Weight Loss Tips: वजन कमी करण्यासाठी रोज प्या जिऱ्याचे पाणी; 'या' आहेत सर्वात प्रभावी पद्धती
Weight Loss Tips: जिरा पाणी प्यायल्याने वजन कमी करण्यास मदत होते, याच्या काही पद्धती पाहूया.
Cumin Water for Weight Loss: आजकाल धकाधकीच्या जीवनामुळे आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे (Bad Eating Habits) वजन वाढणं ही एक सामान्य समस्या (Common Problem) बनली आहे. जास्त वजन आरोग्यासाठी हानिकारक ठरतं, यामुळे उच्च रक्तदाब आणि हृदयविकार यांसारख्या अनेक आरोग्य समस्या उद्भवतात. अशा परिस्थितीत वजन कमी करणं खूप गरजेचं आहे.
वजन कमी करण्याचा एक नैसर्गिक आणि प्रभावी मार्ग म्हणजे दररोज जिरे पाणी पिणं. ते घरीही सहज बनवता येतं. जिऱ्यामध्ये अँटी-ऑक्सिडेंट्स आणि फायबर असतात जे वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. जिरा (Cumin) पाण्यामुळे पचनकार्य सुधारतं आणि विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात. आता हे जिरे पाणी नक्की बनवायचं कसं? तर पटकन वजन कमी करायचं असल्यास याच्या विविध पद्धती आहेत, यातील काही जाणून घेऊया.
1. साधं जिऱ्याचे पाणी
रात्री एक ग्लास पाण्यात एक चमचा जिरे भिजत ठेवा. सकाळी ते पाणी नीट गाळून घ्या आणि रिकाम्या पोटी प्या.
यामुळे पोट साफ होतं आणि पचन चांगलं होतं, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
2. लिंबू जिरा पाणी
1 चमचे जिरे रात्री 1 ग्लास पाण्यात भिजत ठेवा. हे पाणी सकाळी चांगलं गाळून घ्या. त्यानंतर अर्धा लिंबू पिळून त्यात घाला, यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
3. आलं-जिरा पाणी
आल्याचा एक छोटा तुकडा किसून घ्या आणि रात्रभर एक ग्लास पाण्यात जिऱ्यांसोबत भिजवा. सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी प्या, वजन कमी होण्यास नक्कीच मदत होईल.
4. दही आणि जिरा पाणी
प्रथम एक ग्लास दही घ्या आणि त्यात अर्धा चमचा जिरे पावडर घाला. पावडर चांगली मिसळल्यानंतर रिकाम्या पोटी हे दही प्या.
5. गूळ आणि जिरे पाणी
पाणी गरम करून त्यात थोडा गूळ घाला. गूळ पूर्णपणे विरघळल्यावर त्यात जिरे टाका आणि चहासारखे चांगले गरम करुन उकळून घ्या. गुळ आणि जिरे पाणी हा वजन कमी करण्यासाठी एक चांगला पर्याय आहे.
6. मेथीचे दाणे आणि जिरे पाणी
एक ग्लास पाण्यात मेथीचे दाणे आणि जिरे टाकून हे पाणी चांगलं उकळून घ्या, त्यानंतर हे मिश्रण चांगलं गाळून घ्यावं. गाळलेलं पाणी दिवसातून दोन वेळा प्यावं. त्यामुळे पचनक्रिया चांगली होते आणि वजन कमी होतं.
हेही वाचा:
Rose Shrikhand: गुलाबाच्या पाकळ्यांपासून बनवा खास रेसिपी; आरोग्यासाठीही फायदेशीर
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )