Railway Fact: 'यात्रीगण कृपया ध्यान दें!' रेल्वे स्टेशनवर ऐकू येणारा हा आवाज कोणाचा?
Railway Fact: रेल्वे उशिराने येत असेल किंवा काही तांत्रिक बिघाड झाला असेल तर यात्रीगण कृपया ध्यान दें!...हा आवाज तुम्ही नक्कीच ऐकला असेल हा आवाज नेमका कोणाचा याविषयी आपण जाणून घेणार आहोत.
Sarla Chaudhary Sound on Railway Stations: आरामदायक तसेच जलद प्रवासाचे साधन म्हणून जवळपास सगळेच लोक रेल्वेला (Railway) पसंती देतात. मुंबईकरांसाठी तर लोकल ही त्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. रेल्वे स्टेशनवर उभे असताना आपली गाडी कधी येणार हे भलेही त्या इंडिकेटर वर लागलेलं असेल तरी आपला पूर्ण विश्वास असतो तो स्टेशनवर होणाऱ्या अनांउसमेंटवर... यात्रीगण कृपया ध्यान दें!... या वाक्याने ती अनाउंसमेंट (Railway Announcment) होते. हा आवाज आपल्या सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतो. परंतु हा आवाज कोणाचा आहे, हे आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहे.
कोणाचा आहे आवाज?
रेल्वे स्टेशनवर गेल्यावर ऐकू येणारा हा गोड आवाज सरला चौधरी (Sarla choudhary) यांचा आहे. 1982 साली सरला चौधरींसह शेकडो उमेदवारांनी मध्य रेल्वेच्या उद्घोषक ( म्हणजे घोषणा करणारी व्यक्ती) या पदासाठी परीक्षा दिली होती. या भरतीमध्ये सरला चौधरी यांची निवड झाली होती. सरला यांची दैनंदिन रोजंदारीवर निवड करण्यात आली होती. सरला यांची भरती झाली त्यावेळी त्या रेल्वेत कंत्राटी कर्मचारी होत्या.
परंतु सरला यांच्या आवाजाने प्रवाशांवर जादू केली. सरला यांचा गोड आवाज प्रवाशांचे लक्ष वेधून घेतो ही बाब जेव्हा रेल्वे प्रशासनाच्या लक्षात आली तेव्हा 1986 साली सरला यांना रेल्वेत कायमस्वरुपी करण्यात आले. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की, आजही सरला यांचा प्रीरेकॉर्डेड आवाज देशातील अनेक रेल्वे स्थानकांवर वापरण्यात येतो. नव्या ट्रेनसाठी दुसरा आवाज रेकॉर्ड केला जातो. सरला चौधरी आज रेल्वेत अनाउन्सर या पदावर नसल्या तरी त्यांचा आवाज वापरला जातो.
1986 साली जेव्हा सरला यांना रेल्वेत काम करत असताना सरला यांना प्रत्येक स्थानकावर जाऊन घोषणा करावी लागत असे. एक अनाउन्समेंच रेकॉर्ड करण्यासाठी त्यांना तीन ते चार दिवस लागात असे. फक्त हिंदीच नाही तर इतर भाषांमध्ये देखील त्या घोषणा रेकॉर्ड करत. त्यानंतर रेल्वेने अनाउन्समेंटची जबाबदारी ट्रेन मॅनेजेमेंट सिस्टमला दिली आहे. महत्त्वाच्या सूचनांसाठी आजही रेल्वे स्थानकावर सरला चौधरी यांचा आवाज वापरण्यात येतो.
इतर महत्त्वाच्या बातम्या: