(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Health Tips : अॅसिडिटीमध्ये दूध पिणे कितपत योग्य आहे? जाणून घ्या सविस्तर
Health Tips : अॅसिडिटीच्या उपचारासाठी दूध खरोखरच चांगले आहे की नाही, हे अद्याप कोणालाच फारसं माहीत नाही.
Health Tips : अॅसिडिटी ही एक सामान्य समस्या आहे ज्याचा त्रास अनेकांना होतो. वेळी अवेळी खाणं, चुकीचे पदार्थ खाणं आणि बिघडती लाईफस्टाईल यांसारख्या अनेक कारणांमुळे अॅसिडिटी होऊ शकते. जेव्हाही तुम्हाला छातीत जळजळ होते तेव्हा थंड दुधाचं सेवन करावं असा सल्ला दिला जातो. मात्र, अॅसिडिटीच्या उपचारासाठी दूध खरोखरच चांगले आहे की नाही, हे कोणालाच माहित नाही. आज या ठिकाणी आम्ही तुम्हाला यामागचं खरं कारण नेमकं काय हे सांगणार आहोत. अॅसिडिटीमध्ये दूध पिणं कोणासाठी फायदेशीर आहे आणि कोणासाठी हानिकारक आहे हे देखील जाणून घेणं गरजेचं आहे. चला तर मग जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
दूध प्यायल्यावर काय होते?
असे मानले जाते की दूध पोटातील ऍसिड नष्ट करते आणि अॅसिडिटीशी संबंधित अस्वस्थतेपासून आराम देते. दुधामध्ये कॅल्शियम देखील असते, जे हाडे आणि दात मजबूत करण्यास मदत करतात. दुधामुळे पोटाला जरी आराम मिळत असला तरी तो अॅसिडिटीवर उपाय नाही. आम्लपित्ताचा त्रास असलेल्या लोकांसाठी दुधाची शिफारस न करण्यामागचं एक कारण हे आहे की काही केसेसमध्ये दुधामुळे खरंच त्रास होतो. दुधामध्ये चरबी आणि प्रथिने असतात ज्यामुळे पोटातील ऍसिड वाढू शकते आणि अॅसिडिटीची लक्षणे वाढू शकतात. जर तुम्ही दूध प्यायलात तर, चरबीचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे दूध प्यायल्याने पचनाच्या इतर समस्याही होऊ शकतात.
'या' सर्व पद्धतींनी अॅसिडिटीची लक्षणे कमी होऊ शकतात
अॅसिडिटीसाठी दूध पिण्याची आणखी एक समस्या म्हणजे त्यामुळे अॅसिड रिफ्लक्स होऊ शकतो. ऍसिड अन्ननलिकेमध्ये परत येते, अॅसिडिटीमुळे छातीत आणि घशात जळजळ होते. त्यामुळे तुम्हाला अॅसिडिटीचा त्रास होत असेल तर दुधावर अवलंबून राहण्याऐवजी, तुम्ही इतर उपाय शोधू शकता. आम्लपित्तावर उपचार करण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे तुमच्या आहारात आणि जीवनशैलीत बदल करणे. दिवसभरात योग्य अन्न खाणे, मसालेदार पदार्थ टाळणे आणि तणाव कमी करणे या सर्वांमुळे आम्लपित्त लक्षणे कमी होण्यास मदत होते. याशिवाय भरपूर पाणी प्यायल्याने तुमच्या पोटातील अतिरिक्त अॅसिड बाहेर पडण्यास मदत होते आणि आराम मिळतो.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :
Health Tips : झटपट वजन वाढवायचंय? आहारात 'या' पदार्थाचा समावेश करा; काही दिवसांतच फरक जाणवेल