एक्स्प्लोर

Navratri 2021 : नवरात्रीचे नऊ रंग; काय आहे 'या' रंगांचं महत्त्व

आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात झाली आहे. अश्विन शुद्ध प्रतिपदेला नवरात्रोत्सव सुरु होतो.

Shardiya Navratri 2021 Nine Color: आजपासून शारदीय  नवरात्रोत्सवाला सुरूवात झाली आहे. अश्विन शुद्ध प्रतिपदेला नवरात्रोत्सव सुरु होतो. नवरात्रोत्सवामध्ये रंगाचे महत्व असते. दरवर्षी  नवरात्रोत्सवामध्ये नऊ वेगवेगळ्या रंगाचे कपडे परिधान केले जातात. पाहूयात यावर्षीचे रंग कोणते आहेत. 

पहिला दिवस: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा केली जाते. शैलपुत्री देवीला पिवळा रंग आवडतो. पिवळा रंग हा ज्ञान, विद्या, सुख, शांती, अध्ययन, विद्वता, योग्यता, एकाग्रता, मानसिक आणि बौद्धिक उन्नतीचे प्रतिक आहे. हा रंग मनामध्ये नवे विचार निर्माण करतो. 

दुसरा दिवस: नवरात्री उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी ब्रम्हचारिणी देवीची पूजा केली जाते. ब्रम्हचारिणी देवीला हिरवा रंग प्रिय आहे. हिरवा रंग विश्वास, उर्वरता, समृद्धी आणि प्रगतीचे प्रतिक आहे. हा रंग अनेक आजार दूर करू शकतो, असे मानले जाते. 

तिसरा दिवस: तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते. देवीच्या या रूपाला तपकिरी रंग आवडतो. तपकिरी रंग हा मेहनत आणि चिकाटीचे प्रतिक आहे. नवरात्रीच्या  तिसऱ्या दिवशी तपकिरी रंगाचा पोषाख परिधान करून चंद्रघंटा देवीची पूजा करावी.  
 
चौथा दिवस: चौथ्या दिवशी कुष्मांडा देवीची पूजा केली जाते. कुष्मांडा देवीला नारंगी रंग आवडतो. नारंगी रंग हा गौरव आणि वीरतेचे प्रतिक आहे. असे मानले जातेस की, जर तुम्ही नवरात्रीच्या दिवशी नारंगी रंगाचे वस्त्र परिधान करून कुष्मांडा देवीची पुजा केली तर देवी प्रसन्न होते. 
 
पाचवा दिवस: पाचव्या दिवशी स्कंदमाता देवीची पूजा केली जाते. स्कंदमाता देवीला पांढरा रंग आवडतो. पांढरा रंग हा पवित्रता, शुद्धता, विद्या आणि शांतीचे प्रतिक आहे. या रंगामधून मानसिक, बौधिक आणि नैतिक स्वच्छता प्रकट होते. पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करून स्कंदमाताची पूजा करावी. 

सहावा दिवस:  सहाव्या दिवशी कात्यायनी देवीची पूजा केली जाते. कात्यायनी देवीला लाल रंग आवडतो. लाल रंग हा माणसाचे शारिरीक स्वास्थ हे सुंदर आणि आनंदीत ठेवण्यास मदत करतो.   

सातवा दिवस: सातव्या दिवशी कालरत्री देवीची पूजा केली जाते. कालरात्री देवीला निळा रंग आवडतो. निळा रंग हा बळ आणि वीर भावाचे प्रतिक आहे.   
 
आठवा दिवस: आठव्या दिवशी महागौरी देवीची पूजा केली जाते. गुलाबी रंग हा सौभाग्य आणि प्रेमाचे प्रतिक आहे. 

नऊवा दिवस: नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच नऊव्या सिद्धीदात्री देवीची पूजा केली जाते. सिद्धीदात्री देवीला जांभळा रंग आवडतो. जांभळा रंग हा उत्साह, वैभव आणि एकमेकांमधील प्रेमाचे प्रतिक आहे. हा रंग मनाला शांती देतो.

Navratri 2021 : आज घटस्थापना, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्त्व

का आठच दिवस साजरी केली जाणार नवरात्र? 
यंदाच्या वर्षी तृतीया तिथी आणि चतुर्थी शनिवारी एकाच दिवशी आली आहे. ज्यामुळे चतुर्थीचा लोप झाला. म्हणून यंदा चंद्रघंटा आणि कुष्मांडा या देवीच्या रुपांची एकाच दिवशी पूजा केली जाणार आहे. याच कारणामुळं नवरात्रोत्सव आठ दिवस साजरा करण्यात येणार आहे.

प्रियांका कुलकर्णी या एबीपी माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

सशक्त मन अशक्त शरीरालाही समर्थपणे सांभाळू शकते…:गुरुदेव श्री श्री रविशंकर
सशक्त मन अशक्त शरीरालाही समर्थपणे सांभाळू शकते…:गुरुदेव श्री श्री रविशंकर
Heart Health: हृदयाचे पंपिंग सामान्य म्हणजे धोका कमी की जास्त? जाणून घ्या EF किती असणं योग्य
हृदयाचे पंपिंग सामान्य म्हणजे धोका कमी की जास्त? जाणून घ्या EF किती असणं योग्य
Health Tips : 60 वर्षांनंतर कार्डियाक अरेस्टचा धोका कमी करण्यासाठी ज्येष्ठांनी कोणती काळजी घ्यावी?
60 वर्षांनंतर कार्डियाक अरेस्टचा धोका कमी करण्यासाठी ज्येष्ठांनी कोणती काळजी घ्यावी?
पोटभर जेवण मिळते, पण प्रथिने मिळतात का? देशातील निम्म्याहून अधिक लोकांच्या जेवणात प्रथिनांची कमतरता, अहवालातून धक्कादायक माहिती समोर 
पोटभर जेवण मिळते, पण प्रथिने मिळतात का? देशातील निम्म्याहून अधिक लोकांच्या जेवणात प्रथिनांची कमतरता, अहवालातून धक्कादायक माहिती समोर 

व्हिडीओ

Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yugendra Pawar: आमची एकत्र येण्याची इच्छा असेल आणि समोरच्याची नसेल तर काय करावं? सोमेश्वर कारखान्याचा चेअरमन आमच्याशिवाय ठरणार नाही : युगेंद्र पवार
सोमेश्वरमध्ये तिरंगी लढत,आमच्या शिवाय कारखान्याचा चेअरमन ठरणार नाही: युगेंद्र पवार
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
यूपी बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा
यूपी-बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा, मविआ नेत्यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
Sai Paranjpye: ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
Rohit Pawar: खोटे गुन्हे नोंदवायची एवढी हौस असेलच, तर विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करून माझ्यावर गुन्हे नोंद करा, रोहित पवार यांचं पुणे पोलिसांना आव्हान
पुणे पोलीस आयुक्त साहेब, किती खोटे बोलणार? किती खोट्या FIR करणार? रोहित पवार यांचा सवाल
Embed widget