Health Tips : कोणतंही सप्लिमेंट्स नाही..'या'' अन्नपदार्थांनी दूर होईल व्हिटॅमिन डीची कमतरता, आजपासूनच आहाराचा भाग बनवा
Vitamin D Rich Food : जगभरातील 40% पेक्षा जास्त लोक व्हिटॅमिन डीच्या कमतरतेने त्रस्त आहेत.
Vitamin D Food : निरोगी राहण्यासाठी शरीरात आवश्यक जीवनसत्त्वे असणे अत्यंत आवश्यक आहे, त्यापैकी एक जीवनसत्व 'डी' आहे. कॅल्शियमचे शोषण करण्यासाठी व्हिटॅमिन डी महत्वाचे आहे. या व्यतिरिक्त, ते हाडांच्या वाढीस चालना देण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. ते रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास आणि शरीरातील जळजळ कमी करण्यास मदत करतात. सूर्य हा व्हिटॅमिन डीचा नैसर्गिक स्रोत आहे. काही मिनिटे सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्याने तुमची व्हिटॅमिन डी पातळी वाढू शकते, तरीही जगभरातील 40% पेक्षा जास्त लोक व्हिटॅमिन डीच्या कमतरतेने त्रस्त आहेत. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे हाडे ठिसूळ होणे, ऑस्टिओमॅलेशिया, कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती, नैराश्य, हृदयाच्या समस्या आणि केस गळणे यांसारख्या समस्या होऊ शकतात. अशा परिस्थितीत व्हिटॅमिन डी असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करावा.
व्हिटॅमिन डी समृद्ध अन्न
अंडी - व्हिटॅमिन डी फूड म्हणून तुम्ही आहारात अंड्याचाही समावेश करू शकता. एनसीबीआयच्या रिपोर्टनुसार, कॅल्शियम आणि प्रोटीनसोबतच अंड्यामध्ये व्हिटॅमिन डीही भरपूर असते. पोषक तत्वांची कमतरता पूर्ण होऊ शकते.
मासे - ओमेगा 3 फॅटी अॅसिड माशांमध्ये आढळते. याशिवाय हे व्हिटॅमिन डी चा चांगला स्रोत आहे. व्हिटॅमिन डीची कमतरता पूर्ण करण्यासाठी सॅल्मन फिश खा. 100 ग्रॅम सॅल्मन फिशमध्ये सुमारे 245 आययू व्हिटॅमिन डी3 असते. याशिवाय व्हिटॅमिन डीची कमतरता मॅकेरल आणि हेरिंग माशांनी देखील पूर्ण केली जाऊ शकते.
संत्री - संत्र्याला व्हिटॅमिन सीचा स्रोत मानला जातो. पण, त्यात व्हिटॅमिन डीही चांगल्या प्रमाणात आढळते. कॅल्शियम, लोह, झिंक, मॅग्नेशियम आणि फॉस्फरससोबतच संत्र्याच्या रसात जीवनसत्त्वे ए, बी, ई देखील आढळतात. जे एकंदर आरोग्यासाठी चांगलं आहे. याच्या रसाचे सेवन करून व्हिटॅमिन डीची कमतरता दूर करता येते.
मशरूम - मशरूममध्ये व्हिटॅमिन डी देखील चांगल्या प्रमाणात आढळते. रोज मशरूम खाल्ल्याने शरीरात आवश्यक असलेली व्हिटॅमिन डी ची कमतरता पूर्ण होते. व्हाईट आणि पोर्टबेला मशरूममध्ये व्हिटॅमिन डी चांगल्या प्रमाणात आढळते.
दूध - मुबलक प्रमाणात कॅल्शियमसह दुधात व्हिटॅमिन डीचे प्रमाण चांगले असते. त्यामुळेच दुधाला सुपरफूडचा म्हणतात. व्हिटॅमिन डीची कमतरता पूर्ण करण्यासाठी दररोज सकाळी एक ग्लास दूध प्या.
सोया फूड - व्हिटॅमिन डीची कमतरता भरून काढण्यासाठी टोफू, सोया मिल्क आणि सोया दही यांसारख्या सोया फूडचा वापर करणे देखील फायदेशीर ठरू शकते. शाकाहारी लोक या उत्पादनांचा वापर करून व्हिटॅमिन डीची कमतरता पूर्ण करू शकतात.
दही - जर तुम्ही रोज दही खात असाल तर त्यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन डी देखील असते, ज्यामुळे शरीरात व्हिटॅमिन डीचा पुरवठा होतो. यासाठी ताजं दही खावं.