एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Winter : पुरुषांच्या तुलनेत महिलांना जास्त थंडी वाजते, यामागे आहे 'हे' कारण

Winter For Women : थंडीचा मोसम सुरु आहे. थंडी सर्वांनाच वाजते. पण महिलांना पुरुषांच्या तुलनेत जास्त थंडी वाजते. यामागचं कारण तुम्हाला माहित आहे का?

Women feel More Cold than Men : हिवाळा ( Winter ) सुरु आहे. सर्वजण गुलाबी थंडीचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. उबदार कपड्यांचा वापर करुन प्रत्येक जण शरीर गरम ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. हवामान तज्ज्ञांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, आता थंडीला सुरुवात झाली आहे. येत्या काही दिवसांमध्ये पारा आणखी खाली घसरण्याची शक्यता आहे. थंडीचा मोसम सुरु आहे. थंडी सर्वांनाच वाजते. पण काहींना थंडी जास्त वाजते, तर काहींना कमी वाजते, असं म्हटलं जातं. महिलांना पुरुषांच्या तुलनेत जास्त थंडी वाजते, हे तुम्हाला माहित आहे का? डॉक्टरांच्या मते, प्रत्येकाच्या शारीरिक ठेवणीनुसार त्यांना थंडी जाणवण्याचे प्रमाण बदलते. 

'या' कारणांमुळे महिलांना जास्त थंडी जाणवते

प्रत्येकाला थंडी जाणवते. लहान मुले, वृद्ध, महिला, पुरुष प्रत्येक जण थंडीने थरथर कापताना पाहायला मिळतो. पण सर्वसाधारणपणे पुरुषांपेक्षा स्त्रियांना जास्त थंडी जाणवते असे दिसून येते. चयापचय क्रिय यामागील एक प्रमुख कारण आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, पुरुषांच्या तुलने महिलाचा मेटॅबॉलिक रेट (Metabolic Rate) म्हणजे चयापचय क्रियेचा दर कमी असते. मेटाबॉलिझमचे काम शरीरातील ऊर्जा पातळी (Energy Level) राखणे आहे. शरीरातील ऊर्जा पातळी चांगली असल्यावर फारशी थंडी जाणवत नाही. महिलांमध्ये हा चयापचय दर पुरुषांच्या तुलनेत कमी असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे महिलांना पुरुषांपेक्षा थंडी जास्त वाजते. 

महिलांना थंडी वाजण्यामागील आणखी एक कारण म्हणजे पुरुषांच्या तुलनेत महिलांचे स्नायू कमी असतात. या स्नायूंच्या जास्त असल्यास जास्त उष्णता निर्माण होते. पण महिलांच्या शरीरात कमी स्नायू असल्याने त्यांच्या शरीरात कमी उष्णता निर्माण होते. महिलांच्या शरीरात चरबीही कमी असते. परिणामी महिलांना पुरुषांच्या तुलनेत जास्त थंडी जाणवते.

राहत्या खोलीचे तापमान किती असावे?

महिला आणि पुरुषांना थंडी कमी-अधिक प्रमाणत वाजते, त्यामुळे अशा वेळी राहत्या खोलीचे तापमान किती ठेवावे? तज्ज्ञांच्या मते, महिला 25 डिग्री तापमानात राहणे पसंत करतात तर, पुरुषांना 22 अंश सेल्सिअस तापमानात राहायला आवडतं. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, वृद्ध, तरुण पिढी आणि लहान मुले सर्वच घरात राहत असतील, सर्वजण निरोगी असतील अशा वेळी खोलीत तापमान 20 ते 22 अंश सेल्सिअस असावे. जर खोलीच सर्व तरुण असतील तर तापमान 18 अंश सेल्सिअस पर्यंत ठेवता येते. 

जास्त थंडी जाणवतं असेल तर डॉक्टरांना सल्ला घ्या

हिवाळ्यात थंडी वाजणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. जर तुम्हाला हिवाळ्यात थंडी जाणवत नसेल तर याचा अर्थ शरीरात काही समस्या आहेत. या उलट तुम्हाला जास्त थंडी जाणवत असेल, तर तेही आरोग्यासाठी घातक आहे. जर तुम्हाला सतत थंडी जाणवत असेल तर सावध राहण्याची गरज आहे, अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Allu Arjun Video : जेव्हा पुष्पाराज अल्लू अर्जुन मुंबईमध्ये येताच मराठीमध्ये बोलतो! व्हिडिओ सोशल मीडियात तुफान व्हायरल
Video : जेव्हा पुष्पाराज अल्लू अर्जुन मुंबईमध्ये येताच मराठीमध्ये बोलतो! व्हिडिओ सोशल मीडियात तुफान व्हायरल
Maharashtra CM: देवेंद्र फडणवीस नव्हे तर मुख्यमंत्रीपदी त्यांच्या निकटवर्तीयाची वर्णी? खुद्द रवींद्र चव्हाण यांनीच सस्पेन्स संपवला, म्हणाले मी...
देवेंद्र फडणवीस नव्हे तर मुख्यमंत्रीपदी त्यांच्या निकटवर्तीयाची वर्णी? खुद्द रवींद्र चव्हाण यांनीच सस्पेन्स संपवला, म्हणाले मी...
Gautam Adani : प्रत्येक आव्हान आम्हाला मजबूत बनवते; अमेरिकेतील आरोपांवर गौतम अदानी पहिल्यांदाच बोलले
प्रत्येक आव्हान आम्हाला मजबूत बनवते; अमेरिकेतील आरोपांवर गौतम अदानी पहिल्यांदाच बोलले
मोठी बातमी : एकनाथ शिंदेंच्या उपमुख्यमंत्रिपदाबाबत पहिल्यांदाच शिंदे गटाच्या नेत्याचं जाहीर वक्तव्य, म्हणाले...
मोठी बातमी : एकनाथ शिंदेंच्या उपमुख्यमंत्रिपदाबाबत पहिल्यांदाच शिंदे गटाच्या नेत्याचं जाहीर वक्तव्य, म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  12 PM : 1 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :1 डिसेंबर 2024 :  ABP MajhaYugendra Pawar : माझ्यासह 11 उमेदवारांचे मतमोजणी पडताळणीसाठी अर्ज - युगेंद्र पवारSanjay Raut PC | तब्येतीवरून शिंदेंना टोला, सत्तास्थापनेवरून फडणवीसांनाही खडसावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Allu Arjun Video : जेव्हा पुष्पाराज अल्लू अर्जुन मुंबईमध्ये येताच मराठीमध्ये बोलतो! व्हिडिओ सोशल मीडियात तुफान व्हायरल
Video : जेव्हा पुष्पाराज अल्लू अर्जुन मुंबईमध्ये येताच मराठीमध्ये बोलतो! व्हिडिओ सोशल मीडियात तुफान व्हायरल
Maharashtra CM: देवेंद्र फडणवीस नव्हे तर मुख्यमंत्रीपदी त्यांच्या निकटवर्तीयाची वर्णी? खुद्द रवींद्र चव्हाण यांनीच सस्पेन्स संपवला, म्हणाले मी...
देवेंद्र फडणवीस नव्हे तर मुख्यमंत्रीपदी त्यांच्या निकटवर्तीयाची वर्णी? खुद्द रवींद्र चव्हाण यांनीच सस्पेन्स संपवला, म्हणाले मी...
Gautam Adani : प्रत्येक आव्हान आम्हाला मजबूत बनवते; अमेरिकेतील आरोपांवर गौतम अदानी पहिल्यांदाच बोलले
प्रत्येक आव्हान आम्हाला मजबूत बनवते; अमेरिकेतील आरोपांवर गौतम अदानी पहिल्यांदाच बोलले
मोठी बातमी : एकनाथ शिंदेंच्या उपमुख्यमंत्रिपदाबाबत पहिल्यांदाच शिंदे गटाच्या नेत्याचं जाहीर वक्तव्य, म्हणाले...
मोठी बातमी : एकनाथ शिंदेंच्या उपमुख्यमंत्रिपदाबाबत पहिल्यांदाच शिंदे गटाच्या नेत्याचं जाहीर वक्तव्य, म्हणाले...
Rohit Sharma : रोहित शर्माचा जलवा! मुंबईत ज्या घोषणांनी हार्दिक पांड्याला हैराण करून सोडलं, त्याच घोषणा रोहितसाठी ऑस्ट्रेलियात सुद्धा गरजल्या
Video : रोहित शर्माचा जलवा! मुंबईत ज्या घोषणांनी हार्दिक पांड्याला हैराण करून सोडलं, त्याच घोषणा रोहितसाठी ऑस्ट्रेलियात सुद्धा गरजल्या
इतकं बहुमत असतानाही सरकार स्थापनेचा दावा अजून का केला नाही? आम्ही असतो, तर राष्ट्रपती राजवट लागली असती: संजय राऊत 
इतकं बहुमत असतानाही सरकार स्थापनेचा दावा अजून का केला नाही? आम्ही असतो, तर राष्ट्रपती राजवट लागली असती: संजय राऊत 
Joe Root : क्रिकेटच्या देवाचा भीम पराक्रम इंग्लडच्या जो रुटनं मोडित काढला; सचिन तेंडुलकरला मागे टाकत रचला कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास!
क्रिकेटच्या देवाचा भीम पराक्रम इंग्लडच्या जो रुटनं मोडित काढला; सचिन तेंडुलकरला मागे टाकत रचला कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास!
Nana Patole : विधानसभेतील विजय म्हणजे निवडणूक आयोग अन् भाजपनं मिळून केलेल्या पापाचं फळ; नाना पटोलेंचा घणाघात
विधानसभेतील विजय म्हणजे निवडणूक आयोग अन् भाजपनं मिळून केलेल्या पापाचं फळ; नाना पटोलेंचा घणाघात
Embed widget