Monsoon Travel : पावसाळ्यात Goa ट्रीप प्लॅन म्हणजे Best Deal! कमी बजेट, कमी गर्दीत मिळेल निवांतपणा, कसं कराल नियोजन?
Monsoon Travel : पावसाळ्यात गोव्याचे नियोजन करावं की करू नये? नेमकं काय करावं? असा प्रश्न तुम्हालाही पडत असेल तर जाणून घ्या..
Monsoon Travel : पावसाळी पिकनिक प्लॅन करताय, आणि त्यात जर गोव्याचं ऑप्शन असेल, तर अनेकजण या ठिकाणी जाणं टाळतात. कारण पावसाळ्यात गोव्याला जाणं सोयीचं नसल्याचं अनेकजण म्हणतात. पण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, की जर तुम्ही पावसाळी पिकनिकच्या ठिकाणांच्या यादीत गोव्याचा समावेश केला नसेल, तर हे ठिकाण निवांतपणे पाहण्याची हीच खरी योग्य संधी आहे. पावसाळ्यात गोव्याची सहल तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरेल. कारण या काळात तुम्ही अगदी कमी बजेटमध्ये प्रवास करण्यापासून ते येथे राहण्यापर्यंत सर्व गोष्टींचे नियोजन करू शकता...
पर्यटन स्थळांवर शांतपणे वेळ घालवता येईल..!
सप्टेंबर ते फेब्रुवारी हे महिने गोव्याला भेट देण्यासाठी सर्वोत्तम मानले जातात, कारण त्या काळात इथले हवामान खूप आल्हाददायक असते, पण खरं सांगायला गेलं तर, गोव्याला प्रवासाची खरी मजा तेव्हाच येते, जेव्हा तुम्ही तिथल्या पर्यटन स्थळांवर थोडा वेळ शांतपणे घालवता. समुद्रकिनाऱ्यावर बसून तुमच्या जोडीदाराशी किंवा मित्रांशी बोलू शकता आणि मुख्य म्हणजे सहलीचा खर्च तुमच्या खिशाला भारी पडणार नाही, पण हिवाळ्यात गोव्याला जाण्याचे नियोजन त्या लोकांसाठी अजिबात योग्य नाही. ज्यांना निवांतपणा आवडतो.
गर्दीपासून दूर
पावसाळ्यात गोव्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या खूप कमी असते, त्यामुळे तुम्ही इथे शांतपणे फिरण्याचा आनंद घेऊ शकता.
स्वस्त विमानप्रवास
मान्सून हा गोव्याचा ऑफ सीझन आहे, त्यामुळे येथील फ्लाइटही स्वस्त होतात. अगदी कमी पैशात तुम्ही एक राऊंड ट्रिप बुक करू शकता.
कमी बजेट हॉटेल
विमान प्रवासासोबत हॉटेल्स आणि होमस्टेच्या किमतीही पावसाळ्यात लक्षणीयरीत्या कमी होतात. तर हिवाळ्यात त्यांच्या किमती दुप्पट राहतात, त्यामुळे तुम्ही कमी पैशात चांगल्या हॉटेलमध्ये राहण्याचा आनंद घेऊ शकता. तुम्ही तुमच्या बजेटमध्ये बीच कॉटेज देखील शोधू शकता.
कोकणी चवींचा आस्वाद घेऊ शकता
गोवा हे मांसाहार करणाऱ्यांसाठी सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे. जिथे परदेशी लोकांनाही सी फूडचं वेड असतं. जर तुम्हालाही त्यांचा आस्वाद घ्यायचा असेल, तर पावसाळ्यापेक्षा चांगले काहीही असू शकत नाही, कारण या ऋतूमध्ये खूप ताजे मासे खाण्यासाठी वापरतात. ते खाल्ल्यानंतर तुम्ही बोटे चाटत राहाल.
हेही वाचा>>>
Monsoon Travel : वीकेंड खास ... ट्रीपही खास! लोणावळा, खंडाळाशिवाय पावसाळ्यात 'ही' ठिकाणं म्हणजे स्वर्गसुखच..! टेन्शन विसरून कराल एन्जॉय
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )