(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Daughters Day 2024: लेक माहेराचं सोनं..! आंतरराष्ट्रीय कन्या दिनानिमित्त लाडक्या लेकीला खास शुभेच्छा संदेश पाठवा
International Daughters Day 2024 Wishes In Marathi : आजचा आंतरराष्ट्रीय कन्या दिन साजरा करण्यासाठी आम्ही तुम्हाला काही खास शुभेच्छा संदेश शेअर करत आहोत.
International Daughters Day 2024 Wishes In Marathi : घरात वाढणारी मुलगी कुटुंबातील सर्व सदस्यांशी नाते टिकवून ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. लहानपणापासून आई-वडिलांचे घर आनंदाने भरून टाकणाऱ्या मुलींचा आजही या पुरुषप्रधान जगात सासरच्या मंडळींकडून, समाजाकडून छळ होत असतो, कोलकाता बलात्कार प्रकरण असो किंवा कोपर्डी, दिल्ली निर्भया प्रकरण अनेक वेळेस मुलींवर अत्याचार होताना दिसत आहे. यामुळे मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न समोर येतोय. विविध ठिकाणी मुलींशी भेदभाव करणे आणि त्यांच्या प्रतिष्ठेशी खेळणे हे सर्वच ठिकाणी अधिक रूढ झाले आहे.
आंतरराष्ट्रीय कन्या दिनाचा उद्देश
आंतरराष्ट्रीय कन्या दिवस दरवर्षी सप्टेंबर महिन्यात चौथ्या रविवारी जगभरात साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश मुलींबाबत विविध प्रश्नावर विचार करणे आणि त्यांच्या कल्याणासाठी सक्रिय पावले उचलणे, अशा समाजात जेथे मुली/स्त्रिया पुरुषांपेक्षा कनिष्ठ समजल्या जातात.हा दिवस केवळ मुलींचे महत्त्व समजावून सांगण्यासाठीच नाही तर समाजात मुलींबद्दल प्रेम आणि आदर निर्माण करण्यासाठीही साजरा केला जातो. आजही अनेक ठिकाणी आई-वडिलांसाठी मुलींपेक्षा मुलं जास्त खास असतात ही भावना दूर झालेली नाही. जर तुम्ही तुमच्या मुलींसोबत हा दिवस साजरा केला तर तुमच्या मुलीलाही तुमच्या मनात विशेष स्थान असल्याची जाणीव होईल. यंदाचा आंतरराष्ट्रीय कन्या दिन साजरा करण्यासाठी आम्ही तुम्हाला काही खास शुभेच्छा संदेश (Happy Daughters Day Wishes In Marathi) शेअर करत आहोत.
आंतरराष्ट्रीय कन्या दिनानिमित्त लाडक्या लेकीला खास शुभेच्छा संदेश पाठवा
एक तरी मुलगी असावी,
कळी उमलताना पाहता यावी,
मनातील गुपितं तिने हळुच माझ्या कानी सांगावी.
आंतरराष्ट्रीय कन्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
पाहुनी रूप गोंडस मनी माया दाटते,
अशी कळी मग गर्भातच का नकोशी वाटते.
मुलींना जगवा, मुलींना वाचवा.
आंतरराष्ट्रीय कन्या दिनाच्या शुभेच्छा
वंशाचा दिवा मुलगा असेल…
पण’ती’च नसेल तर दिवा कसा लागेल.
आंतरराष्ट्रीय कन्या दिनाच्या शुभेच्छा
मुली नेहमीच स्पेशल असतात,
कारण त्यांच्याशिवाय घराला शोभा नाही.
आंतरराष्ट्रीय कन्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
लेक हे असं खास फुल आहे
जे प्रत्येक बागेत फुलत नाही.
माझ्या बागेत फुललं
यासाठी देवा मी तुझा आभारी आहे.
आंतरराष्ट्रीय कन्या दिन शुभेच्छा
लेक वाचवा, देश घडवा.
आंतरराष्ट्रीय कन्या दिनाच्या शुभेच्छा
लेक असते ईश्वराचं देणं,
तिच्या पाऊलखुणांनी
सुखी होईल आमचं जिणं.
आंतरराष्ट्रीय कन्या दिनाच्या शुभेच्छा
जशी सायलीची कळी,
सोनचाफ्याची पाकळी तशी माझी…
आंतरराष्ट्रीय कन्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
स्वागत तुझे मी असे करावे,
अचंबित हे सारे जग व्हावे,
तुझ्या गोड हास्याने
जीवन माझे फुलूनी जावे.
आंतरराष्ट्रीय कन्या दिनाच्या शुभेच्छा
प्रत्येक क्षण आता आनंदाने सजला,
तुझ्या रूपाने माझ्या घरी सौख्याचा चरणस्पर्श झाला.
आंतरराष्ट्रीय कन्या दिन शुभेच्छा
सुगंध, प्रेम आणि मुली,
हे जिथे असतात तिथे थांबत नाहीत.
त्यामुळे मुलींवर भरपूर प्रेम करा
त्यांच्या सहवासाचा सुगंध दरवळत राहू द्या.
आंतरराष्ट्रीय कन्या दिन शुभेच्छा
प्रत्येक कुटुंबाचं कुळ वाढवतात मुली,
पण तरीही का प्रेमापासून वंचित असतात मुली,
मुलींना प्रेम द्या आणि कुटुंबातही वाढू द्या.
आंतरराष्ट्रीय कन्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
घरामध्ये जणू संगीत असतं प्रत्येक क्षणी,
जेव्हा मुली पैंजण घालून घरभर चालतात.
घरामध्ये प्रसन्नता ही मुलींमुळे असते,
कारण त्यांच्यामुळे घरांमध्ये असतो प्रकाश.
डॉटर्स डे च्या शुभेच्छा.
मुलीला हसताना पाहिलं,
तेव्हा मी विचारलं काय झालं.
तर म्हणाली, बाबांनी
मला आज त्यांचा मुलगा म्हटलं आहे.
आंतरराष्ट्रीय कन्या दिवस शुभेच्छा
उमलणाऱ्या कळ्या म्हणजे मुली,
आईबापांचं दुःख समजणाऱ्या मुली,
घराला देतात घरपण मुली,
मुलं आज असतील तर येणारं भविष्य आहेत मुली.
राष्ट्रीय कन्या दिनाच्या शुभेच्छा...
हेही वाचा>>>
Women Health : मासिक पाळी दरम्यान पूजा करावी की नाही? प्रेमानंद महाराजांनी दिले आश्चर्यकारक उत्तर, तर जया किशोरी म्हणतात..
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )