Interesting Facts : 'हे' देश कधीच स्वातंत्र्यदिन साजरा करत नाहीत, यामध्ये केवळ नेपाळच नाही, तर 'या' देशांचाही समावेश
Interesting Facts : भारतात दरवर्षी स्वातंत्र्य दिन मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. पण असे देश आहेत जिथे स्वातंत्र्य दिन साजरा केला जात नाही. जाणून घ्या
Interesting Facts : कोणत्याही देशासाठी सर्वात मोठा दिवस असेल तर, तो म्हणजे स्वातंत्र्य दिन (Independence Day) भारतासह (India) जगात असे अनेक देश आहेत. जे वर्षानुवर्षे गुलाम राहिले आणि नंतर त्यांना स्वातंत्र्य मिळाले. अशा देशांमध्ये स्वातंत्र्यदिन मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. पण, तुम्हाला माहिती आहे का? की जगात असे अनेक देश आहेत जिथे स्वातंत्र्य दिन साजरा केला जात नाही. याचे कारण हे देश कधीच कोणाचे गुलाम नव्हते. या देशांमध्ये फक्त राष्ट्रीय दिवस साजरा केला जातो. जाणून घ्या अशाच काही देशांबद्दल, जे स्वातंत्र्य दिन साजरा करत नाहीत.
नेपाळ
हिमालयाच्या कुशीत वसलेल्या या देशात स्वातंत्र्यदिन साजरा केला जात नाही. नेपाळला कधीही परकीय आक्रमणाचा सामना करावा लागला नाही. हा जगातील अशा काही देशांपैकी एक आहे, जो भौगोलिकदृष्ट्या लहान असूनही कधीही परकीय देशाचा गुलाम बनला नाही. नेपाळ हे नेहमीच सार्वभौम राष्ट्र राहिले आहे. प्राचीन काळी चीन आणि ब्रिटिश भारत यांच्यातील बफर म्हणूनही ते काम करत होते. त्यामुळे इथे कधीच स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा केला जात नाही. नेपाळ हा दक्षिण आशियातील सर्वात जुना देश आहे.
डेन्मार्क
युरोपमधील डेन्मार्क देशावर कधीही हल्ला झाला नव्हता किंवा इतर कोणत्याही देशाने त्याच्यावर मक्तेदारी केली नव्हती. त्यामुळे येथे स्वातंत्र्यदिन साजरा केला जात नाही. मात्र, येथे दरवर्षी 5 जून रोजी संविधान दिन साजरा केला जातो. याच दिवशी देशात संविधान लागू झाले. हा दिवस त्यांच्या राज्यघटनेच्या सत्तेत आल्याचा वर्धापन दिन आहे. डेन्मार्कचा इतिहास वायकिंग आक्रमणांनी आणि जगभरातील त्यांच्या हल्ल्यांनी भरलेला आहे. वायकिंग राज्ये सत्तेसाठी आपापसात लढले, म्हणूनच डेन्मार्कवर कब्जा करण्याचा परकीय सैन्याने कधीही मोठा प्रयत्न केला नाही.
ब्रिटन
ब्रिटनचा स्वतःचा स्वातंत्र्यदिन नाही. ब्रिटनमध्ये संसदीय लोकशाही आणि राजेशाही आहे. हा देश कधीच कोणाचा गुलाम राहिला नाही, तर स्वतः इतर राज्यांना गुलाम बनवलेला आहे. एकेकाळी जगाच्या एक चतुर्थांश भूभागावर त्याचे राज्य होते. पण, नंतर हळूहळू इतर देश स्वतंत्र झाले. यामध्ये आपल्या भारत देशाचाही समावेश आहे. ब्रिटनमध्ये कोणताही स्वातंत्र्यदिन साजरा केला जात नाही किंवा कोणताही राष्ट्रीय दिवस नाही. होय, राणीचा वाढदिवस येथे मोठ्या उत्साहात साजरा केला जात असे.
थायलंड
19व्या शतकात थायलंड एक स्वतंत्र राज्य राहिले. ज्या देशांनी कधीही स्वातंत्र्यदिन साजरा केला नाही त्यात थायलंडचे नावही समाविष्ट आहे. हा देश कधीच कोणत्याही देशाचा गुलाम राहिला नाही. इथे राजेशाही चालते. येथील राजाचा वाढदिवस हा येथील राष्ट्रीय सण असतो. हा दिवस येथे राष्ट्रीय दिन म्हणून साजरा केला जातो. त्याची सुरुवात 2014 पासून झाली आहे. 5 डिसेंबर रोजी येथे राष्ट्रीय दिन साजरा केला जातो.
इराण
हा एक इस्लामिक देश आहे. त्याचा स्वतःचा स्वातंत्र्यदिनही नाही. परंतु, येथे राष्ट्रीय दिन पहिल्या एप्रिलला साजरा केला जातो. इस्लामिक राज्याच्या घोषणेमुळे येथे या दिवशी इस्लामिक प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. खरे तर ही तारीख पुढे-मागे बदलत राहते. कारण इराणमध्ये स्थानिक सौर दिनदर्शिका वापरली जाते. त्यामुळे इस्लामिक प्रजासत्ताक दिनाची तारीख मागे-पुढे होत राहते.
जपान
आशियाई देश जपान आपल्या कठोर परिश्रमासाठी ओळखला जातो. हा देशही कधी कोणाचा गुलाम राहिला नाही. ऑटो क्षेत्र आणि इलेक्ट्रॉनिक्ससह कला आणि संस्कृतीसाठी जगप्रसिद्ध जपानमध्ये 11 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय स्थापना दिवस साजरा केला जातो. हा त्यांचा राष्ट्रीय दिवस आहे.
चीन
चीन देशानेही कधीही स्वातंत्र्यदिन साजरा केला नाही. कारण ती कधीच पूर्णपणे गुलाम बनलेला नाही. येथे राजांनी राज्य केले आहे. 1949 च्या चिनी राज्यक्रांतीनंतर चीनचे पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना कम्युनिस्ट नेते माओ यांनी स्थापन केले. तो दिवस चीन राष्ट्रीय दिन साजरा करतो.
कॅनडा
या देशात कधीच स्वातंत्र्यदिन साजरा झाला नाही. ब्रिटिश उत्तर अमेरिका (BNA) कायद्यावर 1 जुलै 1867 रोजी स्वाक्षरी करण्यात आली. या कृतीमुळे कॅनडाचे अधिराज्य निर्माण झाले. या निर्णयात देशाच्या काही भागांचाच समावेश करण्यात आला होता. म्हणूनच हा दिवस राष्ट्रीय दिन म्हणून साजरा केला जातो. जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश कॅनडामध्ये स्वातंत्र्यदिन साजरा केला जात नाही. त्याऐवजी येथे 1 जुलै रोजी कॅनडा दिवस साजरा केला जातो. 1 जुलै 1867 रोजी 'ब्रिटिश नॉर्थ अमेरिका ऍक्ट' (BNA) पारित करण्यात आला, जेणेकरून कॅनडाला एक स्वशासित देश बनवता येईल. या कायद्याचा अर्थ असा होता की कॅनडा आता ब्रिटीश साम्राज्याचा भाग नाही.
फ्रान्स
जुलमी राजेशाहीपासून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी युरोपातील सर्वात मोठा देश फ्रान्समध्ये फ्रेंच क्रांती झाली. यातून कोणत्याही देशाला स्वातंत्र्य मिळायचे नव्हते. फ्रान्सची वसाहत कधीच नव्हती. त्यामुळे येथे स्वातंत्र्यदिन साजरा केला जात नाही.
रशिया
रशियाला पूर्वी सोव्हिएत युनियन किंवा युएसएसआर म्हणून ओळखले जात असे. हा एक आंतरखंडीय देश होता, जो 1922 ते 1991 पर्यंत बहुतेक युरेशियामध्ये पसरला होता. त्याच्या फाळणीनंतर, रशिया स्वतःच्या अधिकारात एक देश बनला.
चीन
आशिया खंडातील सर्वात मोठा देश असलेल्या चीनमध्ये सुरुवातीपासूनच राजांची सत्ता आहे. त्यामुळे येथे कधीही वसाहत स्थापनेसाठी आक्रमणे झाली नाहीत. यामुळेच आज चीनमध्ये स्वातंत्र्यदिन साजरा केला जात नाही.
महत्त्वाच्या बातम्या :