एक्स्प्लोर

Mother's Day 2023: मातृदिन म्हणजे नक्की काय? कशी झाली मातृदिन साजरी करण्याची सुरुवात? पाहा...

Mother's Day 2023: जगभरात मातृदिन मोठ्या उत्साहाने साजरा होतो. यंदा मातृदिन (Mother’s Day) येत्या रविवारी, म्हणजेच 14 मे रोजी आहे. मातृदिनाला सुरुवात कशी झाली तुम्हाला माहिती आहे का? जाणून घेऊया...

Mother's Day 2023: आई म्हणजे सहवास, आई म्हणजे नाव आणि गाव, आई म्हणजे आयुष्याची शिदोरी... इतर वेळी आई हा विषय आपण आपल्या सर्वसामान्य जगण्यात इतका गृहित धरलेला असतो की, त्याची वेगळी दखलही आपल्याला घ्यावी वाटत नाही. अर्थात हे निरीक्षण सर्वांनाच लागू पडतं असं नाही. आपल्या आईने आपल्यासाठी केलेल्या त्यागाची, कष्टाची, नि:स्वार्थी प्रेमाची आपण आपल्या उभ्या आयुष्यात कधीच परतफेड करु शकणार नाही. मात्र तरीही तिने आपल्याला दिलेल्या ह्या सुंदर आयुष्याबद्दल तिचे आभार मानण्याचा दिवस म्हणजे मातृदिन (Mother's Day). जगभरात हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा होतो.

यंदाही हा दिवस महाराष्ट्रासह देशात आणि जगभरात साजरा केला जाईल. याच मातृदिनाचा इतिहास थोडक्यात जाणून घेऊया.

मातृदिन (Mother’s Day) म्हणजे काय?

प्रत्येक आईचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जाणारा दिवस म्हणजेच मातृदिन (Mother’s Day). आईबद्दल प्रेम व्यक्त करण्यासाठी, सर्वांसाठी सतत कष्ट करणाऱ्या आईचे आभार मानण्यासाठी हा  दिवस साजरा केला जातो.

कशी झाली मातृदिन (Mother’s Day) साजरा करण्याची सुरुवात?

मातृदिन साजरा करण्याती पहिली सुरुवात अमेरिकेतून झाली. अमेरिकन अॅक्टिविस्ट अॅना जार्विस (Anna Jarvis) यांचं आपल्या आईवर प्रचंड प्रेम होतं. त्यांनी स्वतः लग्न केलं नव्हतं. ती सदैव आपल्या आईसोबतच राहत असे. जिवलग आईचा मृत्यू झाल्यावर अॅना जार्विस हिने आईच्या स्मृतिप्रित्यर्थ मातृदिन (Mother’s Day) साजरा करण्यास सुरुवात केली. त्यानंतर हळूहळू अनेक देशांमध्ये मातृदिन साजरा करण्यात येऊ लागला.

मातृदिन (Mother’s Day) कधी साजरा केला जातो?

जगभरात मदर्स डे वर्षाच्या वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या तारखांना येतो. पण, हा दिवस साजरा करण्यासाठी कोणती विशिष्ट तारीख ठरलेली नसते. मात्र, 10 मे 1914 रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी एक कायदा पास केला होता. ज्यामध्ये असं लिहिण्यात आलं होतं की, मे महिनाच्या दुसऱ्या रविवारी मातृदिन साजरा करण्यात येईल. तेव्हापासून भारत आणि इतर देशांमध्ये मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मातृदिन साजरा केला जाऊ लागला. यंदा मातृदिन (Mother’s Day) 14 मे रोजी आहे.

कसा साजरा केला जातो मातृदिन (Mother’s Day)?

प्रत्येकजण मातृदिन वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात. तसं बघालयला गेलं तर आईवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी एखाद्या खास दिवसाची गरज नसते. पण मातृदिनाच्या दिवशी आईवरील प्रेम व्यक्त करण्याचा खास दिवस असतो, यावेळी काही लोक आर्थिक रुपात, वस्तू रुपात किंवा कामात मदत करुन आईवरील आपलं प्रेम व्यक्त करतात.

हेही वाचा:

Mother's Day 2023: हा मदर्स डे बनवा खास! तुमच्या आईला भेट द्या आर्थिकदृष्ट्या भक्कम बनवणाऱ्या 'या' गोष्टी!

महत्त्वाच्या बातम्या

Health Tips : पावसाळ्यात वाढतोय हिपॅटायटिसचा धोका; यकृताच्या आरोग्यासाठी ‘प्रतिंबध’ हाच उपाय
पावसाळ्यात वाढतोय हिपॅटायटिसचा धोका; यकृताच्या आरोग्यासाठी ‘प्रतिंबध’ हाच उपाय
Health Tips : मेहंदी लावलेल्या हाताने जेवणे किती धोकादायक? जाणून घ्या सत्य
मेहंदी लावलेल्या हाताने जेवणे किती धोकादायक? जाणून घ्या सत्य
Tea : गाड्यावर किती वेळापूर्वी बनवलेला चहा प्यावा? पुन्हा गरम केलेला चहा कधी बनतो विष?
गाड्यावर किती वेळापूर्वी बनवलेला चहा प्यावा? पुन्हा गरम केलेला चहा कधी बनतो विष?
Health: पावसाळ्यात कान-नाकाचा त्रास का वाढतो? संसर्ग होऊ नये यासाठी 'अशी' घ्या खबरदारी, डॉक्टर सांगतात...
पावसाळ्यात कान-नाकाचा त्रास का वाढतो? संसर्ग होऊ नये यासाठी 'अशी' घ्या खबरदारी, डॉक्टर सांगतात...

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिलवकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिलवकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
Embed widget