(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Makar Sankranti 2022 : 'तीळ गूळ घ्या, गोड बोला', यंदा मकर संक्रांत 14 जानेवारीला; जाणून घ्या शुभ मुहुर्त आणि महत्व
मकर संक्रांतीचा (MAKAR SANKRANTI ) सण पंचांगानुसार पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वादशी म्हणजेच14 जानेवारीला साजरा केला जाईल.
Makar Sankranti 2022 Date : मकर संक्रांतीच्या दिवशी 'तीळ गूळ घ्या, गोड बोला' असं म्हणत सर्वांना तिळ आणि गूळ वाटले जाते. या वर्षी मकर संक्रांतीचा (MAKAR SANKRANTI ) सण पंचांगानुसार पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वादशी म्हणजेच 14 जानेवारीला साजरा केला जाईल. ज्योतिषाचार्यांच्या मते, जर सूर्यास्ताच्या आधी सूर्याने मकर राशीत प्रवेश केला तर या दिवशी पुण्यकाळ असेल.
ज्योतिषाचार्यांच्या मते, यावर्षी पुण्यकाळा हा 14 जानेवारी सकाळी आठ वाजून पाच मिनीटांनी सुरू होणार आहे. हा पुण्यकाळ संध्याकाळी 5 वाजून 44 मिनीटांपर्यंत राहणार आहे. या काळात तुम्ही देवाचे नामस्मरण करू शकता.
संक्रांतीच्या दिवशी अंघोळ झाल्यानंतर एका तांब्यामध्ये लाल फूल आणि अक्षदा घ्या. हे सूर्य देवाला समर्पित करा. सूर्य देवाच्या बीज मंत्राचा जप संक्रांतीच्या दिवशी करा. तसेच तुम्ही या दिवशी अन्न, तीळ आणि तूप दान करू शकता. संक्रांतीला खिचडी खा. मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ आणि खिचडी दान करणे अत्यंत शुभ मानले जाते.
मकर संक्रांतीचे महत्व
मकर संक्रांतीच्या सणाला काही ठिकाणी उत्तरायण असेही म्हणतात. मकर संक्रांतीच्या दिवशी गंगेत स्नान, उपवास, कथा, दान आणि भगवान सूर्यदेवाची आराधना या सर्व गोष्टींना विशेष महत्व दिले जाते. तसेच तिळ, गूळ आणि मिठाई या दिवशी वाटल्या जातात. तसेच मकर संक्रांतीला अनेक जण पतंदग देखील उडवतात.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
संबंधित बातम्या
Weight Gain : जाणून घ्या वजन वाढवण्यासाठी काय खावे आणि काय खाऊ नये
Winter Skin Care Tips : टोमॅटोचा असा करा वापर, हिवाळ्यातही त्वचा होईल तजेलदार
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha