एक्स्प्लोर

Pets : पाळीव प्राणी ठरतायतय तुमच्या आजाराचं कारण? नवीन संशोधनात धक्कादायक खुलासा

Research : नवीन संशोधनाच्या अहवालानुसार, प्राण्यांमध्ये आढळणाऱ्या जीवाणूंद्वारे संसर्गजन्य रोग माणसांमध्ये पसरतात, असं समोर आलं आहे. या संशोधनाचा अहवाल काय सांगतो, सविस्तर जाणून घ्या.

Pets are Reason of  Illness : अलिकडे पाळीव प्राण्यांचं (Pets) प्रमाण वाढताना दिसत आहे. शहरी भागात हे प्रमाण जास्त आहे, विशेषत: कुत्रा (Dog) आणि मांजर (Cat) पाळण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. दरम्यान, पाळीव प्राणी पाळल्यामुळे संसर्गजन्य आजारांचा धोका वाढत असल्याचा दावा नवीन संशोधनात करण्यात आला आहे. एका नव्या संशोधनात दावा करण्यात आला आहे की, कुत्रा आणि मांजर या सारखे पाळीव प्राणी मानवाच्या जास्त संपर्कात असतात, त्यामुळे यांच्यामार्फत आजार पसरण्याचा धोका जास्त असतो.

पाळीव प्राणी तुमच्या आजाराचं कारण ठरत आहे का? 

गावाकडे लोक गाय, म्हैस, बकरी, मेंढी पाळतात. तर शहरी भागात कुत्रे आणि मांजरी पाळणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. यामधील एक फरक म्हणजे गावाकडील लोक गाय, म्हशी असे प्राणी पाळतात, पण त्यांची राहण्याची व्यवस्था घरापासून थोडी दूर किंवा गोठ्यामध्ये करतात. त्यांना कुत्रा किंवा मांजरीप्रमाणे अंथरुणाच जागा देत नाहीत. यामुळे अशा प्राण्यामुळे आजारपणाचा धोका कमी असतो, पण कुत्रा आणि मांजरीच्या बाबतीत हा धोका जास्त असल्याचा दावा संशोधनात करण्यात आला आहे. 

संशोधनात धक्कादायक खुलासा

शहरी भागात बहुतेक लोक कुत्रे किंवा मांजरी पाळतात. घरातील एका सदस्याप्रमाणे त्यांची काळजी घेतात, त्यांचं खाणं-पिणं याची विशेष काळजी घेतली जाते. इतकंच नाही तर कुत्रा आणि मांजरी मालकांच्या अंगा-खांद्यावर बागडतात आणि त्यांच्या अंथरुणातच झोपतात. यामुळे अशा प्राण्यांपासून रोग पसरण्याचा धोका जास्त असल्याचं या अहवालात सांगितलं गेलं आहे.

अहवालात धक्कादायक बाब समोर

नुकतेच डायसन ग्लोबल डस्टने पाळीव प्राण्यांवर संशोधन केले. या संशोधन अहवालानुसार, पाळीव प्राणी पाळणारे भारतीय लोक त्यांच्या पाळीव प्राण्यांची स्वच्छता, त्यांचे रोग आणि त्यांच्यावर आढळणारे विषाणू यांच्याबाबत खूप जागरूक असतात. पण जेव्हा पाळीव प्राणी आणि घराची दैनंदिन साफसफाईचा प्रश्न येतो, तेव्हा चारपैकी फक्त एक भारतीय याकडे प्राधान्याने पाहतो. त्यामुळे अनेकवेळा पाळीव प्राणी आधी आजारी पडतात आणि त्यानंतर हा आजार माणसात पसरतो, असं संशोधनात समोर आलं आहे.

पाळीव प्राण्यांद्वारे माणसांना संसर्ग

एमडीपीआय ओपन ऍक्सेसमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधन अहवालानुसार, प्राण्यांमध्ये आढळणाऱ्या जीवाणूंद्वारे संसर्गजन्य रोग माणसांमध्ये पसरतात. या संशोधनाच्या अहवालानुसार, बॅसिलस अँथ्रेसिस हा एक प्रकारचा जीवाणू आहे, जो प्राण्यांमध्ये घातक रोग पसरवतो. या जीवाणूचा आकार रॉडसारखा असतो.

त्यामुळे प्राण्यांमध्ये अँथ्रॅक्स नावाचा आजार पसरतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या आजाराची लागण झालेल्या प्राण्याच्या संपर्कात माणूस आल्यास हा आजार माणसालाही होतो. या संशोधनात पाळीव प्राण्यांचे केस, कोंडा आणि त्वचेच्या कणांवर संशोधन करण्यात आलं आहे. पाळीव प्राण्यांचे केस, कोंडा यामुळे प्राण्यांचे मालक आणि पाळीव प्राण्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या लहान मुलांमध्ये ऍलर्जी होण्याचा धोकाही संभवतो.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Beauty Tips : सुंदर आणि चमकदार त्वचा हवीय? 'या' कोलेजनयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tahawwur Rana : मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाचे भारतात प्रत्यार्पण करण्यास मंजुरी; अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाचे भारतात प्रत्यार्पण करण्यास मंजुरी; अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
'या' 17 धार्मिक शहरांमधील दारूची दुकाने पूर्णपणे बंद होणार; इतरत्र हलवण्यास सुद्धा परवानगी नाहीच!
'या' 17 धार्मिक शहरांमधील दारूची दुकाने पूर्णपणे बंद होणार; इतरत्र हलवण्यास सुद्धा परवानगी नाहीच!
Donald Trump Ends Birth right Citizenship : डिलीव्हरी करा, अमेरिकन व्हायचंय! ट्रम्प यांच्या निर्णयाने अमेरिकत सात ते आठ महिन्यांच्या भारतीय गर्भवती महिलांची रुग्णालयात रांग लागली
डिलीव्हरी करा, अमेरिकन व्हायचंय! ट्रम्प यांच्या निर्णयाने अमेरिकत सात ते आठ महिन्यांच्या भारतीय गर्भवती महिलांची रुग्णालयात रांग लागली
जेष्ठ साहित्यिक व निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकरांचं निधन, छत्रपती संभाजीनगरमध्ये घेतला अखेरचा श्वास
जेष्ठ साहित्यिक व निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकरांचं निधन, छत्रपती संभाजीनगरमध्ये घेतला अखेरचा श्वास
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarane Protest : मनोज जरांगेंचं सराटीत सातवं आमरण उपोषण,  सराटीत परिस्थिती काय?Narendra Chapalgaonkar Passes Away:माजी न्यायमूर्ती आणि ज्येष्ठ साहित्यिक नरेंद्र चपळगावकरांचं निधनसकाळी ८ च्या हेडलाईन्स ABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 25 January 2025Thane Station Washroom : कॉन्ट्रॅक्ट संपल्यामुळे थेट शौचालय बंद, ठाणे रेल्वे स्थानकावरील प्रकार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tahawwur Rana : मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाचे भारतात प्रत्यार्पण करण्यास मंजुरी; अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाचे भारतात प्रत्यार्पण करण्यास मंजुरी; अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
'या' 17 धार्मिक शहरांमधील दारूची दुकाने पूर्णपणे बंद होणार; इतरत्र हलवण्यास सुद्धा परवानगी नाहीच!
'या' 17 धार्मिक शहरांमधील दारूची दुकाने पूर्णपणे बंद होणार; इतरत्र हलवण्यास सुद्धा परवानगी नाहीच!
Donald Trump Ends Birth right Citizenship : डिलीव्हरी करा, अमेरिकन व्हायचंय! ट्रम्प यांच्या निर्णयाने अमेरिकत सात ते आठ महिन्यांच्या भारतीय गर्भवती महिलांची रुग्णालयात रांग लागली
डिलीव्हरी करा, अमेरिकन व्हायचंय! ट्रम्प यांच्या निर्णयाने अमेरिकत सात ते आठ महिन्यांच्या भारतीय गर्भवती महिलांची रुग्णालयात रांग लागली
जेष्ठ साहित्यिक व निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकरांचं निधन, छत्रपती संभाजीनगरमध्ये घेतला अखेरचा श्वास
जेष्ठ साहित्यिक व निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकरांचं निधन, छत्रपती संभाजीनगरमध्ये घेतला अखेरचा श्वास
Taxi -Auto Fare Hike : टॅक्सी अन् ऑटो रिक्षाची 3 रुपयांची भाडेवाढ, मूळ भाड्यानंतर प्रत्येक किलोमीटरला किती रुपये द्यावे लागणार? 
टॅक्सी अन् ऑटो रिक्षाची 3 रुपयांची भाडेवाढ, मूळ भाड्यानंतर प्रत्येक किलोमीटरला किती रुपये द्यावे लागणार? 
Walmik Karad Beed: वाल्मिक कराडची सर्व मालमत्ता जप्त करण्याच्या हालचाली, एसआयटीने डेटा काढला, कोर्टात परवानगीचा अर्ज
मोठी बातमी: वाल्मिक कराडला 'मकोका'पेक्षा मोठा झटका; एसआयटी सर्व मालमत्ता जप्त करण्याच्या तयारीत
Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पुन्हा मैदानात, अंतरवाली सराटीत आजपासून आमरण उपोषण, सरकारचं टेन्शन वाढणार?
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पुन्हा मैदानात, अंतरवाली सराटीत आजपासून आमरण उपोषण, सरकारचं टेन्शन वाढणार?
Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरुन प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, तीन दिवसांचा ब्लॉक, वाहतुकीत कोणते बदल होणार?
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरुन प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, तीन दिवसांचा ब्लॉक, वाहतुकीत कोणते बदल होणार?
Embed widget