Momos : टेस्टी टेस्टी मोमोज भारतात कसे आले तुम्हाला माहित आहे का? वाचा मोमोजची रंजक गोष्ट
Momos : मोमोज सर्वात आधी 14 व्या शतकाच्या आसपास बनविण्यात आले होते.
Momos : आजकालच्या तरूणाईबरोबर सगळ्यांनाच मोमोज (Momos) हे नाव माहीत आहे. भाज्या आणि चिकनने भरलेला हा पदार्थ लोकांच्या हृदयावर इतका राज्य करत आहे की, लोकांना त्याचे वेड लागले आहे. आजकाल या वाफवलेल्या पदार्थाची अनेक व्हरायटी येऊ लागली आहे. ज्यात फ्राय मोमोज ते चीज मोमोज यांचा समावेश आहे. मसालेदार चटणीच्या अप्रतिम चवीचा विचार करूनच तोंडाला पाणी सुटते. पण, मोमोज नावाचा हा पदार्थ भारतात इतका लोकप्रिय कसा झाला हे तुम्हाला माहित आहे का? नसेल तर वाचा संपूर्ण माहिती.
मोमोज कुठून आले?
तसं बघायला गेलं तर मोमोजचा इतिहास फार जुना आहे. अनेक देशांतून फिरून हा पदार्थ भारतात पोहोचला आहे. मोमोज सर्वात आधी 14 व्या शतकाच्या आसपास मोमोज बनविण्यात आले होते. मात्र, तिबेट आणि नेपाळ हे दोन्ही देश मोमोजचं मूळ ठिकाण मानलं जातं. असा दोन्ही देश दावाही करतात. भारतात आल्यावर इथल्या चवीनुसार मोमोजमध्ये बदल करण्यात आले. असे मानले जाते की, 1960 च्या दशकात मोठ्या संख्येने तिबेटी भारतात आले आणि लडाख, दार्जिलिंग, धर्मशाळा, सिक्कीम आणि दिल्ली सारख्या भागात स्थायिक झाले. तसेच मोमोजची सर्वाधिक विविधता बदलत गेली.
भारतात मोमोज कसे आले?
तिबेटीयन देशात प्रसिद्ध असलेले मोमो भारतात कसे आले याची गोष्टही रंजक आहे. असं म्हटलं जातं की, काठमांडूचा एक दुकानदार भारतात आला आणि व्यापारामुळे ही तिबेटी रेसिपीही त्याच्याबरोबर भारतात पोहोचली.आणि त्यानंतर भारतात हा पदार्थ आणखी प्रचलित होत गेला.
भारतात आढळणारे विविध चवीचे मोमोज
सुरुवातीला मोमोज मांस भरून बनवले गेले. विशेषतः याक या प्राण्याचे मांस त्यात वापरले जायचे. पण, तिबेटच्या डोंगरावरून उतरून हा पदार्थ उत्तर भारताकडे आल्यावर चवीनुसार भाजी भरूनही तयार करण्यात आला. मग ती कोणतेही पाककृती असो, भारतात त्याची चव बदलत गेली. असेच काहीसे मोमोजच्या बाबतीत घडले आहे. भारतातील रस्त्यांपासून ते पंचतारांकित हॉटेल्सपर्यंत, मसालेदार चिकन मांस, पनीर, भाज्या, चीज, डुकराचे मांस आणि सीफूडसह अनेक प्रकारचे मोमोज पाहायला मिळतात.
महत्त्वाच्या बातम्या :