खोकला, घशातील खवखव दूर करण्यासाठी शंभर नंबरी उपाय; फक्त आठवडाभर करा आणि मग पाहा जादू!
Home Remedy For Sore Throat: घशामध्ये वेदना या बॅक्टेरिअल इन्फेक्शनमुळे (Bacterial Infection) होतात. अनेकदा घशाला सूजही येते.
How To Reduce Sore Throat: सध्या सातत्यानं बदलणारं हवामान डोकेदुखी ठरतंय. बदलणाऱ्या हवामानामुळे वातावरणाच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. सध्या अनेकजण सर्दी, खोकला, तापानं हैराण आहेत. सतत घशाला होणारी खवखव (Sore Throat) तर डोकेदुखी ठरतेय. घशामध्ये खवखव होण्यासोबतच बोलतानाही त्रास होतो. सारखा खोकला येतो. तसेच, सतत खवखव होत असल्यामुळे जेवताना, पाणी पितानाही घशाला त्रास आणि वेदनाही होतात.
घशामध्ये वेदना या बॅक्टेरिअल इन्फेक्शनमुळे (Bacterial Infection) होतात. अनेकदा घशाला सूजही येते. अनेकदा बाजारात मिळणारी औषधंही या घशातल्या खवखवीर फायदेशीर ठरत नाहीत. अशावेळी काही घरगुती उपाय फायदेशीर ठरतात आणि घशातील खवखवीपासून आराम देण्यासाठी मदत करतात.
मीठ आणि गरम पाणी (Salt And Hot Water)
घशात होणाऱ्या खवखवीपासून सुटका करून घेण्यासाठी मीठ आणि गरम पाणी हा उत्तम पर्याय मानला जातो. यासाठी एक ग्लास पाणी गरम करून त्यात थोडं मीठ मिश्रित करा. या पाण्याने दिवसातून दोन-तीनदा गुरळा करा. यामुळे घशातील सूज आणि वेदना कमी होण्यास मदत होईल.
लिंबू आणि गरम पाणी (Lemon And Hot Water)
एक कप गरम पाण्यामध्ये एक चमचा लिंबाचा रस आणि मध घालून ते पाणी प्यावे. यामुळे घशातील वेदना आणि सूज कमी होण्यास मदत होते.
हर्बल चहा (Herbal Tea)
मिरी, तुळस आणि लवंग यांसारखे पदार्थ घालून बनवलेला चहा हा उत्तम उपाय मानला जातो. यामुळे घशातील खवखव, वेदना आणि सूज कमी होण्यास मदत होते.
हळदीचे दूध (Turmuric Milk)
गळ्याच्या वेगवेगळ्या तक्रारींवर उपाय म्हणून हळदीचे दुध गुणकारी ठरते. यामुळे गळ्याला झालेले इन्फेक्शन दूर होतात.
मध (Honey)
मध खोकला आणि घशातील वेदना कमी होण्यासाठी उत्तम उपाय आहे. रात्री झोपण्यापूर्वी दोन चमचे मध घ्या. त्यामुळे आराम मिळेल.
(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही समस्येवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)
महत्त्वाच्या इतर बातम्या :
फक्त एकच महिना बटाट्यापासून दूर राहा अन् फरक पाहा; शरीरात दिसतील 'हे' महत्त्वाचे बदल!
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )