एक्स्प्लोर

अंगावर फोड आणि ताप! मुलांमध्ये वाढतोय HFMD आजार; काय आहेत लक्षणं आणि उपाय

सध्या लहान मुलांमध्ये एक आजार बळावतोय. त्या आजाराचं नाव आहे हॅन्ड फुट माऊथ (mouth hands and feet) अर्थात एचएफएमडी (HFMD). लहान मुलांच्या हात पाय, तोंडामध्ये प्रामुख्यानं फोड येतात.

HFMD In Child : पालकांसाठी महत्वाची बातमी. सध्या लहान मुलांमध्ये एक आजार बळावतोय. त्या आजाराचं नाव आहे हॅन्ड फुट माऊथ (mouth hands and feet).  हॅन्ड फुट माऊथ अर्थात एचएफएमडी (HFMD). लहान मुलांच्या हात पाय, तोंडामध्ये प्रामुख्यानं फोड येतात. काही मुलांच्या सर्व अंगावर देखील हे फोड येतात. हा काहीसा चिकनपॉक्स सारखाच प्रकार आहे पण चिकनपॉक्स नाही असं डॉक्टर सांगतात. 

मुख्यत्वेकरुन 2 ते 5 वर्षांच्या बालकांमध्ये हा आजार बळावत असल्याचं दिसून येत आहे. हा आजार मुलांना झाल्यानंतर सर्वात आधी त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवावं म्हणजे दुसऱ्या मुलांपासून दूर ठेवावं असा सल्ला डॉक्टर देतात. या आजारातून मुलं बरी होण्यासाठी सात ते दहा दिवसांचा वेळ लागतो. त्यामुळं या कालावधीत मुलांना शाळेत, सार्वजनिक ठिकाणी पाठवू नये, असंही डॉक्टरांनी सांगितलं आहे.  

काय आहेत हॅन्ड फुट माऊथ अर्थात एचएफएमडी (HFMD)ची लक्षणं

या आजारात हॅन्ड फुट माऊथ अर्थात एचएफएमडी (HFMD) म्हणजे हात पाय आणि तोंडाचा आजार म्हटलं जातं. 5 वर्षांपर्यंतच्या मुलांमध्ये हे व्हायरल संक्रमण आढळून येतं. यामध्ये मुलांच्या तोंडामध्ये तसेच शरीराच्या विविध भागात फोड येतात. यामुळं मुलांना खाण्यापिण्यासाठी त्रास होतो. हा आजार कॉक्ससॅकी व्हायरसमुळं होतो. यामध्ये मुलांना हलकासा ताप देखील येतो. या दरम्यान मुलं सतत चिडचिड करतात. तसेच मुलांना अंगदुखीचा त्रास देखील होतो.

लहान मुलांचे डॉक्टर शैलेश काबरा सांगतात की, सध्या दवाखान्यामध्ये अशा मुलांचं प्रमाण वाढत आहे. यावर अद्याप कुठली लस किंवा औषध उपलब्ध नाही. मात्र या काळात मुलांची रोगप्रतिकारक शक्ति वाढवणं महत्वाचं आहे. शिवाय मुलांना काही काळासाठी आयसोलेशन म्हणजे दुसऱ्या मुलांपासून दूर ठेवणं गरजेचं आहे. या काळात मुलांना सतत पाणी द्यावं, तसेच तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असंही काबरा यांनी सांगितलं. 

मुलांची काळजी कशी घ्यावी 

इतर मुलांना संसर्ग झालेल्या मुलांपासून दूर ठेवा.
हा खोकला, शिंकणे आणि लाळेतून पसरणारा आजार आहे.
संक्रमित मुलासोबत खानपान शेअर करु नये
मुलांची प्रतिकारशक्ती वाढवण्यावर भर द्या.
आपल्या मुलाचे हात वारंवार साबणाने धुवा.
या काळात मुलांना सतत पाणी द्या.
तात्काळ आपल्या डॉक्टरांकडे जाऊन सल्ला घ्या.

इतर महत्वाच्या बातम्या

 

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

महत्त्वाच्या बातम्या

कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारी बँक! दरवर्षी 2 हजार 357 कोटी रुपयांचा खर्च, जाणून घ्या सविस्तर माहिती
कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारी बँक! दरवर्षी 2 हजार 357 कोटी रुपयांचा खर्च, जाणून घ्या सविस्तर माहिती
त्वचादानासाठी संपूर्ण देशात व्यापक यंत्रणा उभारा: खासदार विनोद तावडे यांची राज्यसभेत मागणी
त्वचादानासाठी संपूर्ण देशात व्यापक यंत्रणा उभारा: खासदार विनोद तावडे यांची राज्यसभेत मागणी
World Breastfeeding Week: महिलांनो.. सिझेरियननंतरही यशस्वी स्तनपान शक्य! नवमातांच्या प्रश्नांचं उत्तर, 'ही' 7 लक्षणं, तज्ज्ञांनी सांगितले महत्त्व
महिलांनो.. सिझेरियननंतरही यशस्वी स्तनपान शक्य! नवमातांच्या प्रश्नांचं उत्तर, 'ही' 7 लक्षणं, तज्ज्ञांनी सांगितले महत्त्व
Breastfeeding Awareness week: स्तनपानाबाबतचे 'हे' 10 गैरसमज अजूनही अनेकांना वाटतात खरे; प्रत्येक नव्या आईने एकदा तरी वाचाच, डॉक्टर काय सांगतात?
स्तनपानाबाबतचे 'हे' 10 गैरसमज अजूनही अनेकांना वाटतात खरे; प्रत्येक नव्या आईने एकदा तरी वाचाच, डॉक्टर काय सांगतात?

व्हिडीओ

Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Abhijeet Dipke: 'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
Sushma andhare: तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
Embed widget