Women Health : महिलांनो इथे लक्ष द्या.. 'या' महिलांना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका जास्त, अनेकदा उपायाबद्दल माहित नसते
Women Health : महिलांच्या आरोग्याबाबत बोलायचं झालं तर एका अभ्यासात डॉक्टरांनी दावा केलाय की, काही विशेष महिलांना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका जास्त असतो
Women Health : आजकाल हृदयविकाराचे रुग्ण भारतात वाढत चालल्याचं समोर येतय. कारण बदलती जीवनशैली, कामाचा ताण, खाण्याच्या अयोग्य वेळा आणि इतरही बऱ्याच गोष्टींमुळे अनेकांना विविध आजारांनी ग्रासलय. अशात महिलांच्या आरोग्याबाबत बोलायचं झालं तर एका अभ्यासात डॉक्टरांनी दावा केलाय की, काही विशेष महिलांना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका जास्त असतो, त्यापैकी बहुतेकांना प्रतिबंधाची पद्धत माहित नसते. नेमकं काय म्हटलंय अभ्यासात जाणून घ्या..
अभ्यासातून माहिती समोर, डॉक्टरांनी महिलांना केलं सावध
हृदयविकार आणि हृदयविकाराचा झटका हे जगभरात मृत्यूचे प्रमुख कारण मानले जाते. यापूर्वी या संदर्भात केलेल्या अभ्यासात असं म्हटलं होतं की, पुरुष आणि स्त्रिया दोघांमध्ये हृदयविकाराचा धोका जास्त असला तरी, स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण अधिक आहे. मात्र आता नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात चंदीगडच्या कार्डिओलॉजी विभागाच्या डॉक्टरांनी एक मोठा दावा केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, संबंधित विभागाच्या सहाय्यक प्राध्यापिका डॉ. नीलम दहिया यांनी अनेक महिलांना सावध केलंय. त्या म्हणाल्या की लठ्ठपणाने ग्रस्त महिलांना हृदयविकार आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका जास्त असू शकतो. ज्या महिलांचे वजन सामान्यपेक्षा जास्त आहे अशा महिलांनी हृदयाच्या आरोग्याबाबत विशेष काळजी घ्यावी.
हृदयविकाराने ग्रस्त 44 टक्के महिलांमध्ये लठ्ठपणा हा प्रमुख घटक
अभ्यास अहवालानुसार, हृदयविकाराने ग्रस्त असलेल्या 44 टक्के महिलांमध्ये लठ्ठपणा हा प्रमुख जोखीम घटक असल्याचे आढळून आले आहे. तीन वर्षांच्या आकडेवारीनुसार, हृदयविकाराने ग्रस्त महिलांमध्ये पुरुषांपेक्षा जास्त गंभीर लक्षणे दिसून येतात. याशिवाय हृदयविकाराने त्रस्त असलेल्या 13-15 टक्के महिला 50 वर्षांपेक्षा कमी वयाच्या होत्या.
महिलांमध्ये हृदयविकाराचा धोका वाढतोय
डॉ. नीलम दहिया सांगतात, जास्त वजनाची समस्या हा हृदयविकाराचा एक प्रमुख घटक मानला जात आहे. या अभ्यासात हृदयविकाराने ग्रस्त असलेल्या अर्ध्याहून अधिक महिलांमध्ये लठ्ठपणा हा एक प्रमुख जोखीम घटक असल्याचे आढळून आले. यापैकी फक्त एक टक्के महिलांचा आहार हृदयाच्या आरोग्यासाठी चांगला मानला जाऊ शकतो, म्हणजेच पुरेशी फळे आणि भाज्या..सर्वात चिंतेची बाब म्हणजे बहुतांश महिलांमध्ये हृदयविकार आणि त्याच्याशी संबंधित जोखीम घटकांबद्दल कमी जागरूकता असते.
धूम्रपान आणि जास्त मीठ खाऊ नका
डॉक्टरांनी सांगितले की, धूम्रपान आणि जास्त मीठ सेवन हे देखील हृदयविकार वाढवणारे घटक आहेत. केवळ 47 टक्के महिलांना मीठाचे सेवन कमी करण्याचा सल्ला देण्यात आला आणि 30 टक्क्यांहून कमी महिलांना धूम्रपान सोडण्याचा आणि निरोगी आहार घेण्याचा सल्ला देण्यात आला. महिलांमध्ये हृदयविकाराच्या जोखमींबद्दल जागरूकता निर्माण करण्याची, तसेच या वाढत्या धोक्याला तोंड देण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचीही तातडीची गरज असल्याचे आरोग्य तज्ज्ञांनी सांगितले. त्याची वेळीच काळजी न घेतल्यास आरोग्याला मोठा धोका निर्माण करणारी समस्या बनू शकते.
तरुणींमध्येही धोका दिसून येतोय
अभ्यास अहवालानुसार, हृदयविकाराने ग्रस्त असलेल्या 10 टक्के महिलांचे वय 40 वर्षांपेक्षा कमी आहे. ही आणखी चिंताजनक स्थिती आहे. लठ्ठपणा व्यतिरिक्त, तरुणांमध्ये वाढलेला ताण हा देखील भारतातील हृदयविकाराचा एक प्रमुख जोखीम घटक असल्याचे आढळून आले आहे. व्यस्त जीवनशैली आणि वाढती परस्पर स्पर्धा यामुळे तणावाची समस्याही वाढली असून त्यामुळे तरुणांनाही हृदयाच्या आरोग्याच्या समस्यांशी झगडावे लागत आहे.
लहानपणापासूनच धडे दिले पाहिजे
अभ्यासाचे निष्कर्ष असे दर्शवतात की, भारतीय लोक जास्त मीठ आणि साखर खातात तर त्याच्या तुलनेत ते भाज्या आणि फळे कमी खातात. कार्ब्स, कॅलरीज, गोड गोष्टी आणि ट्रान्स फॅटमुळे लठ्ठपणा वाढत आहे. याशिवाय जास्त वेळ बसून राहणे आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळेही वजन वाढण्याचा धोका असतो, ज्यामुळे थेट हृदयविकार वाढू शकतात. सर्व लोकांना लहानपणापासूनच वजन कमी करण्यासाठी आणि हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याचा सल्ला देण्यात आला पाहिजे असं डॉक्टर सांगतात.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
हेही वाचा>>>
Women Health : महिलांनो सावधान! मद्यपान करताय तर हृदयविकाराचा धोका जास्त, अभ्यासातून स्पष्ट, अल्कोहोल सेवनाची मर्यादा काय? डॉक्टर म्हणतात...
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )