एक्स्प्लोर

Makar Sankranti 2024 : मकरसंक्रांतीला बनवली जाणारी खिचडी आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी; वाचा आश्चर्यकारक फायदे

Makar Sankranti 2024 : मकर संक्रांतीचा दिवस अतिशय शुभ मानला जातो, त्यामुळे या दिवशी स्नान, दान यांसारखी अनेक कामे करून पुण्य मिळवता येते.

Makar Sankranti 2024 : मकर संक्रांतीच्या (Makar Sankranti 2024) सणाला विशेष महत्त्व आहे कारण कॅलेंडरनुसार हिंदू धर्मात नवीन वर्षाची सुरुवात या दिवसापासून होते. मकर संक्रांतीचा दिवस अतिशय शुभ मानला जातो, त्यामुळे या दिवशी स्नान, दान यांसारखी अनेक कामे करून पुण्य मिळवता येते. संक्रांतीच्या दिवशी घरोघरी तिळाचे लाडू, चिक्की तर बनवले जातातच. पण, त्याचबरोबर या दिवशी काही राज्यांत जसे की, राजस्थान आणि उत्तर भारतात खिचडी बनवण्याची देखील परंपरा आहे. या पारंपारिक खाद्यपदार्थाचेही अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. आरोग्यासाठी खिचडी कशी फायदेशीर आहे ते जाणून घ्या. 

पचन सुधारते 

पोटाचे आरोग्य बिघडल्यास तांदूळ आणि डाळीपासून बनवलेली सकस खिचडी खाण्याचा सल्ला दिला जातो. खरंतर, हे हलके अन्न आहे जे पचायला अगदी सोपे आहे. कमी मसाले आणि संपूर्ण धान्य घालून बनवलेली खिचडी चवीलाही छान लागते. जर तुम्ही नियमितपणे याचे सेवन केले तर तुम्हाला फायबरसह अनेक पोषक तत्त्व मिळतात. 

हृदयासाठी फायदेशीर

कमी तेल, तूप आणि हळद-मीठ घालून तयार केलेली खिचडी हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते. हळदीसारख्या गोष्टी खाण्याचा सल्लाही डॉक्टर किंवा तज्ज्ञ हृदयरोग्यांना देतात.

वजन कमी करण्यास उपयुक्त

ज्या लोकांना वजन कमी करायचं आहे अशा लोकांना खिचडी सारखे हलके पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. खरंतर, खिचडीतील पोषक घटक आपली चयापचय सुधारण्यास मदत करतात. चयापचय गती ठीक राहिल्यास वजन कमी होण्यास मदत होते. याशिवाय हेल्दी डिश खाल्ल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते. 

पोषक तत्वांनी समृद्ध

जिममध्ये जाणाऱ्यांनाही खिचडी खाण्याचा सल्ला दिला जातो. खरंतर, त्यात प्रथिने असतात. याशिवाय खिचडीमध्ये कार्बोहायड्रेट, लोह, फायबर, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम यांसारख्या खनिजे भरपूर प्रमाणात असतात. हे सर्व घटक ते खूप प्रभावी करतात.

'अशी' बनवा हेल्दी खिचडी

तुम्हाला हवे असल्यास इतर भाज्यांचा समावेश करून तुम्ही व्हेजिटेबल खिचडी देखील तयार करू शकता. मूग डाळ आणि तांदूळ यातील पौष्टिक घटकांव्यतिरिक्त, त्यात भाज्यांच्या पोषक तत्वांचा समावेश केल्यास दुहेरी फायदे मिळू शकतात. अशा प्रकारचे अन्न खाल्ल्याने आपले शरीर डिटॉक्सिफाईड होते. त्यामुळे मकर संक्रांतीला तयार केलेली खिचडी आतापासूनच आहाराचा भाग बनवा.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

महत्त्वाच्या बातम्या :

Makar Sankranti 2024 : ‘तिळगुळ घ्या गोड गोड बोला’! वाचा मकर संक्रांतीच्या काही रंजक गोष्टी...

महत्त्वाच्या बातम्या

Laxman Hake and Manoj Jarange Patil: तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
Mira Bhayandar Accident News: भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
BMC BEST Depot Redevelopment: मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Laxman Hake and Manoj Jarange Patil: तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
Mira Bhayandar Accident News: भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
BMC BEST Depot Redevelopment: मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
CM Devendra Fadnavis Maharashtra Government: मोठी बातमी: मुख्यमंत्र्यांना कोणत्याही मंत्र्याचा निर्णय फिरवण्याचा अधिकार, राज्य सरकारकडून नियमात महत्त्वाचा बदल
मोठी बातमी: मुख्यमंत्र्यांना कोणत्याही मंत्र्याचा निर्णय फिरवण्याचा अधिकार, राज्य सरकारकडून नियमात महत्त्वाचा बदल
Embed widget