(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Makar Sankranti 2021 | सुख-समाधानासाठी मकर संक्रांतीला राशीनुसार करा दान
Makar Sankranti 2021 : मकर संक्रांतीच्या दिवशी राशीनुसार, दान करणं शुभ मानलं जातं. त्यामुळे जीवन आनंदी होण्यासोबतच आयुष्यात सुख शांती मिळण्यासही मदत होते.
Makar Sankranti 2021 : 14 जानेवारी रोजी देशभरात मकर संक्रांतीचा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याची पूजा केली जाते. हिंदू पंचांगाप्रमाणे पौष महिन्यात मकरसंक्रांत साजरी केली जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. या प्रक्रियेला संक्रांती म्हटलं जातं. तसेच या दिवशी सूर्य हा धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. म्हणून याला मकर संक्रांत असं म्हणतात.
पंचांगानुसार, मकरसंक्रांतीचा उत्सव 14 जानेवारी रोजी साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी सूर्य देव धनु राशीतून बाहेर पडून मकर राशीत प्रवेश करतो. त्यामुळे या दिवशी सूर्य देवाची पूजा केली जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी राशीनुसार, दान करणं शुभ मानलं जातं. जाणून घ्या मकर संक्रांतीच्या दिवशी राशीनुसार कोणत्या वस्तुंच दान करणं फायदेशीर ठरतं त्याबाबत...
मेष रास
मेष राशीच्या व्यक्तींनी मकर संक्रांतीच्या दिवशी आंघोळीनंतर शुभ मुहूर्तावर गरजुंना रेशमी कपडे, डाळ, गोड भात, तीळ, मिठाई, खिचडी आणि गरम कपड्यांचं दान करावं. यामुळे तुमच्या जीवनात सुख-समृद्धी नांदेल.
वृषभ रास
मकर संक्रांतीच्या दिवशी वृषभ राशीच्या लोकांनी गरजुंना उडदाच्या डाळीची खिचडी, काळं वस्त्र, काळे तीळ, काळे उडीद, मोहरीच्या तेलाचं दान करा. यामुळे तुमचं आरोग्य उत्तम राखण्यास मदत होईल आणि बऱ्याच काळापासून सुरु असलेला जमिनीचा वादही सुटेल.
मिथुन रास
मिथुन राशीच्या व्यक्तींनी मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडी, बेसनाचे लाडू, मोहरीचं तेल, काळे तीळ, उडीद दान करणं शुभ ठरतं. असं केल्यानं नोकरी आणि व्यापारात लाभ होतो.
कर्क रास
कर्क राशीच्या व्यक्तींनी मकर संक्रांतीच्या दिवशी गरजुंना काळ्या चण्याची डाळ, हळद, पिवळे वस्त्र, केशर, पितळेची भांडी, फळं आणि खिचडी दान करणं शुभ असतं. असं केल्यानं नोकरीमध्ये येणारे अडथळे दूर होतात. हे दान सकाळी 8 वाजेपर्यंय करा.
सिंह रास
सिंह राशीच्या व्यक्ती मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्योदयानंतर आंघोळ करुन लाल वस्त्र, मसूरची डाळ, खिचडी, रेवडी, गुळ आणि तेल दान करणं फायदेशीर ठरतं. असं केल्यानं कुटुंबातील वाद-विवाद दूर होतात.
कन्या रास
कन्या राशीच्या व्यक्तींनी मकर संक्रांतीच्या दिवशी हिरवे वस्त्र, मूग, हिरव्या भाज्या, शेंगदाणे आणि खिचडी दान करणं फायदेशीर ठरतं.
तुळ रास
तुळ राशीच्या व्यक्ती गरजू व्यक्ती मकर संक्रांतीच्या दिवशी पांढरी मिठाई, गुलाबी वस्त्र, साखर, खिचडी, फळं आणि गुलाबाचं अत्तर दान करणं फायदेशीर ठरतं. यामुळे कुटुंबात सुख शांती राखण्यास मदत होते.
वृश्चिक रास
वृश्चिक राशीच्या व्यक्ती मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर गरिबांमध्ये ब्लॅकेट, खिचडी, वाटाणे, फळं आणि तीळ दान करणं शुभ असतं. असं केल्याने त्यांच्या जीवनात आनंद येतो.
धनु रास
धनु राशीच्या व्यक्तींनी मकर संक्रांतीच्या दिवशी गरजू व्यक्तींना गूळ, शेंगदाणे, लाल वस्त्र, लाल चंदन, तांब्याची भांडी दान करणं फायदेशीर ठरतं. त्यामुळे आरोग्य उत्तम राखण्यात मदत होते.
मकर रास
मकर राशीच्या व्यक्तींनी खिचडी, ब्लॅकेट, गुळ, शेंगदाणे आणि हिरवी वस्त्र दान करणं फायदेशीर ठरतं.
कुंभ रास
कुंभ राशीच्या व्यक्तींनी मकर संक्रांतीच्या दिवशी गरम कपडे, खिचडी आणि तेल दान करणं फायदेशीर ठरतं. यामुळे उत्तम आरोग्य राखण्यास मदत होते. तसेच घर आनंदी राहतं.
मीन रास
मीन राशीच्या व्यक्ती मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ, गूळ आणि शेंगदाण्यांचं दान करणं फायदेशीर ठरतं. यामुळे तुमच्या आयुष्यात तणाव कमी होतो आणि धनाचा लाभ होतो.
महत्त्वाच्या इतर बातम्या :