एक्स्प्लोर

Rose Day: लाल गुलाब प्रेमाचा, तर पिवळा मैत्रीचा, गुलाबाच्या पाच रंगांचा अर्थ काय? 'रोज डे' च्या निमित्ताने आवडत्या व्यक्तीला कोणत्या रंगाचे गुलाब द्याल?

Valentine's Day 2025 : आजपासून व्हॅलेंटाईन्स वीकला सुरूवात झाली असून पहिला दिवस आहे तो म्हणजे रोज डे. आज आपल्या आवडत्या व्यक्तीला गुलाब देऊन मनातील भावान व्यक्त करा.

Rose Day 2025 : फेब्रुवारीचा महिना म्हणजे प्रेमात पडलेल्या आणि प्रेमात पडायच्या मार्गावर असलेल्यांसाठी विशेष असा असतो. 14 फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन्स डे (Valentine's Day) असला तरीही त्याची सुरूवात मात्र एक आठवडा आधीपासूनच होते. त्यामुळे अनेकजण या व्हॅलेंटाईन वीकची (Valentine's Week) आतुरतेने वाट पाहत असतात. व्हॅलेंटाईन वीकची सुरुवात 7 फेब्रुवारीच्या रोज डे पासून होते तर शेवट 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे ने होते. आजचा रविवार रोज डे अर्थात गुलाब दिवसाच्या स्वरुपात साजरा केला जातो.

आजपासून व्हॅलेंटाईनची वीकची सुरुवात झाली असून तो जगभरातील तरुणांकडून उत्साहाने साजरा केला जातो. तसं पहायला गेलं तर व्हॅलेंटाईन वीक किंवा हे वेगवेगळे डे हे पाश्चात्य संस्कृतीचे लक्षण. सुरुवातीच्या काळात केवळ मोठ्या शहरात साजरे करण्यात येणारे हे डे आता गावागावतही साजरे केले जातात. महाविद्यालयातील तरुणांमध्ये हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो.

गुलाब म्हणजे प्रेमाचं प्रतिक

व्हॅलेन्टाईन वीकची सुरुवात आज 'रोज डे'ने (Rose Day)  झाली आहे. त्यामुळे आपल्या आवडत्या व्यक्तीला गुलाब देऊन आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या जातात. गुलाब हे प्रेमाचं प्रतिक समजलं जातं. आपल्या प्रेमाच्या भावना व्यक्त करण्यासाठी गुलाबाचा वापर करण्यात येतो. प्रेमात पडलेल्यांसाठी गुलाबाचं महत्व मोठं असतं, त्यांचं अवघं आयुष्यच गुलाबी होऊन जातं.

भारतात प्राचीन काळापासून, अगदी राजा-महाराजांपासून प्रेम व्यक्त करण्यासाठी गुलाबाचा वापर करण्यात येतोय. आपल्या मनातील भावना शब्दात व्यक्त करता येत नसतील तरीही आपल्या आवडत्या व्यक्तीला केवळ गुलाब दिलं तरी भावना पोहचतात. यामध्ये लाल रंगाच्या गुलाबाचा वापर केला जातो. त्या व्यतिरिक्त इतर अनेक रंगाचे गुलाब अनेक भावना व्यक्त करण्यासाठी वापरतात. गुलाबाच्या रंगाप्रमाणे आपल्या मनातील भावनाही बदलतात.

लाल गुलाब (Red Rose)

आपल्याकडे लाल गुलाबाला प्रेमाचं प्रतिक मानलं जातं. आपल्या मनातील प्रेम व्यक्त करताना लाल गुलाबाचा वापर केला जातो. प्रेमी युगुलांच्या जीवनात लाल गुलाबाला मोठं महत्व असतं. त्यामुळे पहिल्यांदाच आपल्या प्रेमाची भावना व्यक्त करताना लाल गुलाबाचा वापर केला जातो.

पांढरे गुलाब (White Rose) 

निस्वार्थी प्रेमाचं प्रतिक पांढरा रंग हा तसा शांततेचं प्रतिक समजले जाते. त्यामधून पवित्रता आणि शांतीची भावना व्यक्त होते. जर तुम्ही कोणावर शुद्ध आणि निस्वार्थी प्रेम करत असाल तर त्या व्यक्तीला पांढरे गुलाब देऊ शकता. आपल्या नात्यातील प्रेम दर्शवण्यासाठी या गुलाबांचा वापर केला जातो. कोणत्याही नात्याची सुरुवात करताना या रंगाचे गुलाब देण्यात येतात. महत्त्वाचं म्हणजे नात्याची शेवट करतानाही याच रंगाचे गुलाब देण्यात येतात.

गुलाबी गुलाब (Pink Rose) 

गुलाबी रंग हा प्रोत्साहनाचा, प्रेरणेचा रंग मानला जातो. तसेच आपल्याला कोणी आवडत असेल तर त्याची कबुली या गुलाबी गुलाबातून देता येते. आपण कोणाकडून प्रेरित झाला असाल किंवा कोणाला आपला आदर्श मानत असाल तर त्याच्याप्रती आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी गुलाबी रंगाचे गुलाब देऊ शकता.

केशरी गुलाब  (Orrange Rose) 

केशरी रंग हा त्यागाचे आणि वीरतेचे प्रतिक मानला जातो. जर तुम्ही कोणावर जीवापाड प्रेम करत असाल किंवा त्याच्या प्रती समर्पणाची भावना असेल तर त्या व्यक्तीला केशरी रंगाचे गुलाब देऊ शकता. या रंगाचे गुलाब दुर्मीळ आहे. तसंही या रंगाप्रमाणे खरे प्रेमही दुर्मीळ असल्याचं दिसतंय.

पिवळे गुलाब (Yellow Rose) 

मैत्रीचे प्रतिक म्हणजे पिवळा रंग मानला जातो. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात कोणी ना कोणी खास मित्र असतात, ज्यांच्यासाठी आपण काहीही करु शकतो. जर तुमच्यातील मित्रत्वाचे संबंध समुद्राप्रमाणे अथांग असतील तर अशा व्यक्तीला तुम्ही पिवळे गुलाब देऊ शकता आणि आपल्या मैत्रिची भावना व्यक्त करु शकता.

आता गुलाबाच्या वेगवेगळ्या रंगाचे महत्व तर तुम्हाला समजलं आहे. त्यामुळे आज रोज डे च्या निमित्ताने आता कुणाला कोणता गुलाब द्यायचा आणि कशा भावना व्यक्त करायच्या हे तुम्हीच ठरवा. 

ही बातमी वाचा: 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कॅन्सरमुळे वडिलांचे झाले होते निधन, अक्षय कुमार भावुक; म्हणाला..'पन्नाशीनंतर पुरुषांनो 'ही' टेस्ट कराच'
कॅन्सरमुळे वडिलांचे झाले होते निधन, अक्षय कुमार भावुक; म्हणाला..'पन्नाशीनंतर पुरुषांनो 'ही' टेस्ट कराच'
Health Tips : सततच्या आवाजामुळे श्रवण क्षमता कमकुवत होण्याचा धोका; तज्ज्ञांनी दिला इशारा
सततच्या आवाजामुळे श्रवण क्षमता कमकुवत होण्याचा धोका; तज्ज्ञांनी दिला इशारा
Health Tips : भारतीय आहारात आढळतो ‘प्रोटीन गॅप’; जास्त कार्बोहायड्रेट आणि कमी प्रोटीनमुळे आरोग्य धोक्यात?
भारतीय आहारात आढळतो ‘प्रोटीन गॅप’; जास्त कार्बोहायड्रेट आणि कमी प्रोटीनमुळे आरोग्य धोक्यात?
Pune Heat Wave : उन्हाचा तडाखा वाढतोय; उष्माघातापासून स्वतःचा बचाव करा, काळजी कशी घ्याल? जाणून घ्या सविस्तर
उन्हाचा तडाखा वाढतोय; उष्माघातापासून स्वतःचा बचाव करा, काळजी कशी घ्याल? जाणून घ्या सविस्तर

व्हिडीओ

Sunetra Pawar Speech :दादांनी खडसावलेलं तेच वहिणींनी सांगितलं, बीडीडीवासियांना पवारांचा मोलाचा सल्ला
Prakash Abitkar on Mahatma Phule Yojana : रुग्णालयांकडून लूट, महात्मा फुले योजनेत पात्र कोण?
Eknath Shinde on BDD : लोढा बांधतात त्या दर्जाचीच BDD ची घरं, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
Baramati Rahuri Election : बारामती, राहुरीची पोटनिवडणूक 23 एप्रिलला, निवडणूक आयोगाची माहिती
North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आम्हाला तुटपुंजे मानधन, निदान उपसरपंचाएवढे तरी द्या; नगरसेवकाचं मुख्यमंत्र्याचं पत्र, सांगितलं किती मिळतो भत्ता?
आम्हाला तुटपुंजे मानधन, निदान उपसरपंचाएवढे तरी द्या; नगरसेवकाचं मुख्यमंत्र्याचं पत्र, सांगितलं किती मिळतो भत्ता?
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का, युद्धनौका पाठवण्यास जपान, दक्षिण कोरिया आणि ऑस्ट्रेलियाची नकारघंटा, अमेरिकेच्या अडचणी वाढल्या
होर्मुझमध्ये युद्धनौका पाठवण्यास जपान, दक्षिण कोरिया आणि ऑस्ट्रेलियाचा नकार,ट्रम्प यांना मोठा धक्का
Naigaon BDD Chawl Photo: 23 मजली टोलेजंग इमारत, 500 चौ. फुट...गायकवाड, कदम, शेख, जाधव...; नायगाव बीडीडी चाळीत मराठी माणसाला हक्काचं घर, पाहा PHOTO
23 मजली टोलेजंग इमारत, 500 चौ. फुट...गायकवाड, कदम, शेख, जाधव...; नायगाव बीडीडी चाळीत मराठी माणसाला हक्काचं घर, पाहा PHOTO
बीडमधील महिला अत्याचारप्रकरणात ट्विस्ट; पीडितेच्या पतीवरही गुन्हा दाखल, पोलीस कारवाईला वेग
बीडमधील महिला अत्याचारप्रकरणात ट्विस्ट; पीडितेच्या पतीवरही गुन्हा दाखल, पोलीस कारवाईला वेग
Adinath Maharaj Ahilyanagar Crime: रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात, डॉक्टरांकडून तातडीची शस्त्रक्रिया, तारकेश्वर गडाच्या महंत अदिनाथ महाराजांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट
रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात, डॉक्टरांकडून तातडीची शस्त्रक्रिया, तारकेश्वर गडाच्या महंत अदिनाथ महाराजांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट
2000 ते 5 हजार घेऊन विधानसभेचे एन्ट्री पास दिले; उदय सामंतांची सभापतींकडे तक्रार, खोट्या लेटरपॅडचा वापर
2000 ते 5 हजार घेऊन विधानसभेचे एन्ट्री पास दिले; उदय सामंतांची सभापतींकडे तक्रार, खोट्या लेटरपॅडचा वापर
धर्मांतर विधेयक मुस्लिम विरोधात? विरोधकांच्या आरोपावर मुख्यमंत्र्याचं उत्तर, फडणवीसांनी सांगितलं नेमकं काय?
धर्मांतर विधेयक मुस्लिम विरोधात? विरोधकांच्या आरोपावर मुख्यमंत्र्याचं उत्तर, फडणवीसांनी सांगितलं नेमकं काय?
Bypass surgery Mahatma phule yojana: बायपास शस्त्रक्रियेसाठी विशेष योजना, एक रुपयाही द्यायची गरज नाही, आरोग्यमंत्र्यांचा सभागृहात शब्द
बायपास शस्त्रक्रियेसाठी विशेष योजना, एक रुपयाही द्यायची गरज नाही, आरोग्यमंत्र्यांचा सभागृहात शब्द
Embed widget