International Tiger Day 2024: 'वाघाची डरकाळी..पर्यावरण संवर्धनाची हाकच जणू!' जागतिक व्याघ्र दिनानिमित्त जाणून घ्या, वाघ...बिबट्या...चित्ता यातील फरक कसा ओळखाल?
International Tiger Day 2024: पर्यावरणाचा समतोल राखण्यात वाघांची मोठी भूमिका आहे, त्यांचा ऱ्हास अनेक प्रकारे पर्यावरणाला हानी पोहोचवू शकतो.
International Tiger Day 2024 : आज पर्यावरणाचा समतोल राखणं ही काळाची गरज आहे, यात वाघांची भूमिका फार मोठी आणि महत्त्वाची आहे. 29 जुलै हा आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन साजरा केला जातो. ज्याचा उद्देश लोकांना वाघाचे महत्त्व आणि आपल्या पर्यावरणाचा समतोल राखणे कसे महत्त्वाचे आहे याबद्दल जागरूक करणे हा आहे. मात्र अनेकांना वाघ, बिबट्या आणि चित्ता यातील फरक माहीत नाही. आज आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त जाणून घ्या महत्त्वाची माहिती..
वाघांचा ऱ्हास अनेक प्रकारे पर्यावरणाला हानी पोहोचवू
हजारो वर्षांपूर्वी, जगभरात वाघांची चांगली संख्या होती, जे जंगलांवर राज्य करत असत, परंतु 21 व्या शतकाच्या आगमनाने वाघांची संख्या झपाट्याने कमी होऊ लागली. ज्यासाठी बेकायदेशीर शिकार हे एक मोठे कारण होते, पृथ्वावरील हवामान बदल आणि मोठ्या प्रमाणात होणारी जंगलतोड ही देखील मोठी भूमिका बजावते. तुम्हाला हे वाचून कदाचित आश्चर्य वाटेल की, पर्यावरणाचा समतोल राखण्यात वाघांची मोठी भूमिका आहे, त्यांचा ऱ्हास अनेक प्रकारे पर्यावरणाला हानी पोहोचवू शकतो. याबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने दरवर्षी 29 जुलै रोजी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन साजरा केला जातो. 'टायगर डे' का साजरा केला जातो याबद्दल आपण जाणून घेतले, पण तुम्हाला वाघ, बिबट्या, चित्ता आणि सिंह यातील फरक माहित आहे का? ते सर्व बऱ्याच प्रमाणात सारखे दिसतात, परंतु त्यांचा आकार, स्वभाव आणि शरीरावर असलेले पट्टे आणि डाग त्यांना एकमेकांपासून वेगळे दर्शवितात. त्यांच्याबद्दल जाणून घेऊया.
आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन म्हणजे काय?
आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन 2024 बद्दल बोलतांना, हा दिवस लोकांना जागरुक करण्यासाठी आहे की, ही वाघांची प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे आणि या निमित्ताने जागतिक स्तरावरील लोकांना सांगण्यासाठी आहे की, वाघांना वाचवण्यासाठी आणि जतन करण्यासाठी पुढे यावे. वाघांचा अधिवास, त्यांची बेकायदेशीर शिकार, त्यांच्या अधिवासातील मानवी अतिक्रमण या बाबी सरकारने थांबवाव्यात, असाही या दिवसाचा मुद्दा आहे.
आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन 2024 चा इतिहास काय आहे?
जर आपण आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन 2024 च्या इतिहासाबद्दल बोललो तर, 2010 मध्ये सेंट पीटर्सबर्ग टायगर समिट दरम्यान हा आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन साजरा करण्यास सुरुवात झाली. या कार्यक्रमाचे आयोजन ग्लोबल टायगर इनिशिएटिव्ह (GTI) द्वारे करण्यात आले होते आणि या कार्यक्रमाचे उद्दिष्ट व्याघ्र संवर्धनासाठी समर्पित राष्ट्रे, आंतरराष्ट्रीय संस्था आणि संवर्धन गटांना या लुप्तप्राय प्राण्याबद्दल विचार करण्यासाठी एकत्र आणणे, त्यामुळे धोक्यात आलेल्या जागतिक स्तरावर होणारी घसरण पाहणे हा होता. या सर्व बाबी लक्षात घेऊन व्याघ्र श्रेणीतील देशांनी 29 जुलै रोजी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन 2024 साजरा करण्याचा निर्णय घेतला.
आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन 2024 चे महत्त्व काय आहे?
आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन 2024 चा उद्देश हा आहे की या लुप्तप्राय प्रजातीच्या धोक्यासाठी सरकारने कठोर शिक्षा केली पाहिजे, जेणेकरुन लोकांची शिकार थांबवता येईल, यासोबतच ही प्रजाती हळूहळू लुप्त कशी होत चालली आहे, याबद्दल लोकांना शिक्षित केले पाहिजे. सर्व देशांनी पुढे येऊन जागतिक स्तरावर अधिकाधिक व्याघ्र संवर्धन अभयारण्य निर्माण केले पाहिजे, जेणेकरुन वाघांना सुरक्षित आणि संरक्षित करता येतील....
आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन 2024 ची थीम काय आहे?
आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन 2024 ची थीम व्याघ्र संवर्धन आणि या प्राण्यांना भेडसावणाऱ्या तत्काळ धोक्यांबद्दल जागरुकता निर्माण करणे आहे, जसे की अधिवास नष्ट होणे, शिकार करणे आणि मानव-वन्यजीव संघर्ष.
वाघ कसे ओळखायचे?
वाघ कोण आणि सिंह कोण चित्ता असा संभ्रम अनेक वेळा पडतो. त्यांच्यातील फरक कसा ओळखायचा? जाणून घ्या..
वाघ
वाघाच्या अंगावर काळ्या पट्ट्या आहेत. तर बिबट्या आणि चित्ता यांच्या अंगावर गोल ठिपके असतात. विशेष म्हणजे प्रत्येक वाघाच्या शरीरावर वेगवेगळ्या प्रकारचे पट्टे असतात.
बिबट्या
बिबट्याच्या त्वचेचा रंग पिवळा असून शरीरावर छोटे काळे डाग असतात. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते सहजपणे झाडांवर चढतात आणि झाडांवर राहतात.
चित्ता
चित्ता दिसायला अगदी बिबट्यांसारखाच असतो, पण डोळ्यांपासून तोंडापर्यंत खोल काळी रेषा असते.
सिंह
नर सिंहाची ओळख म्हणजे त्याची जाड दाढी. मादी सिंहाला दाढी नसते. सिंहाची गर्जना 8 किमी दूरवरूनही ऐकू येते.
जगात वाघांच्या फक्त 5 जाती शिल्लक
वाघ जितका सुंदर प्राणी आहे तितकाच धोकादायक आहे. जगात वाघांच्या फक्त 5 जाती (बंगाल टायगर, इंडो-चायनीज, साउथ चायना, सुमात्रान आणि सायबेरियन) शिल्लक आहेत. चांगली गोष्ट म्हणजे जगातील सुमारे ७० टक्के वाघ भारतात राहतात. शिकारीमुळे, त्यांची संख्या जगात लक्षणीयरीत्या कमी झाली होती, परंतु आता हळूहळू वाढत आहे.
हेही वाचा>>>
World Hepatitis Day : चुकूनही दुर्लक्ष करू नका, तुमच्या मुलांना 'हिपॅटायटीस' झाल्याचं कसं ओळखाल? 'ही' लक्षणं तर नाही ना? डॉक्टर सांगतात...
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )