Weight Loss: वजन कमी करताना बरेच लोक करतात 'या' 5 चुका, अनेकांना माहीत नाही.. आताच सवय बदला, फिटनेस कोचचा सल्ला जाणून घ्या
Weight Loss: वजन कमी करणे सोपे काम नाही. एका फिटनेस प्रशिक्षकाने वजन कमी करण्यासाठी काय करावं आणि काय करू नये हे सांगितलंय. जाणून घ्या..
Weight Loss: आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांना लठ्ठपणाने ग्रासले आहे, अनेकांना तितकंच झपाट्याने वजन देखील कमी करायचे असते. त्यासाठी ते जिम, डाएट, जेवण वगळणे अशा विविध मार्गाचा अवलंब करतात. तुम्हाला माहितीय का? वजन कमी करणे ही एक कठीण प्रक्रिया आहे. यासाठी आपण कठोर शिस्त आणि प्रयत्नांचे पालन केले पाहिजे, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. पण वजन वाढवणे जितके सोपे आहे, तितकेच वजन कमी करणेही अवघड आहे. याबाबत फिटनेस कोच रीवाने तिच्या एका पोस्टद्वारे लोकांना सांगितलंय, की अनेक लोक वजन कमी करण्यासाठी कळत-नकळत काही चुका करतात, ज्या त्यांनी करू नये... जाणून घ्या..
फिटनेस कोचचा सल्ला काय आहे?
हिंदुस्तान टाईम्समध्ये प्रकाशित झालेल्या बातमीनुसार, फिटनेस कोच रीवाने तिच्या इन्स्टाग्राम पेज रीवा फिटनेसवर एक पोस्ट शेअर केली आहे आणि लोकांना सांगितले आहे की ते वजन कमी करण्यासाठी काही चुकीच्या सवयी कशा फॉलो करतात, ज्या त्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक आहेत. वजन कमी करण्यासाठी, बरेच लोक जेवण वगळतात. तर काही जण इतके कठोर परिश्रम करतात की ते शरीराला विश्रांती देण्यास विसरतात, ज्यामुळे आपल्या चयापचयवर परिणाम होतो. जाणून घ्या वजन कमी करताना कोणत्या चुका करू नयेत?
जेवण वगळणे- फिटनेस कोचच्या मते, जेवण वगळल्याने भूक वाढते आणि शरीरातील ऊर्जा पातळी कमी होते. त्याऐवजी, वजन कमी करू पाहणाऱ्या लोकांना त्यांच्या आहारात संतुलित आणि फायबरयुक्त पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो.
फक्त कार्डिओ- फिटनेस प्रशिक्षक सल्ला देतात की जे लोक वजन कमी करण्यासाठी फक्त कार्डिओ आवश्यक मानतात, त्यांनी देखील त्यांची विचारसरणी बदलणे आवश्यक आहे. कारण कार्डिओ हा फॅट कमी करण्यासाठी केला जातो, पण आपल्या शरीराला चांगल्या फॅट्सची गरज असते ज्यामुळे शरीरात एनर्जी टिकून राहते.
View this post on Instagram
इतरांची नक्कल करणे- हे देखील एक महत्त्वाचे तथ्य आहे ज्याबद्दल फिटनेस प्रशिक्षक सांगतात, ते म्हणतात की प्रत्येकाचे शरीर वेगळे असते, त्यामुळे इतर कोणाच्या आहाराचे किंवा व्यायामाचे पालन करणे आपल्यासाठी योग्य होणार नाही.
दररोज स्ट्रेंथ ट्रेनिंग- रीवाच्या मते, वजन कमी करण्यासाठी स्ट्रेंथ ट्रेनिंग आवश्यक आहेच पण शरीराला विश्रांतीचीही गरज आहे. असे व्यायाम केल्याने स्नायूंवर ताण येतो, त्यामुळे शरीराला जास्त थकवा जाणवतो. आठवड्यातून 1 किंवा 2 दिवसांचे अंतर घेऊन तुम्ही असा सराव केला पाहिजे.
कार्बोहायड्रेट्स टाळणे- फिटनेस प्रशिक्षकांच्या मते, कार्बोहायड्रेट्समुळे वजन वाढत नाही. त्यामुळे ते टाळणे योग्य नाही. शरीरात कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण समान ठेवणे महत्त्वाचे आहे, हे प्रत्येकाने समजून घेणे आवश्यक असल्याचे ती सांगते. आपल्या दैनंदिन आहाराचा तो एक आवश्यक भाग आहे.
हेही वाचा>>>
Women Health: महिलांनो.. चुकूनही नका करू दुर्लक्ष! धोका वाढतोय, कॅन्सरची 'ही' 10 लक्षणं, अनेकांना माहित नसावी
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )