Independence Day 2024 : केवळ भारतच नाही, तर 'हे' 5 देश सुद्धा 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिन साजरा करतात, फार कमी लोकांना माहित, जाणून घ्या..
Independence Day 2024 : 15 ऑगस्टच्या दिवशी स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करणारा केवळ भारत हाच एकमेव देश नाही, हे तुम्हाला माहीत आहे का? फार कमी लोकांना माहित असावं, जाणून घ्या..
Independence Day 2024 : अवघ्या काही दिवसांवर स्वातंत्र्यदिन येऊन ठेपलाय. यंदा भारत आपल्या स्वातंत्र्याची 77 वर्ष पूर्ण करत आहे. स्वातंत्र्यदिन निमित्त देशातील वातावरण अगदी देशभक्तीमय झालंय. 15 ऑगस्ट 1947 या दिवशी ब्रिटीश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारत दरवर्षी आपला स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. या विशेष दिवसामागे देशासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या देशातील शूर सुपुत्रांचा दीर्घ संघर्ष आहे. मात्र तुम्हाला हे माहित आहे का? 15 ऑगस्टच्या दिवशी स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करणारा केवळ भारत हाच एकमेव देश नाही, फार कमी लोकांना माहित असावं, या दिवशी भारतासोबत इतर कोणते देश स्वातंत्र्य साजरा करतात ते जाणून घेऊया...
15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिन साजरा करणारा भारत हा एकमेव देश नाही
15 ऑगस्टला स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करणारा भारत हा एकमेव देश नाही. जगातील इतर 5 देश देखील या दिवशी स्वातंत्र्य दिन साजरा करतात. या लेखात आम्ही तुम्हाला अशा देशांबद्दल सांगणार आहोत, जिथे भारतासारख्या मोठ्या थाटामाटात स्वातंत्र्याचा उत्सव साजरा केला जातो.
दक्षिण कोरिया
भारताप्रमाणेच दक्षिण कोरियालाही 15 ऑगस्टला स्वातंत्र्य मिळाले. 15 ऑगस्ट 1945 रोजी जपानपासून स्वातंत्र्य मिळाले. अशात हा दिवस दक्षिण कोरियामध्ये राष्ट्रीय सुट्टी म्हणून साजरा केला जातो. त्यावेळी अमेरिका आणि सोव्हिएत सैन्याने कोरियाला जपानच्या ताब्यापासून मुक्त केले होते.
उत्तर कोरिया
दक्षिण कोरियाप्रमाणेच उत्तर कोरियालाही 15 ऑगस्टला स्वातंत्र्य मिळाले. त्याच दिवशी 1945 मध्ये जपानच्या ताब्यापासून स्वातंत्र्यही मिळाले. 15 ऑगस्टला उत्तर कोरियातही सुट्टी असते. दोन्ही देश एकाच वेळी जपानी ताब्यापासून मुक्त झाले, पण स्वातंत्र्यानंतर तीन वर्षांनी दोघांची फाळणी झाली आणि दोन्ही स्वतंत्र देश झाले.
बहरीन
15 ऑगस्टला बहारीनही ब्रिटनपासून मुक्त झाले. 15 ऑगस्ट 1971 ला स्वातंत्र्य मिळाले. ब्रिटिश सैन्याने 1960 पासून बहरीन सोडण्यास सुरुवात केली. 15 ऑगस्ट रोजी दोन्ही देशांमध्ये एक करार झाला, त्यानंतर बहरीनने एक स्वतंत्र देश म्हणून ब्रिटनशी संबंध कायम ठेवले.
लिकटेंस्टीन
15 ऑगस्ट 1866 रोजी लिकटेंस्टीनची जर्मन ताब्यापासून सुटका झाली. 1940 पासून, जगातील सर्वात लहान देशांपैकी एक असलेल्या लिकटेंस्टीनने देखील भारताप्रमाणे या दिवशी आपला स्वातंत्र्यदिन साजरा केला.
काँगो
15 ऑगस्ट 1960 रोजी आफ्रिकन देश काँगो फ्रान्सपासून स्वतंत्र झाला. यानंतर ते काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक बनले. जेव्हा ते फ्रान्सच्या ताब्यात होते, तेव्हा ते फ्रेंच काँगो म्हणून ओळखले जात होते. माहितीनुसार, फ्रान्सने 1880 पासून काँगोवर कब्जा केला होता.
हेही वाचा>>>
Independence Day 2024 : पतंग एकेकाळी आनंदाचे नव्हे..तर निषेधाचे प्रतीक होते? 15 ऑगस्टला का उडवतात पतंग? त्यामागची रंजक कहाणी जाणून घ्या..
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )