(Source: Poll of Polls)
Cardiac Arrest Symptoms : तुम्हाला नेहमी थकवा आल्यासारखे वाटते का? मग, दुर्लक्ष करू नका, अन्यथा जीवावर बेतण्याची शक्यता
सध्या हृदय विकाराचा झटका (Cardiac Arrest ) येणं आणि त्यामुळे काहीजण दगावले असल्याच्या बातम्या समोर येतात. मात्र, कोणत्याही व्यक्तीला अचानक हृदय विकाराचा झटका येत नाही. त्याआधी तुमच्या शरीरात काही लक्षणे दिसून येतात.
Cardiac Arrest Symptoms : सध्याच्या जीवन हे अत्यंत धावपळीचे आहे. त्यामुळे अनेकांचं आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. यादरम्यान अनेकांना थकल्यासारखे होते. पण या थकव्याकडे दीर्घकाळ दुर्लक्ष केल्यामुळे हृदय विकाराचा आजार होऊ शकतो. गेल्या काही वर्षापासून हृदय विकाराच्या रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे आता हृदय विकार, हृदय विकाराचा झटका (Cardiac Arrest) आणि रक्तवाहिन्यात ब्लॉकेज निर्माण होणे ही सर्वसामान्य समस्या झाली आहे. पण बहुतांश लोकांना हृदय विकाराचा झटका अचानक येतो, असा गैरसमजही अनेकांना आहे. हृदय विकाराचा आजार होण्याआधी व्यक्तीचे शरीरात काही लक्षणे दिसून येतात. ज्याकडे बहुतेजण दुर्लक्ष करतात. पण तुम्ही आपल्या शरीरातील होणाऱ्या काही बदलांकडे चांगल लक्ष दिले तर हृदय विकाराचा झटका येण्यापासून स्वत:चा बचाव करू शकता.
1. सतत छातीमध्ये दुखणे
तुम्ही कोणतंही वजन न उचलता, व्यायाम न करता , न धावताही तुमच्या छातीत दुखत असेल, तर ही गंभीर परिस्थिती आहे. यासाठी तुम्ही डॉक्टारांकडे जाऊन तपासणी करून घ्यायला हवी.
2. हातात वेदना होणे
हृदय विकाराचा झटका येण्याआधी शरीरात काही लक्षणे दिसून येतात. तुम्ही कोणतीही शारीरिक हालचाल न करता अचानक हातात थोडया थोड्या वेळाने हातात वेदना होतात. या लक्षणाकडे दुर्लक्ष करू नका.
3. अचानक बेशुद्ध होणे
जेव्हा नेहमीपेक्षा हृदयाच्या गतीमध्ये बदल होतो, अशा स्थितीत व्यक्ती बेशुद्ध पडू शकते. अशी स्थिती दीर्घकाळ राहिली आणि व्यक्ती चक्कर येऊन बेशुद्ध पडत असेल, तर ही हृदयविकाराचा झटका (Cardiac Arrest ) येण्याची लक्षणे आहेत. याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.
4. श्वास घेण्यात अडचण येणे
जर तुम्हाला थोडस चालल्यानंतर श्वास घेताना धाप लागत असेल किंवा तुम्हाला झोपताना श्वास घ्यायला त्रास होत असेल तर तुम्ही तात्काळ डॉक्टरांना दाखवायला हवं. याचं कारण हे हृदय किंवा फुफ्फुसाशी संबंधित समस्या असू शकते.
5.सतत अशक्तपणा जाणवणे
कोणतेही शारीरिक कष्टाचे काम न करता तुम्हाला नेहमी थकवा आणि अशक्तपणा जाणवत असेल. यासोबत तुम्हाला सतत चक्कर येत असेल. तसेच तुमचे कोणतेही काम चांगल्या पद्धतीने करता येत नसेल आणि शरीरात सतत थकवा जाणवत असेल, तर तुम्हाला सावध व्ह्ययची आवश्यकता आहे. याचं कारण ही हृदय विकाराचा झटका येण्याची लक्षणे आहेत.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.)
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )