Plastic Bottle : प्लॅस्टिकच्या बाटलीतून पाणी पिणं आरोग्यासाठी चांगलं आहे का?
Use Of Plastic Bottle : प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पिणे हे आरोग्यास खरंच चांगलं आहे का? याबाबत आपल्याला माहिती नसते. याबाबत जाणून घेऊयात...
Plastic Bottle : आपण जनरली कुठंही घराबाहेर पडत असलो की सोबत पाण्याची बॉटल ठेवतोच. यात बहुतांश बॉटल्स या प्लॅस्टिकच्या असतात. लहान मुलांना देखील बऱ्याचदा आपण प्लॅस्टिकच्या पाण्याची बॉटल देतो. शिवाय बऱ्याच घरांमध्ये देखील प्लॅस्टिकच्या पाण्याच्या बाटल्या वापरल्या जातात. मात्र प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पिणे हे आरोग्यास खरंच चांगलं आहे का? याबाबत आपल्याला माहिती नसते.
साधारणत: प्लॅस्टिकच्या बाटल्यांमध्ये बिसफेनोल ए (BPA) हे एक रसायन असतं. हे पाण्यासोबत मिसळून शरीरात गेल्यास हानीकारक ठरू शकतं. त्यामुळे पाण्यासाठी बाटली विकत घेताना ती BPA विरहीत असेल, याकडे लक्ष द्यायला हवं. बहुतेक प्लॅस्टिकच्या बाटल्यांमध्ये BPA असतं. त्यामुळे काचेची बाटली उपयोगी ठरू शकते.
काचेच्या बाटलीत पाणी कितीही दिवस राहू शकतं, मात्र प्लॅस्टिकच्या बाटलीत जास्त दिवस पाणी ठेवल्यास त्याची चव बदलते. पाण्याची प्लॅस्टिक बाटली जर उन्हात ठेवल्यास आणि ते पाणी प्यायल्यास शरीराला घातक ठरू शकतं. कारण सूर्यकिरणांमुळे BPA रसायन पाण्यात तातडीने मिसळलं जातं. त्यामुळे पाण्याची प्लॅस्टिक बाटली वापरणार असाल, तर ती सावलीत ठेवा.
जर तुम्ही लिंबू पाणी सोबत ठेवत असाल, तर काचेच्या बाटलीचाच पर्याय उत्तम ठरू शकतो. कारण प्लॅस्टिक बाटलीतील रसायनामुळं त्याचा स्वाद बिघडतो. प्लॅस्टिकची बाटली योग्यप्रकारे न धुतल्यास त्यामध्ये जीवाणूंची पैदास होऊ शकते. दुसरीकडे प्लॅस्टिक बाटलीपेक्षा काचेची बाटली स्वच्छ करणं सहज शक्य आहे.
लहान मुलांनाही काचेच्याच बाटलीतून दूध पाजणं फायदेशीर आहे. काचेची बाटली फुटण्याचा धोका असतो, त्यामुळे बाटली घेताना त्यावर सिलिकॉन कव्हर असलेली बाटली निवडा. प्लॅस्टिकच्या प्रत्येक बाटलीचा पुनर्वापर करता येऊ शकत नाही. कोल्ड्रिंक्सच्या बाटल्यांचाही पुनर्वापर करता येत नाही. या बाटल्यांच्या वरच्या बाजूला एक त्रिकोण असतो, त्यावर 1 लिहिलेलं असतं. त्याचा अर्थ या बाटलीचा केवळ एकदाच वापर होऊ शकतो. या बाटल्यांचा पुनर्वापर केल्यास, तुम्ही आजारी पडू शकता.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :
- Thyroid : थायरॉइड झाल्यावर चहा पिणं योग्य? जाणून घ्या सविस्तर
- Weight Loss : वजन कमी करताना करु नका 'ही' चूक, होईल नुकसान; वाचा सविस्तर
- Fungal Infection : पावसाळ्यात फंगल इंफेक्शनचा धोका, अशी मिळवा सुटका
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )