Vitamin Deficiency : वारंवार थकवा येतोय? व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता असू शकतं कारण; आहारात 'या' पदार्थांचा समावेश करा
Health Tips : व्हिटॅमिन बी 12 शरीरासाठी आवश्यक पोषक तत्व आहे. त्याच्या कमतरतेमुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळतं.
Vitamin B12 Deficiency : मानवाचं शरीर अनेक पोषकतत्वे (Nutrients) आणि प्रथिने (Protein) यांनी मिळून तयार झालेलं आहे. शरीरातील खनिजे आणि पोषक तत्वे कमी झाल्यास समतोल बिघडतो आणि व्यक्ती आजारी पडते. त्यासाठी योग्य आहार घेणे आवश्यक आहे, ज्यामुळे शरीरातील पोषक तत्वे आणि प्रथिनांची कमतरता भरून निघेल. व्हिटॅमिन बी 12 (Vitamin B12) हे देखील आपल्या शरीरात आढळणारे एक अतिशय महत्वाचं पोषक तत्व आहे. व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे शरीरात हळूहळू अनेक समस्या निर्माण होऊ लागतात. व्हिटॅमिन बी12 ची कमतरता भरून काढण्यासाठी तुमच्या आहारात व्हिटॅमिन, मिनरल, प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट्स यासारख्या पदार्थांच्या समावेश करा. जर शरीरात व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता असेल तर तुम्ही या पदार्थांचा आहारात समावेश करा.
व्हिटॅमिन बी 12 ची कमतरतेची लक्षणे
तुमच्या शरीरात व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता असेल तर तुम्हाला पुढीलप्रमाणे लक्षणे दिसतील.
- त्वचा पिवळी पडणे
- जिभे लाल होणे किंवा जिभेवर लालसर फोड येणे
- दृष्टी कमी होणे
- तोंडात अल्सर
- थकवा जाणवणे
- दम किंवा धाप लागणे
- भूक न लागणे किंवा भूक कमी होणे
- थंडी वाजणे
व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता दूर करण्याचा उपाय
शरीरातील व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही आहारात पुढील पदार्थांचा समावेश करु शकता.
अंडी
रोज अंड्याचे सेवन केल्याने तुम्ही अनेक गंभीर आजारांपासून दूर राहाल. अंड्यामध्ये व्हिटॅमिन्स आणि प्रथिने मुबलक प्रमाणात असतात.
मासे
सॅल्मन, ट्यूना या सारख्या माशांमध्ये जीवनसत्त्वे, प्रथिने आणि ओमेगा 3 फॅटी ऍसिडस् यांसारख्या पोषक तत्वांचा समावेश असतो. त्यामुळे या माशांचा आहारात समावेश करावा.
मांस
जर तुम्ही मांसाहारी असाल तर, व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता खूप लवकर पूर्ण होईल. तुम्ही मटण, चिकन खाऊ शकता.
दुग्धजन्य पदार्थ
तुम्ही शाकाहीर असाल आणि मांस, अंडी यांचा आहारात समावेश करु शकत नसाल तर, दुग्धजन्य पदार्थही चांगला पर्याय आहेत. शरीरात व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता असल्यास, आहारात दूध, दूध, चीज आणि ताक यासारख्या दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करावा. यामध्ये व्हिटॅमिन बी 12 मुबलक प्रमाणात आढळते.
ओट्स
ओटमील हे व्हिटॅमिन बी 12 चा चांगला स्रोत आहे. ओटमील शिवाय, कॉर्नफ्लेक्स, ताक इत्यादींमध्ये व्हिटॅमिन बी 12 देखील मुबलक प्रमाणात आढळते.
हिरव्या भाज्या
हिरव्या पालेभाज्या व्हिटॅमिन बी12 चा उत्तम स्त्रोत आहेत. नेहमी हिरव्या पालेभाज्या खाव्यात. हिरव्या पालेभाज्यांचे सेवन केल्याने तुम्ही नेहमी निरोगी राहाल. या भाज्यांमध्ये व्हिटॅमिन बी12 असते, यासोबत शरीराला आवश्यक खनिजेही मोठ्या प्रमाणात असतात. व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता असल्यास पालक, ब्रोकोली, बाटली, कडबा, मेथी, बीन्स या भाज्यांचा आहारात समावेश करा.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Bad Breath : तोंडातून दुर्गंधी येतेय? लाजिरवाणा अनुभव टाळण्यासाठी 'हे' उपाय करुन पाहा, झटपट समस्या होईल दूर
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )