Health Tips : 'या' 5 भाज्या कच्च्या खाण्याची चूक कधीही करू नका; नाहीतर शरीरात या समस्या उद्भवतील
Health Tips : काही लोक भाज्या कच्च्या स्वरूपात देखील खातात. त्यामुळे आरोग्यावर घातक परिणाम होतात.
Health Tips : निरोगी राहण्यासाठी आणि आजारांपासून दूर राहण्यासाठी भाज्यांचे सेवन करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण तुमच्या शरीराला भाज्यांमधून पूर्ण पोषण मिळू शकते. आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजांसह, शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट देखील त्यात आढळतात. भाज्यांमध्ये हिरव्या पालेभाज्या सर्वाधिक खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण ते खाल्ल्याने शरीरातील अनेक आजार दूर होतात. आपण काही भाज्या कच्च्या आणि काही शिजवल्यानंतर खातो. तसेच, काही लोक त्या भाज्या कच्च्या स्वरूपात देखील खाताना दिसतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही भाज्यांबद्दल सांगणार आहोत, ज्या तुम्ही चुकूनही कच्च्या खाऊ नयेत. या भाज्या कोणत्या ते जाणून घ्या.
'या' भाज्या कच्च्या खाऊ नका
1. वांगी : वांग्याची भाजी प्रत्येक घरात केली जाते. वांगी शिजवल्यानंतर खाल्ल्याने आरोग्यासाठी अनेक फायदे होतात. पण जर तुम्ही वांगे कच्चं खात असाल तर आजपासून ते खाणं बंद करा. कारण कच्ची वांगी तुमच्या आरोग्याला नुकसान पोहोचवू शकतात. वांग्यात अल्कलॉईड कंपाऊंड सोलानाईन आढळते, जे आरोग्यासाठी चांगले मानले जात नाही. यामुळे तुम्हाला पोटाचा त्रास होऊ शकतो.
2. मशरूम : मशरूमचा वापर वेगवेगळ्या पदार्थांमध्ये चव आणण्यासाटी केला जातो. काही लोक त्याचे कच्च्या स्वरूपात सेवन करतानाही दिसतात. जर तुम्ही मशरूम कच्चे खात असाल तर काळजी घ्या. कारण कच्च्या मशरूममध्ये हानिकारक बॅक्टेरिया आढळतात. यामुळे तुमचे आरोग्य बिघडू शकते.
3. कोबी : कोबी कच्चे खाण्याची चूक करू नये. कारण ते कच्चे खाल्ल्याने तुमचे आरोग्य बिघडू शकते आणि पचनाशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात.
4. पालक : पालेभाजी म्हणून पालकाची भाजी चांगली मानली जाते. मात्र, हाच पालक जर तुम्ही कच्चा खाल्लात तर तुमच्या आरोग्याला तो धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे कच्चा पालक खाऊ नका.
5. बटाटा : जेवणातील प्रत्येक भाजीत वापरला जाणारा बटाटा अन्नाची चव वाढवतो. मात्र, हाच बटाटा जर तुम्ही कच्चा खाल्लात तर मात्र तो तुमच्या आरोग्यासाठी फार घातक असतो. कारण ते कच्च्या स्वरूपात खाल्ल्याने पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :