Omicron Variant : Omicron ची लक्षणे मुलांमध्ये आणि प्रौढांमध्ये वेगळी असतात, 'ही' लक्षणं दिसून येताच सावध व्हा!
Health Tips : भारतात कोरोना विषाणूचा संसर्ग सातत्याने वाढत आहे. लहान मुलांमध्ये आणि प्रौढांमध्ये कोरोनाची वेगवेगळी लक्षणं दिसून येतात.
Covid-19 : भारतात कोरोना व्हायरसचा (Covid-19) संसर्ग सातत्याने वाढत आहे. अशा वेळी, महामारीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेची तुलना करताना, सर्वात सामान्य लक्षणे नोंदवली गेली आहेत. जी कोविड-19 च्या ओमायक्रॉन प्रकाराशी संबंधित आहेत. या दरम्यान लहान मुले आणि प्रौढांमध्ये विविध प्रकारची लक्षणे दिसून येत आहेत. ही लक्षणं नेमकी कोणती ते जाणून घेऊयात.
प्रौढांमध्ये कोविड-19 ची सामान्य लक्षणे :
प्रौढांमध्ये आजाराची पाच सामान्य लक्षणे तिसर्या लाटेत दिसली. ती म्हणजे ताप, खोकला, घसा खवखवणे, स्नायू कमकुवतपणा आणि थकवाआहे. या लक्षणांच्या तक्रारी सुमारे 99% लोकांमध्ये दिसून आल्या आहेत.
लहान मुलांमध्ये कोविड-19 ची सामान्य लक्षणे :
11 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांमध्ये तिसऱ्या लाटेच्या दरम्यान श्वसनमार्गाच्या संसर्गासह ताप कोविड-19 साठी सामान्य आहे. यावेळी मुलांमध्ये न्यूमोनिया, कफ यासारखी लक्षणे दिसून आली आहेत.
ओमायक्रॉन व्हेरियंटची लक्षणे दिसल्यास काय करावे?
ओमायक्रॉन संसर्ग शोधण्याची अचूक पद्धत RT-PCR चाचणी आहे. म्हणून जेव्हा जेव्हा तुम्हाला कोणतीही लक्षणे दिसतात. तेव्हा शक्य तितक्या लवकर स्वतःची तपासणी करा. ज्या लोकांना सर्दीची लक्षणे दिसतात त्यांना कोरोना चाचणी करून घेण्याचा सल्ला दिला जातो. जेणेकरुन संसर्ग वाढण्यापासून रोखता येईल. याबरोबरच असा सल्लाही देण्यात आला आहे की, जोपर्यंत चाचणीचा रिपोर्ट येत नाही तोपर्यंत तुम्ही स्वतःला आयसोलेशनमध्ये ठेवावे. असे केल्याने तुम्ही कुटुंबातील इतर सदस्यांना संसर्ग होण्यापासून वाचवू शकता.
ओमायक्रॉन प्रकाराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य :
ओमायक्रॉन संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये घसा खवखवणे, थकवा, ताप, अंगदुखी, रात्री घाम येणे, शिंका येणे, नाक वाहणे, भूक न लागणे यांचा समावेश होतो.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :
- Covid-19 : Omicron variant दरम्यान, लवंग, मेथी आणि तुळस 'या' प्रकारे करा सेवन, घसादुखीही होईल दूर
- Omicron Variant: नखांचा रंग बदलणे असू शकते ओमायक्रॉनचे लक्षण, चुकूनही करू नका दुर्लक्ष!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )