पंचकर्म ते मडथेरपी अन् सनबाथपर्यंत.. पतंजली प्राचीन अन् आधुनिक विज्ञानाचा संगम कसा घडवतंय?
त्यांच्या प्रयोगशाळांना NABL, DSIR आणि DBT सारख्या प्रतिष्ठित संस्थांकडून मान्यता मिळाल्याचे कंपनी सांगते.

Patanjali News: पंतजलि वेलनेस सेंटर प्राचीन आयुर्वेद, योग आणि नैसर्गिक चिकित्सा यांना आधुनिक विज्ञानाशी जोडून आरोग्य क्षेत्रात नवी क्रांती घडवत आहेत. पंचकर्मासारख्या पारंपरिक उपचारपद्धतींसोबत आधुनिक डायग्नॉस्टिक तंत्रज्ञानाचा वापर करून हे सेंटर सर्वांगीण आरोग्याचा नवा आयाम निर्माण करत असल्याचा दावा पतंजलीकडून केला जात आहे.
प्राचीन आणि आधुनिक यांचा संगम
पतंजलीच्या मते, त्यांच्या वेलनेस सेंटर्समध्ये आयुर्वेद, योग, नैसर्गिक चिकित्सा (नॅचुरोपॅथी) आणि पंचकर्मासारख्या प्राचीन पद्धती आधुनिक वैज्ञानिक तंत्रज्ञानासह वापरल्या जातात. पंचकर्माच्या माध्यमातून शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर काढून ऊर्जा आणि मानसिक स्पष्टता वाढवली जाते. यासोबतच सूक्ष्मजैविक (मायक्रोबायोलॉजिकल) आणि औषधीय (फार्मास्युटिकल) चाचण्या घेतल्या जातात, ज्यामुळे उपचार सुरक्षित आणि विश्वासार्ह असल्याची खात्री मिळते. त्यांच्या प्रयोगशाळांना NABL, DSIR आणि DBT सारख्या प्रतिष्ठित संस्थांकडून मान्यता मिळाल्याचे कंपनी सांगते.
नैसर्गिक उपचारशक्ती जागृत करणारे थेरपी
पतंजलीचा दावा आहे की, त्यांच्या नैसर्गिक उपचारांत हायड्रोथेरपी, मड थेरपी आणि सनबाथ यांसारख्या पद्धतींचा वापर केला जातो. हे उपचार शरीराची नैसर्गिक उपचारशक्ती जागृत करतात तसेच ताण, मधुमेह आणि सांधेदुखी यांसारख्या समस्यांमध्ये दिलासा देतात. योग आणि प्राणायामाच्या माध्यमातून रक्ताभिसरण सुधारले जाते, ज्यामुळे एकूण आरोग्य सुधारते. पतंजलीच्या मते, त्यांचा दृष्टिकोन केवळ लक्षणे कमी करण्यापुरता मर्यादित नसून आजाराच्या मूळ कारणावर उपाय शोधतो.
वैज्ञानिक चाचण्यांनी सिद्ध आयुर्वेद
पतंजलीने सांगितले की, त्यांच्या उत्पादनांची आणि उपचारांची चाचणी देशातील प्रमुख वैद्यकीय आणि संशोधन संस्थांच्या सहकार्याने केली जाते. उदाहरणार्थ, अश्वगंधा आणि त्रिफळा यांसारख्या आयुर्वेदिक वनस्पती ताण कमी करण्यासाठी आणि पचन सुधारण्यासाठी उपयुक्त असल्याचे आधुनिक संशोधनातून सिद्ध झाले आहे. पतंजलीने या पारंपरिक औषधींना आधुनिक पॅकेजिंग आणि वैज्ञानिक प्रमाणीकरणासह उपलब्ध करून दिले आहे.
आरोग्य म्हणजे फक्त शारीरिक नाही – बाबा रामदेव
पतंजलीचे संस्थापक स्वामी रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांच्या मते, आरोग्य हे केवळ शारीरिक मर्यादित नसून मानसिक आणि आध्यात्मिकही असले पाहिजे. त्यांच्या वेलनेस सेंटर्समध्ये व्यक्तीच्या गरजेनुसार वैयक्तिक उपचार योजना आखल्या जातात. यात पोषण, योग आणि जीवनशैलीवरील मार्गदर्शनाचा समावेश असतो. याशिवाय पतंजली पर्यावरणीय जबाबदारीलाही महत्त्व देते आणि नैसर्गिक व सेंद्रिय उत्पादनांचा वापर करते.
























