तीळ गूळ, घ्या गोड बोला... आज मकर संक्रांत; जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि राहु काळ
Makar Sankranti 2022 : जाणून घेऊयात शुभ मुहूर्त आणि राहू काळाबाद्दल
Makar Sankranti 2022 : आज मकर संक्रांत आहे. आज तीळ गूळ घ्या गोड बोला असं म्हणतं तीळाच्या वड्या वाटल्या जातात. पंचांगानुसार, आज चंद्र हा वृषभ राशीमध्ये विराजमान झाला आहे. जाणून घेऊयात मकर संक्रांतीचा शुभ मुहूर्त आणि राहू काळ
आजची तिथी : आज पैष महिन्याची शुक्ल पक्षाची द्वादशी तिथी आहे.जी रात्री 10 वाजून 21 मिनीटांपर्यंत राहणार आहे. त्यानंतर त्रयोदशी तिथीची सुरूवात होईल.
आजचे नक्षत्र : पंचांगानुसार आज रोहिणी नक्षत्र आहे. हे नक्षत्र दुपारी 2 वाजेपर्यंत राहणार आहे. आज साध्य योगची निर्मीती होणार आहे.
धार्मिक दृष्ट्या आजचा दिवस हा विशेष आहे. आज मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य देवाची पूजा केली जाते. सूर्याची पूजा केल्याने जीवनात सुख समृद्धी येते. मकर संक्रांतीला दान केल्याने पुण्य मिळते.
शुभ मुहूर्तची वेळ ही 12:09:12 ते 12:51:12 पर्यंत असणार आहे.
आजचा राहु काळ
पंचांगानुसार, आज राहु काळ हा 11 वाजून 11 मिनीटांनी सुरू होणार आहे. हा राहू काळ 12 वाजून 30 मिनीटांपर्यंत राहणार आहे. राहू काळात कोणतेही शूभ कार्य करू नये.
आजचा अशुभ मुहूर्त
दुष्टमुहूर्त: 09:21:13 ते 10:03:13 पर्यंत, 12:51:12 ते 13:33:12 पर्यंत
कुलिक: 09:21:13 ते 10:03:13 पर्यंत
कंटक: 13:33:12 ते 14:15:11 पर्यंत
कालवेला / अर्द्धयाम: 14:57:11 ते 15:39:11 पर्यंत
यमघण्ट: 16:21:11 ते 17:03:11 पर्यंत
यमगण्ड: 15:07:41 ते 16:26:26 पर्यंत
गुलिक काळ: 08:33:58 ते 09:52:43 पर्यंत
'या' गोष्टींचं दान करणं शुभ
तीळ आणि खिचडी दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. मकर संक्रांतीला गुळ दान केल्याने घरात धनसंपत्ती येते तसेच तुम्हाला पैशाची कमतरता कधीच भासणार नाही.
संबंधित बातम्या
Makar Sankranti 2022 Rashifal : मकर सक्रांतीला करा राशीनुसार दान; 'या' गोष्टींचं दान करणं शुभ
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha