Patanjali: पतंजलीच्या वेलनेस सेंटरमध्ये क्रॉनिक आजारांसाठी कस्टमाइज्ड आयुर्वेदिक उपाय कसे दिले जातात?
Patanjali: पतंजली वेलनेस सेंटर आधुनिक जीवनशैलीमुळे वाढलेल्या आजारांना आयुर्वेद आणि नैसर्गिक चिकित्सा पद्धतींनी दूर करण्याचा दावा करतं.

Patanjali: आजच्या धावपळीच्या आयुष्यात डायबिटीज, हृदयरोग, श्वसनाचे विकार, सांधेदुखी अशा क्रॉनिक समस्या झपाट्याने वाढत आहेत. पतंजलीचा दावा आहे की, त्यांच्या वेलनेस सेंटरमध्ये प्राचीन आयुर्वेदिक आणि निसर्गोपचार पद्धतींचा वापर करून अशा समस्या मुळापासून दूर करण्याचा प्रयत्न केला जातो. येथे दिले जाणारे कस्टमाइज्ड ट्रीटमेंट्स प्रत्येक रुग्णाच्या वेगळ्या गरजांनुसार तयार केले जातात. त्यामुळे फक्त लक्षणांवर उपचार न होता आजाराच्या मूळ कारणावरही काम केलं जातं. ही पद्धत आधुनिक वैद्यकातील उणीवा भरून काढते आणि दीर्घकालीन आजारांतून आराम मिळवून देते, असा दावा पतंजलीकडून केला जातो.
पतंजली वेलनेस सेंटर आधुनिक जीवनशैलीमुळे वाढलेल्या आजारांना आयुर्वेद आणि नैसर्गिक चिकित्सा पद्धतींनी दूर करण्याचा दावा करतं. येथे आयुर्वेद, पंचकर्म, योग आणि निसर्गोपचारांच्या माध्यमातून रुग्णांवर उपचार केले जातात.
रुग्णांचं विस्तृत मूल्यांकन करूनच उपचार -पतंजली
पतंजलीच्या मते, “वेलनेस सेंटर आयुर्वेद, निसर्गोपचार, पंचकर्म, योग थेरपी आणि डायट थेरपी या तत्त्वांवर चालतात. येथे येणाऱ्या प्रत्येक रुग्णाचा आधी सखोल मुल्यांकन केलं जातं. जीवनशैली, आहार, मानसिक स्थिती, शरीराची प्रकृती या सर्वांचा अभ्यास करून त्यानुसार वैयक्तिक उपचार पद्धती आखली जाते.
उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीला डायबिटीज असल्यास त्यासाठी खास हर्बल औषधे, धनुरासन आणि प्राणायामासारखे योगासने, तसेच ब्लड शुगर नियंत्रित करणारा विशेष आहार दिला जातो. हृदयरुग्णांसाठी रक्ताभिसरण सुधारण्यासाठी ओझोन थेरपी आणि अॅक्यूपंक्चरचा वापर केला जातो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा धोका कमी होतो,” असं पतंजली सांगते.
शरीर, मन आणि आत्म्याच्या संतुलनावर लक्ष -पतंजली
पंतजलीच्या म्हणण्यानुसार, “क्रॉनिक आजारांसाठी दिल्या जाणाऱ्या उपचारांचा मुख्य भर शरीर-मन-आत्मा या तिन्हींच्या संतुलनावर असतो. पंचकर्म थेरपीद्वारे शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर काढली जातात. वमन, विरेचन, बस्ती यांसारख्या प्रक्रियांमुळे यकृत, मूत्रपिंड आणि पचनसंस्थेची शक्ती वाढते.
श्वसनाच्या तक्रारी जसे अस्थमा किंवा फुफ्फुसांच्या इतर समस्या असणाऱ्यांसाठी खास थेरपी दिल्या जातात. नैसर्गिक औषधी वनस्पतींचा वापर आणि योगासने यांच्या मदतीने फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढवण्याचा प्रयत्न केला जातो.”
सात्त्विक आहाराने वाढते रोगप्रतिकारशक्ती..
पतंजली सांगते, “डायट थेरपीअंतर्गत वैयक्तिक गरजेनुसार आहार योजना दिली जाते. सत्विक आहारामुळे इम्युनिटी वाढते. हायड्रोथेरपी, मसाज यांसारख्या पद्धती दुखणे आणि सूज कमी करण्यात मदत करतात. या कस्टमाइज्ड थेरपीज शरीराचं आरोग्य सुधारतातच, शिवाय मानसिक ताणही कमी करतात.योग आणि ध्यान सत्रांमुळे स्ट्रेस हार्मोन्स कमी होतात आणि तणावामुळे उद्भवणारे क्रॉनिक आजारही दूर होण्यास मदत होते.”
























