Parenting Tips : आनंदी कुटुंबासाठी 'या' 6 गोष्टींची काळजी घ्या; मुलेही तुमच्यावर खुश राहतील
Parenting Tips : मुलांचे चांगले संगोपन करण्यासाठी, प्रथम त्यांच्या भविष्यासाठी ध्येय निश्चित करणं गरजेचं आहे.
Parenting Tips : लहान मुलं ही एखाद्या रोपांसारखी असतात, जर त्यांचे योग्य संगोपन केले नाही तर ते कोमेजून जातात. यासाठी त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कधी कधी आपण आपल्या जबाबदाऱ्यांमध्ये इतके अडकून जातो की आपण आपल्या मुलांना पुरेसा वेळ देऊ शकत नाही. ज्याची खरंतर त्यांना त्यांच्या बालपणात जास्त गरज असते.
लहान मुले ही आपल्या पालकांचा आरसा असतात. मुलांचे चांगले संगोपन हे आपले पालकत्व प्रतिबिंबित करते. आपल्या मुलांना योग्य शिकवण द्यावी, त्यांचे चांगले संगोपन करावे ही प्रत्येक पालकांची इच्छा असते. यासाठी पालकांनीही थोडी मेहनत घेऊन मुलांना नेमकी कोणती शिकवण द्यावी, त्यांच्या संगोपनासाठी कोणत्या गोष्टी शिकणं आणि शिकवणं गरजेचं आहे. यासाठी काही नियम पालकांनीही अंगिकारले पाहिजेत.
तुमच्या मुलांवरही तुमचे प्रेम व्यक्त करा
सर्वच पालक आपल्या मुलांवर प्रेम करत असले तरी त्यांना याची जाणीव करून दिल्याने मुलांच्या शरीरात ऑक्सिटोसिन नावाचे हार्मोन स्रवले जाते, ज्यामुळे मुलांचे मन शांत राहते. यामुळे मुलांना आपल्या कुटुंबीयांबद्दल आदर आणि आपुलकी वाटते.
मुलांशी मैत्रीपूर्ण वागा
मुलांशी तर प्रत्येक पालक बोलतात पण जर तुम्ही मुलांची समस्या समजून घेतली, त्यांच्या समस्यांवर जर तुम्ही बोललात तर ते तुमच्याशी अधिक खुलून बोलतील. यासाठी मुलांच्या समस्यांबद्दल नेहमी ऐका आणि त्यावर उपाय शोधा आणि त्यांना सूचना द्या. त्यांच्याशी सर्व प्रकारची मोकळेपणाने चर्चा झाली पाहिजे.
आपली उपस्थिती दर्शवणे
प्रत्येक परिस्थितीत मुलांना आपली उपस्थिती दर्शवणे सर्वात महत्वाचे आहे. त्यांना कळू द्या की तुम्ही त्यांच्या गरजांसाठी नेहमी तत्पर आहात.
पालक होण्याचा अधिकार
तुम्ही निःसंशयपणे तुमच्या मुलांचे पालक आहात, परंतु त्यांच्यावर दबाव आणून ही जाणीव व्यक्त करू नका. यामुळे ते तुमचे मत उघडपणे तुमच्यासमोर मांडू शकणार नाहीत.
मुलांना मारहाण करू नका
तुमचा मुलगा तुमच्या कॉलनीत सर्वोत्कृष्ट असावा, म्हणून त्याला मारहाण करून काहीही शिकवू नका. अभ्यास किंवा कोणत्याही स्पर्धेसाठी जबरदस्ती करू नका. त्यांना प्रेमाने समजावून सांगा.
स्वत: मुलांसाठी प्रेरणास्थान व्हा
जर तुम्हाला तुमच्या मुलांना चांगली व्यक्ती बनवायची असेल तर सर्वप्रथम तुम्ही स्वतः एक चांगले व्यक्ती व्हा. जेणेकरून ते तुमच्याकडे एक उदाहरण म्हणून पाहतील आणि तुमच्यासारखे बनण्याचा प्रयत्न करतील.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :