय क्रूर होता, ती प्रत्येक शुभ कार्य, पूजा, यज्ञ यात व्यत्यय आणत असे. त्यामुळे भद्रकालमध्ये कोणतेही शुभ कार्य करणे चांगले मानले जात नाही. त्याचे परिणाम अशुभ आहेत.
12 ऑगस्टलाही बांधू शकता राखी
रक्षाबंधनाच्या सणाबाबत भावा-बहिणींमध्ये प्रचंड उत्साह आहे. हा सण दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. पंचांगानुसार, यावेळी पौर्णिमा दोन दिवस म्हणजे 11 ऑगस्ट आणि 12 ऑगस्ट रोजी आहे. अशा परिस्थितीत रक्षाबंधनाचा सण कधी साजरा होणार? याबाबत मोठी शंका होती. 12 ऑगस्ट रोजी सकाळी 7.05 पर्यंत पौर्णिमा असेल. यावेळी भद्रा नसून उदयतिथीही आहे. त्यामुळे काही लोक 12 ऑगस्टला राखी बांधणे शुभ मानतात. जर तुम्ही 12 ऑगस्टला राखी बांधण्याचा विचार करत असाल तर सकाळी 7.05 च्या आधी राखी बांधा.
महत्वाच्या बातम्या :
- Trending Video : कबुतराची स्टंटबाजी पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल; व्हिडीओ व्हायरल
- Viral Video: बाटलीत पेट्रोल मिळणार नाही म्हणून काय झालं? पठ्ठ्याने मोठा जुगाडच केला; पाहा व्हिडिओ
- Viral Video : चिमुरडीची स्केटिंग पाहून तुम्हीही व्हाल थक्क, हा व्हिडीओ एकदा पाहाच