स्तनांच्या आकारात बदल, काखेत गाठ.. वेळीच ओळखा लक्षणं; स्तनाच्या कर्करोगाचा धोका टाळण्यासाठी करा 'हे' बदल, तज्ञ सांगतात...
महिलांमध्ये आढळणाऱ्या एकुण कर्करोगांपैकी सुमारे 26% प्रकरणे केवळ स्तनाच्या कर्करोगाची असतात.

Mumbai: स्तनाचा कर्करोग हा भारतीय महिलांमध्ये झपाट्याने वाढणारा सर्वात मोठ्या प्रमाणात आढळून येणारा कर्करोग आहे.(Breast Cancer) राष्ट्रीय कर्करोग नोंदणी कार्यक्रम (NCRP) आणि संबंधित अहवालांनुसार स्तनाच्या कर्करोगाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. महिलांमध्ये आढळणाऱ्या एकुण कर्करोगांपैकी सुमारे 26% प्रकरणे केवळ स्तनाच्या कर्करोगाची असतात. 2019 ते 2023 या 5 वर्षांत राज्यात स्तन कर्करोगाच्या रुग्णांच्या संख्येत सुमारे 28% नी वाढ झाली आहे.
नियमित व्यायाम महत्वाचा
तज्ज्ञांच्या मते, जीवनशैलीतील सकारात्मक बदलांमुळे स्तनाच्या कर्करोगास कारणीभूत घटकांवर नियंत्रण ठेवता येते. संशोधनातून सिद्ध झाले आहे की, ज्या महिला नियमितपणे शारीरिकरित्या सक्रिय राहतात, त्यांच्यामध्ये स्तनाच्या कर्करोगाचा धोका 10 % ते 25 % पर्यंत कमी होतो. व्यायामाचा अभाव हे अनेक रोगांचे मूळ कारण आहे. नियमित व्यायाम केल्याने केवळ वजन नियंत्रणात राहत नाही, तर ते हार्मोनची पातळी संतुलित ठेवण्यास मदत करते आणि शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवते. तज्ज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार, नियमित मध्यम व्यायाम करणाऱ्या महिलांमध्ये कर्करोगाचा धोका 10% ते 25% पर्यंत कमी होतो.
चाळीशीनंतर स्तनांची तपासणी गरजेची
डॉ ज्योती मेहता(रेडिएशन आणि क्लिनिकल ऑन्कोलॉजिस्ट टीजीएच ऑन्को-लाइफ कॅन्सर सेंटर, तळेगाव) सांगतात की, स्तनाचा कर्करोग हा एक गंभीर आणि जीवघेणा आजार असला तरी, तो पूर्णपणे अनियंत्रित नाही. योग्य जीवशैलीच्या मदतीने सकस आहार, नियमित व्यायाम आणि वाईट सवयींपासून दूर राहिल्यास, आपण या रोगापासून दूर राहू शकतो. मात्र, जीवनशैलीत बदल करण्यासोबतच चाळीशीनंतर नियमितपणे मॅमोग्राफी आणि स्वतः स्तनांची तपासणी करणे आवश्यक आहे. स्तन कर्करोगास प्रतिबंध करण्यासाठी योग्य जीवनशैली हा सर्वात मोठा आणि प्रभावी उपाय आहे, हे प्रत्येक महिलेला माहित असणे गरजेचे आहे.
काय आहेत लक्षणे?
-त्वचेतील बदल, जसे की सूज, लालसरपणा किंवा एका किंवा दोन्ही स्तनांमध्ये फरक.
-स्तनांच्या आकारात वाढ किंवा आकारात बदल.
-एका किंवा दोन्ही स्तनाग्रांच्या स्वरूपात बदल.
-आईच्या दुधाव्यतिरिक्त स्तनाग्रातून स्त्राव होणे
-स्तनाच्या कोणत्याही भागात सामान्य वेदना
-स्तनावर किंवा आत गाठी किंवा गाठी जाणवणे
कॅन्सरच्या सुरुवातीच्या टप्प्यात शरीरात गाठ निर्माण होणे हे एक सामान्य आणि महत्वाचे लक्षण असते. प्रत्येक गाठ ही कॅन्सरचीच असेल असं नाही, परंतु काही विशिष्ट ठिकाणी आढळणाऱ्या गाठींकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते. खाली अशा ठिकाणांची सविस्तर माहिती दिली आहे जिथे कॅन्सरमुळे गाठी निर्माण होऊ शकतात.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )























