Mental Health : 'या' गोष्टी आहेत मानसिक आजाराची लक्षणं, वेळीच सावध व्हा...
Mental Health Problem : सध्याच्या व्यस्त जीवनशैलीमध्ये चिंतेचा काहीनाकाही कारण तर उद्भवतच, यामुळे तुम्ही दिवसभर विचारात गुंतलेले राहता. हे तुमच्या मानसिक आजाराचं कारण बनू शकतं.
Symptoms Of Mental Illness : शारीरिक आरोग्यासोबत मानसिक आरोग्यही जपणं आवश्यक आहे. अनेक वेळा लोक शारीरिक आरोग्याची चांगली कळजी घेतात. पण मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. मानसिक आरोग्य, जीवनाच्या गुणवत्तेचा मुख्य आधार आहे. भारतात राष्ट्रीय मानसिक आरोग्य सर्वेक्षण 2015-16 नुसार, 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या भारतातील लोकसंख्येपैकी 10.6 टक्के, म्हणजे सुमारे 150 दशलक्ष लोक कोणत्या ना कोणत्या मानसिक आजाराने ग्रस्त आहेत, प्रत्येक सहाव्या भारतीयाला मानसिक स्वास्थ राखण्यासाठी मदतीची गरज आहे. मानसिक आजार होण्यामागे अनेक घटक कारणीभूत असतात, ते जाणून घ्या.
1. जास्त खाणे (Eating too Much) : नकारात्मक विचारांचा प्रभाव तुमच्या खाण्याच्या सवयींवरही होतो. एकाच वेळी खूप खाणं हे याचं लक्षणं आहे. एकाच वेळी जास्त अन्न खाणं आणि अन्न खाऊन झाल्यानंतर आपण जास्त खाल्लं आहे असं वाटणं ही एक धोक्याची घंटा असू शकते. मानसिक समस्येचा तुमच्या खाण्यासंबंधी सवयींवरही प्रभाव पडतो. त्यामुळे मानसिक आजाराला इटिंग डिसऑर्डर असंही म्हणतात. जास्त खाल्ल्याने वजन वाढते. यामुळे तुमचे शारीरिक आरोग्यही बिघडते. त्यामुळे लठ्ठ लोक अनेकदा मानसिक आजारानेही ग्रस्त असतात.
2. जास्त झोप (Excessive Sleep) : हायपरसोमनिया (Hypersomnia) हा एक झोपेचा विकार आहे, ज्यामुळे एखाद्या व्यक्तीला दिवसा खूप झोप येते. अशा व्यक्तींची झोप अनेक वेळा पूर्ण होतं नाही. कधीकधीच त्यांची झोप पूर्ण होऊन त्यांना आराम मिळतो. अशा परिस्थितीत झोप पूर्ण न झाल्यास त्याचं रूपांतर मानसिक आजारात होतं.
3. मनोविकार : मनोविकारामध्ये (Psychotic Disorder) तुमची जागरुकता आणि विचार करण्याची क्षमता बिघडते. याचे सर्वात सामान्य लक्षणं म्हणजे अनकदा तुम्ही गोंधळता आणि बसताना कुठल्या तरी विचारात हरवून जाता. काल्पनिक आवाज ऐकू येतात आणि चित्रं दिसू लागतात.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :
- Ayurveda : सावधान! 'फ्रूट शेक' आरोग्यासाठी हानिकारक, आयुर्वेद काय सांगत? वाचा सविस्तर
- Health Tips : पावसाळ्यात संधिवातच्या समस्येपासून सुटका हवीय? या गोष्टींची काळजी घ्या...
- Blood Pressure Control : ब्लड प्रेशरच्या समस्येवर सैंधव मीठ गुणकारी, रक्तदाब राहील नियंत्रणात
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )