(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Health Tips : आठ तास झोपल्यानंतरही दिवसा सतत झोपावंसं वाटतं? वेळीच सावध व्हा, होऊ शकतो 'या' आजाराचा धोका
Health Tips : रात्री चांगली झोप येत असूनही तुम्ही दिवसा झोपत राहिल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
Health Tips : निरोगी शरीरासाठी माणसाला पुरेशी झोप मिळणे खूप महत्वाचे आहे. चांगल्या आरोग्यासाठी किमान 7 ते 8 तासांची झोप आवश्यक आहे असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. मात्र, काही लोकांना 7 तासांहून अधिक झाेप लागते. सतत सुस्ती येते. झोप येते. पुरेशी झोप घेतल्यानंतरही त्यांना दिवसभर सतत झोपतच राहावं असं वाटतं. यामुळे तुम्ही गरजेपेक्षा जास्त झोपता. हेच गरजेपेक्षा जास्त झोपणं एखाद्या आजाराचंही लक्षण असू शकतं. कारण ही एक वैद्यकीय स्थिती आहे ज्याला हायपरसोम्निया (Hypersomnia) म्हणतात.
हायपरसोम्निया म्हणजे काय?
हायपरसोम्नियामध्ये, एखादी व्यक्ती सतत झोपत राहते. विशेषतः झोपेतून उठल्यानंतर त्या व्यक्तीला पुन्हा झोप आल्यासारखे वाटते. झोपेचा दबाव इतका प्रभावी असतो की माणूस झोपल्याशिवाय राहू शकत नाही. हे दररोज घडत असल्याने दैनंदिन कामे देखील पूर्ण करण्यात अडचणी येऊ शकतात.
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, हायपरसोम्निया हा दिवसा झोपेचा अनुभव घेण्यापेक्षा वेगळा समजला पाहिजे. कारण रात्री चांगली झोप न मिळाल्याने दिवसभरात अनेकदा झोप येत राहते. तर हायपरसोम्नियामध्ये एखादी व्यक्ती 7 ते 8 तास शांत झोप घेते, तरीही दिवसभरात थकवा जाणवतो आणि सतत झोपतो. हे सामान्य झोपेच्या गरजेपेक्षा जास्त होते.
हायपरसोम्नियाची समस्या काय आहे?
जर रात्रीची झोप कमी होणे हे हायपरसोम्नियाचे मुख्य कारण नसेल तर त्याचे नेमके कारण काय? असा प्रश्न तम्हाला पडला असेल. तर, डॉक्टर म्हणतात की, त्याची सामान्य कारणे औषधांच्या प्रभावामुळे किंवा अनुवांशिक पूर्वस्थिती, नार्कोलेप्सी किंवा स्लीप एपनियामुळे असू शकतात. याशिवाय फुफ्फुसाचा आजार किंवा न्यूरोलॉजिकल समस्या किंवा मेंदूच्या काही समस्यांमुळेही हायपरसोम्निया होऊ शकतो, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. हायपरसोम्नियामागे काही खास कारण नसल्याचंही डॉक्टर सांगतात.
ही समस्या कोणाला होऊ शकते?
स्त्रियांना हायपरसोम्निया होण्याची अधिक शक्यता असते. या व्यतिरिक्त, सामान्यतः तरूण आणि प्रौढ, ज्यांचे वय 24 ते 27 वर्ष आहे, अशा लोकांमध्ये ही समस्या असू शकते. तज्ञांच्या म्हणण्यानुसार, ही परिस्थिती थांबविणे कठीण आहे. मात्र, या परिस्थितीपासून तुम्हाला जर दूर जायचे असेल तर तुमचा दिनक्रम, दिवसभराचे वेळापत्रक चांगले असणे गरजेचे आहे. तसेच, अल्कोहोलपासून दूर राहून आणि निरोगी जीवनशैलीचे पालन करूनच यावर नियंत्रण ठेवता येते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :
Pregnancy Health Tips : गरोदरपणात वारंवार भूक लागतेय? हे 'सुपर स्नॅक्स' खा आणि हेल्दी राहा