एक्स्प्लोर

Heat Stroke: उष्माघात होण्याची नेमकी कारणं काय? जाणून घ्या लक्षणं अन् उपायही

Heat Stroke: उष्माघात होण्यामागची नेमकी कारणं कोणती? तसेच, उष्णतेशी संबंधित आजारांची लक्षणं नेमकी कोणती? जाणून घ्या सविस्तर...

Heat Stroke News: नवी मुंबईच्या (Navi Mumbai) खारघरमध्ये (Kharghar) रविवारी (16 मार्च) आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Award) देण्यात आला. या कार्यक्रमाला लाखो श्रीसेवक आले होते. मात्र उष्माघातामुळे (Heat Stroke) 12 श्रीसेवकांचा मृत्यू झाला. तर 15 श्रीसेवकांवर कामोठेमधील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री रुग्णांची विचारपूस केली. मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदतही मुख्यमंत्र्यांकडून जाहीर करण्यात आली आहे. रविवारी एकूण 300 श्रीसेवकांना उष्माघाताचा त्रास झाला. त्यातील अनेकांना प्राथमिक उपचार देऊन घरी सोडण्यात आलं. मात्र 32 जणांची प्रकृती गंभीर होती, त्यातील 12 जणांचा मृत्यू झाला आहे. 

कालच्या कार्यक्रमानंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत. तसेच, उष्माघाताबाबतही (Heat Stroke Symptoms) अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पण उष्माघात होण्यामागची नेमकी कारणं कोणती? तसेच, उष्णतेशी संबंधित आजारांची लक्षणं नेमकी कोणती? यांसारखे प्रश्नही उपस्थित होत आहेत. जाणून घेऊयात त्याबाबत सविस्तर... 

महाराष्ट्रात दरवर्षी 1 मार्च ते 31 जुलै या कालावधीत उष्णता विकार प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी विविध पातळीवर उपाय योजना आखण्यात येतात. तसेच या आजाराचे दैनंदिन सनियंत्रण आणि सर्वेक्षण करण्यात येतं. वाढत्या उन्हाच्या तापमानात अनेक शारीरिक समस्याही उद्भवू लागतात. अशातच निर्माण होणारी आणखी एक सम्साया म्हणजचे उष्माघात. उष्माघात म्हणजे काय?  उष्माघातानंतर काय होते? तुम्हाला किंवा कुटुंबातील सदस्यांना उष्माघात झाल्यास कसे ओळखावे? आणि यावर उपचार नेमके काय? असे अनेक प्रश्न चिंता निर्माण करतात. कारण उष्माघात ही हंगामी समस्या असू शकते. पण, त्यावर वेळीच उपचार न केल्यास तो जीवघेणाही ठरू शकतो.  

उष्णतेशी संबंधित वेगवेगळे आजार 

  • उष्णतेशी संबंधित किरकोळ आजार उष्णतेमुळे पुरळ येणं, उष्णतेनं स्नायूंमध्ये पेटके येणं, चक्कर येणं 
  • उष्णतेशी संबंधित प्रमुख आजार उष्णतेनं शरीरात डिहायड्रेशन (Dehydration) होणं आणि उष्माघात (Heat stroke) होणं

उष्णाघाताचा त्रास सर्वाधिक कोणाला होऊ शकतो? 

  • 65 वर्ष आणि त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्ती 
  • 1 वर्षाखाली आणि 1 ते 5 वर्ष वयोगटातील मुलं
  • गरोदर महिला
  • मधुमेह, हृदयविकार तसेच अल्कोहोलिक व्यक्ती
  • अतिउष्ण वातावरणामध्ये काम करण्याच्या व्यक्ती

उष्माघात होण्याची कारणं काय? 

  • उन्हाळ्यामध्ये शेतावर अथवा इतर मजुरीची कामं भर उन्हात फार वेळ करणं
  • कारखान्याच्या बॉयलर रुममध्ये काम करणं
  • काच कारखान्यात काम करणं 
  • जास्त तापमानाच्या खोलीमध्ये काम करणं
  • घट्ट कपड्यांचा वापर करणं

याव्यतिरिक्त प्रत्यक्ष उष्णतेशी अथवा तापमानातील वाढत्या परिस्थितीशी सतत संबंध येण्याने उष्माघात होतो.

उष्माघाताचा त्रास झाल्यास काय करावं? 

उष्माघात/उष्णता विकार सर्वेक्षण आणि अहवाल सादर करण्याबाबत जिल्हा नोडल अधिकारी, निवासी वैदकीय अधिकारी (बाह्यसंपर्क) आणि जिल्हा साथरोग तज्ञ यांना प्रशिक्षण घेण्यात आलं.  
जिल्हा स्तरावर उष्माघात/उष्णता विकार आणि उष्माघात क्लिनिकल व्यवस्थापन आणि सर्वेक्षणाबाबत वैद्यकीय अधिकारी यांना प्रशिक्षण देण्यात आलं.
सर्व जिल्हा, महानगरपालिका, नगरपालिका गांच्या आरोग्य संस्थांमध्ये उष्णतेशी संबंधित आजारांच्या व्यवस्थापनासाठी उष्माघात उपचार कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.

सर्वेक्षण कसं केलं जातं? 

महाराष्ट्रात साधारणपणे मार्च ते मे महिन्यात उष्णतेच्या लाटा जाणवतात. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि कोकण विभागातील काही जिल्हे प्रामुख्यानं उष्णतेच्या लाटेमुळे प्रभावित होतात. 1 मार्च ते 31 जुलै या कालावधीत उष्माघात आजारांची दैनंदिन रिपोर्टिंग करण्यात येतं. प्रत्येक जिल्हा, नगरपालिका आणि महानगरपालिका यांनी त्यांच्या आरोग्य संस्थान मधून उष्माघाताची माहिती संकलित करण्यात येते.

जिल्हास्तरीय मृत्यू अन्वेषण समिती 

जिल्हा स्तरावर उष्माघातानं झालेल्या मृत्यूंचे अन्वेषण करण्यासाठी खालील प्रमाणे तीन सदस्यीय समिती गठीत 

1. जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय
2. जिल्हा सर्वेक्षण अधिकारी, आयडीएसपी
3. विशेषज्ञ वैदकीय महाविद्यालय किंवा सार्वजनिक आरोग्य विभागातील फिजिशियन/बालरोगतज्ज्ञ 

प्रत्येक संशयित मृत्यूची चौकशी मृत्यूच्या 3 दिवसांच्या आत जिल्हा समितीनं करण अनिर्वाय आहे. 

उष्णतेशी संबंधित आजारांची लक्षणं काय? 

पुरळ/मामुळ्या 

त्वचेच्या छिद्रांवर लहान लाल पुरळ येऊन खाज सुटणं. पुरळ पाणीदार किंवा पांढऱ्या द्रवानं भरलं जाऊ शकतात. कधी कधी पूरळ न दिसता त्वचेला खाज सुटते. 

उष्णतेने स्नायूंमध्ये पेटके येणे

वारंवार वापरल्या जाणाच्या स्नायूंमध्ये वेदनादायक गोळे येणं. प्रभावित हात पाय/ सांधे आखडणं. 

उष्माघातानं सूज

पाय घोटा आणि हातांना सौम्य सूज येणं, उष्ण वातावरणाच्या संपर्कात आल्यानंतर काही दिवसांत दिसून येतं. 

उष्णतेने थकवा येणं

अतिउष्णता, थकवा आणि कमकुवत वाटणं, उलट्या होणं, घाम येणं, तहान लागणं, दैनंदिन कामं करण्यास असमर्थता. घाम येणं, त्वचेचा लालसरपणा, अशक्तपणा. बेशुद्धपणा डोके हलके होऊन चेतना नष्ट होणे. शुद्ध हरपणे, श्वास फुलणे, हात-पाय बधीर होणं. 

उष्माघात

तीव्र उष्णता, तीव्र अशक्तपणा, दिशाभूल, पूर्ण पणे सतर्क नसणं, विसंगत वर्तन, हृदयाचे ठोके वाढणं, रक्त दाब कमी होणे, कोमा 

उपाय काय कराल? 

  • बदलत्या तापमानात जास्त वेळ कष्टाची कामं करणं टाळावं.
  • कष्टाची कामं सकाळी लवकर अथवा संध्याकाळी कमी तापमान असताना करा. 
  • उष्णता शोषून घेणारे कपडे (काळा किंवा मटक रंगाचे) वापरू नयेत, पांढऱ्या रंगाचे कपडे वापरावेत.
  • जनसंजीवनीचा वापर करावा, भरपूर पाणी प्यावं. 
  • सरबत प्यावं. 
  • अधुनमधून उन्हामध्ये काम करणे टाळावे आणि सावलीत विश्रांती घ्यावी.
  • उष्माघाताची लक्षणं सुरु होताच ताबडतोब उन्हात काम करणं थांबवावं आणि उपचार सुरु करावा
  • उन्हात बाहेर जाताना गॉगल्स, डोक्यावर टोपी, टॉवेल, फेटा, उपरण यांचा वापर करावा.

उपचार

  • रुग्णास वातानुकुलीत खोलीत ठेवावे अथवा हवेशीर खोलीत ठेवावे. खोलीत पंखे, कुलर ठेवावेत,
  • रुग्णाचे तापमान खाली आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत.
  • रुग्णास थंड पाण्याने अंघोळ घालावी.
  • रुग्णाच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात, आईस पॅक लावावेत.
  • आश्यकतेनुसार सलाईन देणं.

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

24 तासांत हल्लेखोरांना अटक करा अन्यथा..'  परभणी बंदच्या हिंसक वळणावर प्रकाश आंबेडकरांचा इशारा म्हणाले..
24 तासांत हल्लेखोरांना अटक करा अन्यथा..' परभणी बंदच्या हिंसक वळणावर प्रकाश आंबेडकरांचा इशारा म्हणाले..
Shekhar Kumar Yadav : देश 'बहुसंख्याकांच्या' इच्छेनं चालणार म्हणणाऱ्या न्यायाधीशांवर महाभियोग चालवण्याची मागणी; सुप्रीम कोर्टानेही लक्ष घातलं
देश 'बहुसंख्याकांच्या' इच्छेनं चालणार म्हणणाऱ्या न्यायाधीशांवर महाभियोग चालवण्याची मागणी; सुप्रीम कोर्टानेही लक्ष घातलं
Mukhyamantri Sahayata Nidhi: एकनाथ शिंदेंना मोठा झटका, मंगेश चिवटेंना हटवलं, मुख्यमंत्री सहाय्यता निधी विभागाची जबाबदारी काढून घेतली!
एकनाथ शिंदेंना मोठा झटका, मंगेश चिवटेंना हटवलं, मुख्यमंत्री सहाय्यता निधी विभागाची जबाबदारी काढून घेतली!
Satish Wagh Murder Case: सतीश वाघ अपहरण-हत्येचा उलघडा, पोलिसांनी कारण सांगितलंं, शेजाऱ्यानेच काटा काढल्याचं उघड
सतीश वाघ अपहरण-हत्येचा उलघडा, पोलिसांनी कारण सांगितलंं, शेजाऱ्यानेच काटा काढल्याचं उघड
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Yogesh Tilekar Mama : वैयक्तिक कारणातून सतिश वाघ यांचा जीव घेतलाAmbadas Danve PC : विरोधी पक्षनेते पद ते लाडकी बहीण योजना! अंबादास दानवेंची सविस्तर प्रतिक्रियाTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा:  12PM : 11 डिसेंबर 2024 : ABP MajhaJ P Nadda Rajya Sabha : राज्य सभेत जे पी नड्डांनी सोनिया गांधींचं नाव घेतल्याने पुन्हा गदारोळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
24 तासांत हल्लेखोरांना अटक करा अन्यथा..'  परभणी बंदच्या हिंसक वळणावर प्रकाश आंबेडकरांचा इशारा म्हणाले..
24 तासांत हल्लेखोरांना अटक करा अन्यथा..' परभणी बंदच्या हिंसक वळणावर प्रकाश आंबेडकरांचा इशारा म्हणाले..
Shekhar Kumar Yadav : देश 'बहुसंख्याकांच्या' इच्छेनं चालणार म्हणणाऱ्या न्यायाधीशांवर महाभियोग चालवण्याची मागणी; सुप्रीम कोर्टानेही लक्ष घातलं
देश 'बहुसंख्याकांच्या' इच्छेनं चालणार म्हणणाऱ्या न्यायाधीशांवर महाभियोग चालवण्याची मागणी; सुप्रीम कोर्टानेही लक्ष घातलं
Mukhyamantri Sahayata Nidhi: एकनाथ शिंदेंना मोठा झटका, मंगेश चिवटेंना हटवलं, मुख्यमंत्री सहाय्यता निधी विभागाची जबाबदारी काढून घेतली!
एकनाथ शिंदेंना मोठा झटका, मंगेश चिवटेंना हटवलं, मुख्यमंत्री सहाय्यता निधी विभागाची जबाबदारी काढून घेतली!
Satish Wagh Murder Case: सतीश वाघ अपहरण-हत्येचा उलघडा, पोलिसांनी कारण सांगितलंं, शेजाऱ्यानेच काटा काढल्याचं उघड
सतीश वाघ अपहरण-हत्येचा उलघडा, पोलिसांनी कारण सांगितलंं, शेजाऱ्यानेच काटा काढल्याचं उघड
मोठी बातमी : लाच घेताना न्यायाधीशालाच पकडलं, सातारा लाचलुचपतची मोठी कारवाई
मोठी बातमी : लाच घेताना न्यायाधीशालाच पकडलं, सातारा लाचलुचपतची मोठी कारवाई
Jayant Patil: इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात वीज महाग, अवाढव्य वीजदरावरून जयंत पाटलांचा महायुतीला टोला, म्हणाले..
इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात वीज महाग, अवाढव्य वीजदरावरून जयंत पाटलांचा महायुतीला टोला, म्हणाले..
Shaheen Shah Afridi : स्विंगचा सुलतान भुवनेश्वर कुमार आणि खतरनाक जसप्रीत बुमराह जे करू शकला नाही, ते पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदीनं करून दाखवलं!
स्विंगचा सुलतान भुवनेश्वर कुमार आणि खतरनाक जसप्रीत बुमराह जे करू शकला नाही, ते पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदीनं करून दाखवलं!
Ladki Bahin Yoajana : मोठी बातमी : पुण्यात एक-दोन नव्हे तब्बल 10 हजार लाडक्या बहिणी अपात्र
मोठी बातमी, पिंपरी चिंचवडनंतर पुण्यातील 10 हजार लाडक्या बहिणी अपात्र, आकडेवारी समोर
Embed widget