Cancer: सावधान! झोपताना आढळते कॅन्सरचे 'हे' लक्षण! अनेकांना माहित नाही, आरोग्य तज्ज्ञ सांगतात...
Cancer: कॅन्सर सारख्या आजारापासून बचाव करणे सध्या खूप महत्वाचे झाले आहे, कारण आजकाल हा आजार कोणालाही होऊ शकतो. कर्करोगाचे हे लक्षण अगदी सामान्य आहे, जे तुम्हाला सहज समजू शकते.
Cancer: आजकालची बदलती जीवनशैली, सध्या वाढत असलेला कामाचा ताण, जंकफूडचे सेवन अशा अनेक गोष्टींमुळे अनेकांना विविध आजारांनी ग्रासलंय. त्यात लठ्ठपणा, मधुमेह, हृदयविकार, कर्करोगसारखे आजार होऊ लागलेत. त्यापैकी कॅन्सर म्हणजेच कर्करोग हा एवढा गंभीर आजार आहे की, तो वेळेवर ओळखला नाही तर त्यावर उपचारही शक्य नाही. आरोग्य तज्ज्ञांच्या माहितीनुसार, कॅन्सरची लक्षणे शरीरात हळूहळू वाढतात आणि त्याची लक्षणे समजण्यापर्यंत हा आजार मोठ्या प्रमाणात वाढलेला असतो. कर्करोगाची काही लक्षणं शरीरात आधीपासून असतात, जी कर्करोगाचे सूचक असतात, ज्याकडे दुर्लक्ष करणे जीवावर बेतू शकते. जाणून घ्या सविस्तर..
झोपेच्या वेळी दिसतात कर्करोगाची 'ही' लक्षणं
आरोग्य तज्ज्ञ सांगतात, कर्करोगाचे असे एक लक्षण आहे. ज्याकडे कधीही दुर्लक्ष करू नये. ते म्हणजे घाम येणे- जर तुम्हाला रात्री अचानक घाम येणे सुरू झाले, तर ते तुमच्यासाठी धोक्याचे ठरू शकते. विशेषत: हा घाम विनाकारण येत असेल तर ते कर्करोगाचे लक्षण असू शकते. रात्री घाम येणे हे नेहमीच कर्करोगाचे लक्षण नाही, परंतु ही एक सामान्य समस्या मानली जाऊ नये. NHS म्हणजेच नॅशनल हेल्थ सर्व्हिसच्या मते, काही लोकांना रात्री झोपताना विनाकारण घाम येतो आणि इतका घाम येतो की, त्यांचे कपडेही ओले होतात, तर हे कॅन्सरचे लक्षण असू शकते.
आरोग्य तज्ज्ञ काय म्हणतात?
रात्रीच्या वेळी घाम येण्याबाबत गेटसरेमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जर एखाद्याला रात्री घाम येत असेल तर त्याने एकदा वैद्यकीय तपासणी करून घ्यावी. रात्री नेहमी घाम येणे हे गंभीर आजारांचे लक्षण असू शकते. यामध्ये पहिल्या टप्प्यातील ब्लड कॅन्सर म्हणजेच रक्ताच्या कर्करोगाचाही समावेश आहे. याशिवाय रात्री घाम येणे हे देखील टीबी आजाराचे लक्षण आहे.
घाम येण्याची काही कारणे
घाम येण्याची काही कारणे सामान्य आहेत, जसे की गरम असणे किंवा पंख्यासमोर न बसणे. याशिवाय रजोनिवृत्ती, चिंता आणि ताणतणाव, मधुमेह, अति मद्यपान यामुळेही रात्री घाम येण्याची समस्या निर्माण होते. जे लोक जास्त प्रमाणात स्टिरॉइड्स, पेनकिलर किंवा अँटीबायोटिक औषधे घेतात, त्यांना रात्रीच्या घामाचा त्रास होऊ शकतो. अतिसारामुळे रात्री घामही येऊ शकतो.
कर्करोग कसा टाळाल?
- सकस आहार घ्या.
- दारू आणि तंबाखूचे सेवन टाळा.
- सूर्यप्रकाशाचा जास्त संपर्क टाळा.
- जास्त लठ्ठपणा देखील हानिकारक आहे.
- शारीरिकदृष्ट्या सक्रिय व्हा.
- प्रदूषणाचा संपर्क कमी करण्याचा प्रयत्न करा.
हेही वाचा>>>
काय सांगता! HMPV व्हायरसचा किडनीवरही होतो परिणाम? काय काळजी घ्याल? आरोग्य तज्ज्ञ काय सांगतात..
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )