एक्स्प्लोर
Advertisement
हिवाळ्यात केसांची काळजी कशी घ्याल?
हिवाळ्यात कोंड्याचा त्रास होत असेल तर टी-ट्री ऑईलमध्ये खोबरेल तेल मिसळून ते केसांना आणि त्याच्या मुळांना लावल्याने फायदा होतो. आंघोळीच्या आधी कोरफडीच्या रसाने किंवा लिंबाच्या रसाने केसांना मसाज केल्यास कोंडा निघून जाण्यास मदत होते.
मुंबई : हिवाळ्याच्या दिवसात केस, त्वचा कोरडे आणि रुक्ष होतात. या काळात आपल्या केसांची काळजी कशी घ्यावी, यासाठी निसर्गोपचार तज्ज्ञ जान्हवी मिस्किन कांबळे यांनी दिलेल्या काही खास टिप्स
केसांचा कोरडेपणा कमी करुन त्यांचं आरोग्य सुधारण्यासाठी डोक्याचं रक्ताभिसरण वाढण्याची गरज आहे. रक्ताभिसरण वाढवण्यासाठी ड्रायफ्रूट्स खाणं फायदेशीर ठरतं. ड्रायफ्रूट्समध्ये असलेल्या पोषक गुणधर्मांमुळे केस दाट, मऊ आणि मजबूत होण्यास मदत होते.
हिवाळ्यात आठवड्यातून दोन ते तीन वेळा केसांना तेलाने मसाज करावा. यासाठी खोबरेल तेल, बदामाचं तेल किंवा एरंडेल तेलाचा वापर करावा.
हिवाळ्यात कोंड्याचा त्रास होत असेल तर टी-ट्री ऑईलमध्ये खोबरेल तेल मिसळून ते केसांना आणि त्याच्या मुळांना लावल्याने फायदा होतो. आंघोळीच्या आधी कोरफडीच्या रसाने किंवा लिंबाच्या रसाने केसांना मसाज केल्यास कोंडा निघून जाण्यास मदत होते.
थंडी जास्त असेल तरीही अतिगरम पाण्याचा वापर केस धुण्यासाठी करणं टाळावं. अतिगरम पाण्यामुळे केस कमकुवत होऊन ते तुटण्याची शक्यता वाढते.
ओले केस न विंचरता केस सुकल्यानंतर मोठ्या कंगव्याने विंचरावेत. महिलांनी केस ओले ठेऊन घराबाहेर जाणं टाळावं, गेल्यास केसांना ओढणी बांधावी.
हिवाळ्यात केसांवर केमिकल्स, कलर्स यांचा वापर केल्यास केस कमकुवत होऊन तुटतात. हिवाळ्यात केसांना मेहंदी लावणं टाळावं. त्यामुळे केस जास्त कोरडे होतात. हिवाळ्यात मेहंदी लावायची असल्यास त्यात खोबरेल तेल मिसळावं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
मुंबई
राजकारण
बॉलीवूड
Advertisement