एक्स्प्लोर

Health tips : चुकूनही मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये 'हे' पदार्थ गरम करू नका; आरोग्यावर होईल घातक परिणाम

Health tips : अन्न वारंवार गरम केल्याने त्यात बॅक्टेरियाची संख्या वाढू लागते, त्यामुळे अन्न विषारी बनते आणि ओव्हनच्या बाबतीत धोका वाढतो.

Health tips : जर तुम्ही खाण्याचे शौकीन असाल आणि गरमागरम जेवण (Food) जेवण्याची सवय असेल तर तुम्ही सावध राहण्याची गरज आहे. गरम जेवण कोणाला आवडत नाही. विशेषत: घर असो वा ऑफिस प्रत्येकाला गरम जेवण हवे असते. अन्न गरम करण्यासाठी ओव्हनचा (Oven) वापर केला जातो. ज्यामुळे अनेक आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आजकाल बरेच लोक आपल्या सोयीसाठी ओव्हनचा वापर करतात. ओव्हनमधील अन्न खूप लवकर गरम होते. पण तज्ज्ञांच्या मते, अन्न पुन्हा पुन्हा गरम करू नये. नेहमी ताजे अन्न खाण्याचा प्रयत्न करावा. अन्न वारंवार गरम केल्याने त्यात बॅक्टेरियाची संख्या वाढू लागते. त्यामुळे अन्न विषारी बनते आणि ओव्हनचा वापर केल्याने धोका वाढतो. या ठिकाणी आम्ही तुम्हाला काही पदार्थांची नावं सांगणार आहोत. जे तुम्ही चुकूनही ओव्हनमध्ये गरम करू नये.

तांदूळ : तांदूळ ओव्हनमध्ये गरम करू नये. भात लवकर थंड होतो आणि ओव्हनमध्ये तांदूळ गरम केल्याने त्याची चवही कमी होते. ही चव टिकवण्यासाठी भात अनेकदा ओव्हनमध्ये गरम केला जातो. परंतु, यामुळे बॅक्टेरिया वाढण्याचा धोका वाढतो.
 
बटाटा : जर तुम्ही बटाट्याची भाजी ओव्हनमध्ये पुन्हा गरम करण्याची सवय असेल तर वेळीच थांबा. बटाट्यातील उष्ण वातावरणामुळे बॅक्टेरियाच्या वाढीचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. ज्यामुळे तुम्ही फूड पॉयझनिंगचाही बळी होऊ शकता.
 
अंडी : जर तुम्हाला अंडी खायची आवड असेल आणि तुम्हाला थंड अंडी आवडत नसतील. अशा वेळी अनेकदा अंडी पुन्हा गरम केली जातात. मात्र, हे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. ओव्हनमध्ये अंडी गरम केल्याने त्यामध्ये बॅक्टेरिया वेगाने वाढतात आणि तुमचे पोट खराब होऊ शकते.
 
चिकन : जर तुम्हालाही चिकन खाण्याची आवड असेल तर हे लक्षात घ्या की चिकन ओव्हनमध्ये गरम करू नका. बरेच लोक मोठ्या प्रमाणात चिकन बनवतात आणि ते रात्रभर ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आणि दिवसा पुन्हा गरम करतात. रिपोर्ट्सनुसार, असे करणे पूर्णपणे चुकीचे आहे. गरमागरम चिकन खाण्याच्या आवडीमुळे तुमच्या आरोग्याचे नुकसान होऊ शकते. चिकन गरम केल्याने त्यातील प्रोटीन विषारी बनते. ज्यामुळे तुम्हाला अन्नातून विषबाधा होऊ शकते. जर तुम्हाला चिकन फेकायचे नसेल तर तुम्ही ते मंद आचेवर गरम करू शकता.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या बातम्या : 

Most Expensive Spice:'हा' आहे जगातील सर्वात महाग मसाला, 10 ग्रॅम खरेदी करतानाही अनेकदा विचार करावा लागेल!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 9PM TOP Headlines 09 PM 20 January 2025Pankaja Munde on Beed Guardian Minister | बीडचं पालकमंत्रिपद दिलं असतं तर आनंद झाला असता-पंकजा मुंडेZero Hour Jitendra Awhad : धनंजय मुंडेंबाबत जितेंद्र आव्हाडांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 08 PM 20 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Embed widget