(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Winter Health Tips : हिवाळ्यात हार्ट अटॅकचा धोका जास्त, 'हे' तीन व्यायाम करा; निरोगी हृदयासाठी फायदेशीर उपाय
Winter Health Tips : हिवाळ्यात हृदय निरोगी ठेवण्यासाठी हे तीन योग अत्यंत फायदेशीर आहेत, ते रोज केल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो.
Winter Health Tips : हिवाळ्यात (Winter Season) सर्वात जास्त कोणता धोका भेडसावत असेल तर तो म्हणजे हृदयविकाराचा झटका (Heart Attack). कारण या काळात थंडीमुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, त्यामुळे रक्तदाब वाढतो. याशिवाय हिवाळ्यात शरीरातील कोलेस्ट्रॉलच्या पातळीचं प्रमाण देखील वाढलेलं असतं. या कारणांमुळे हृदयविकाराचा धोका जास्त वाढतो. त्यामुळे हृदयविकाराचा झटका, हृदयाचे अनियमित ठोके इत्यादी हृदयाशी संबंधित समस्यांची शक्यता हिवाळ्यात जास्त प्रमाणात असते. तज्ज्ञांच्या मते, ज्या लोकांना हृदयाचा त्रास आहे अशा लोकांनी आपल्या आरोग्याची जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. यासाठी या ठिकाणी आम्ही तुम्हाला काही खास व्यायाम सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या हृदयाची नीट काळजी घेऊ शकता.
सूर्यनमस्कार (Surya Namaskar)
सूर्यनमस्कार. हे असं एक आसन आहे ज्यामध्ये 12 प्रकारचे आसन केले जातात. त्यासाठी सकाळच्या उन्हात उभे राहून हात, पाय, कंबर, मान या अवयवांना वर-खाली आणि पुढे-मागे हलवून, वाकवून व्यायाम केला जातो. हे सर्व व्यायाम हृदय आणि फुफ्फुस मजबूत करतात. यामुळे हृदयाच्या स्नायूंवर ताण येतो. याशिवाय, फुफ्फुसे देखील मजबूत होतात ज्यामुळे श्वास घेणे सोपे होते. हे सर्व हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे हिवाळ्यात रोज सूर्यनमस्कार करणं गरजेचं आहे.
चालणे (Walking)
दररोज 30-45 मिनिटे वेगाने चालणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. आपण जेवढे वेगाने चालतो तेवढे आपले हृदय वेगाने धडधडू लागते. यामुळे हृदयाचे स्नायू मजबूत होतात आणि हृदयाची रक्त पंप करण्याची क्षमता वाढते. तसेच, वेगाने चालण्याने आपल्या शरीरातील सर्व स्नायूंमध्ये रक्ताभिसरण वाढते. यामुळे संपूर्ण शरीराला ऑक्सिजन आणि पोषक तत्वांचा पुरवठा होतो. शरीरातील रक्त परिसंचरण देखील सुधारते, ज्यामुळे हृदयविकार आणि उच्च रक्तदाब सारख्या समस्या टाळता येतात.
सायकलिंग (Cycling)
सायकल चालवणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. जर आपण आठवड्यातून 4-5 दिवस 30 मिनिटे सायकल चालवली तर आपल्या हृदयाची आणि फुफ्फुसाची क्षमता सुधारते. जेव्हा आपण सायकल चालवतो तेव्हा आपले हृदय जलद गतीने धडधडायला लागते आणि आपली फुफ्फुसे देखील वेगाने काम करू लागतात. यामुळे हृदयाचे स्नायू मजबूत होतात आणि फुफ्फुसाची क्षमता वाढते. याशिवाय, फुफ्फुसातील रक्त परिसंचरण देखील सुधारते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :
Health Tips : वयाच्या आधीच म्हातारं व्हायचं नसेल तर, 'या' गोष्टींना आत्ताच करा बाय बाय! चिरतरूण राहण्याचा सोपा मार्ग
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )