Monsoon Travel : पावसाळ्यात काश्मीरचे सौंदर्य वेड लावेल तुम्हाला! नजर हटणार नाही, भारतीय रेल्वेकडून ऑगस्टमध्ये फिरण्याची भारी संधी
Monsoon Travel : पावसाळ्याच काश्मीरचे हे सौंदर्य अनुभवण्याची संधी तुम्हाला भारतीय रेल्वे देतेय. ऑगस्टमधील कमी बजेटमधील ट्रॅव्हल प्लॅन एकदा जाणून घ्या..
Monsoon Travel : पृथ्वीवरील स्वर्ग ज्याला म्हटले जाते, अशा काश्मीरमध्ये खरंच एक वेगळीच जादू आहे. आणि ती जादू अनुभवण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी यावे लागेल. असं म्हणतात, पावसाळ्यात इथले सौंदर्य अक्षरश: वेड लावेल तुम्हाला... पावसाळ्यात इथले दृश्य म्हणजे, जणू स्वर्गच खाली अवतरल्याचा भास होतो. तुमची नजर हटणार नाही. आणि तोंडातून आपसूकच आहाहा... शब्द आल्याशिवाय राहणार नाही. काश्मीरचे हे सौंदर्य अनुभवण्याची संधी तुम्हाला भारतीय रेल्वे देतेय. ऑगस्टमधील कमी बजेटमधील ट्रॅव्हल प्लॅन एकदा जाणून घ्या..
काश्मीरची खास गोष्ट म्हणजे...
काश्मीरला पृथ्वीवर स्वर्गाचा दर्जा मिळालेला असला तरी तुम्हाला तिथे जाऊनच याचा अनुभव मिळेल. आजूबाजूला पसरलेली हिरवाई, दूरवर पसरलेली गवताळ प्रदेश, सुरूची झाडे, तलावात तरंगणाऱ्या हाऊसबोट, हवेत सुगंध वेगळाच वातावरण निर्माण करतो. काश्मीरची खास गोष्ट म्हणजे इथे प्रत्येक मोसमात एक वेगळाच नजारा पाहायला मिळतो, त्यामुळे तुम्ही अजून काश्मीरचा अनुभव घेतला नसेल, तर तुम्ही ऑगस्टमध्ये भारतीय रेल्वेच्या IRCTC सोबत योजना करू शकता. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत किंवा मित्रांसोबत प्रवास करण्याचा विचार करत आहात किंवा तुम्ही एकट्याने प्रवास करण्याचा विचार करत आहात? आणि तुमचं काश्मीरला जायचं राहून गेलंय, तर काश्मीर हे प्रत्येक बाबतीत सर्वोत्तम ठिकाण आहे. तुम्ही हे ठिकाण अजून पाहिले नसेल तर तुम्ही ऑगस्टमध्ये भारतीय रेल्वेच्या IRCTC सोबत योजना बनवू शकता.
पॅकेजचे नाव- काश्मीर हेवन ऑन अर्थ एक्स कोईम्बतूर
पॅकेज कालावधी- 5 रात्री आणि 6 दिवस
प्रवास मोड- फ्लाइट
कव्हर केलेले डेस्टीनेशल- श्रीनगर, पहलगाम, सोनमर्ग, गुलमर्ग
Do you often daydream about going on a #trip to #Kashmir? If yes, book #IRCTCTourism's amazing #tour package which includes trips to some of the most breathtaking places in the region.
— IRCTC (@IRCTCofficial) July 24, 2024
Destinations Covered: #Gulmarg, #Pahalgam, #Srinagar, #Sonmarg
Package Price- ₹ 47,250/-… pic.twitter.com/X0krKuRWg0
तुम्हाला या सुविधा मिळतील
तुम्हाला राउंड ट्रिप फ्लाइटसाठी इकॉनॉमी क्लासचे तिकीट मिळेल.
राहण्यासाठी हॉटेल सुविधा उपलब्ध असतील.
या पॅकेजमध्ये नाश्ता आणि रात्रीचे जेवण उपलब्ध असेल.
IRCTC ने ट्विट करून माहिती दिली
IRCTC ने या टूर पॅकेजची माहिती देणारे ट्विट शेअर केले आहे. ज्यामध्ये असे म्हटले आहे की जर तुम्हाला काश्मीरच्या सुंदर दृश्य पाहायचे असेल तर तुम्ही IRCTC च्या या अप्रतिम टूर पॅकेजचा लाभ घेऊ शकता.
या प्रवासासाठी इतके शुल्क आकारले जाईल
या ट्रिपमध्ये तुम्ही एकटे प्रवास करत असाल तर तुम्हाला 53,350 रुपये मोजावे लागतील.
दोन लोकांना प्रति व्यक्ती 48,600 रुपये द्यावे लागतील.
तीन लोकांना प्रति व्यक्ती 47,250 रुपये शुल्क भरावे लागेल.
तुम्हाला मुलांसाठी वेगळी फी भरावी लागेल.
बेडसाठी (5-11 वर्षे) तुम्हाला 38,750 रुपये द्यावे लागतील आणि बेडशिवाय तुम्हाला 36,050 रुपये द्यावे लागतील.
तुम्ही अशी बुकिंग करू शकता
तुम्ही या टूर पॅकेजसाठी IRCTC च्या अधिकृत वेबसाइटवरून बुक करू शकता. याशिवाय, आयआरसीटीसी पर्यटक सुविधा केंद्र आणि क्षेत्रीय कार्यालयांमधूनही बुकिंग करता येते. पॅकेजशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही IRCTC अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.
हेही वाचा>>>
Monsoon Travel : आयुष्यात एकदा तरी पावसाळ्यात 'या' 5 रेल्वे मार्गांवर प्रवास कराच..! हा अनुभव स्वर्गसुखापेक्षा कमी ठरणार नाही
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )