आता सुईचा वापर न करताही देता येणार इंजेक्शन, लहान मुलांची भीती होणार नाहीशी; कसं आहे नवं तंत्रज्ञान?
Needle Free Injection technology developed : आता सुईचा वापर न करताही आता इंजेक्शन देणे शक्य होणार आहे. लहान मुलांची सुईची भीती नाहीशी करण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रात नवीन तंत्राचे अवलंब करण्यात आले आहे.

Needle Free Injection technology developed : आता सुईचा वापर न करता इंजेक्शन देणं शक्य झालं असून, वैद्यकीय क्षेत्रात हे तंत्रज्ञान क्रांती घडवणाऱ्या ठरू शकतं. लहान मुलांना विशेषतः सुईची भीती वाटत असल्याने, त्यांच्यासाठी ही पद्धत वरदान ठरणार आहे. ‘नीडल फ्री इंजेक्शन’ या नावाने ओळखली जाणारी ही नवीन प्रणाली इंट्रामस्कुलर आणि सबक्युटिनस इंजेक्शनच्या बाबतीत प्रभावी ठरत आहे. या पद्धतीत सुईचा पूर्णतः वापर टाळला जातो. त्याऐवजी औषध त्वचेखाली पाठवण्यासाठी उच्च दाबाचा वापर केला जातो. औषध थेट स्नायूंमध्ये किंवा त्वचेखाली पोहोचतं, त्यामुळे वेदना कमी होतात, सूज येत नाही आणि संसर्गाचा धोका कमी होतो.
लहान मुलांमधील सुईची भीती नाहीशी होणार, इंजेक्शन देण्याची पद्धत बदलणार
शासकीय मेडिकल रुग्णालयाचे अधीक्षक आणि बालरोगतज्ज्ञ डॉ. अविनाश गावंडे सांगतात, "ही एक क्रांतिकारी प्रणाली आहे. सुईची भीती असणाऱ्यांसाठी, विशेषतः लहान मुलांसाठी ही पद्धत अत्यंत उपयुक्त ठरते. इन्सुलिन, लसीकरण, डायलिसिससारख्या उपचारांत याचा वापर वाढतो आहे. यामुळे वेळेची बचत, सुरक्षितता आणि रुग्णांचा अनुभव अधिक सकारात्मक होतो."
नव्या तंत्रज्ञानामुळे संसर्गाचा धोका होणार कमी
ही ‘जेट इंड्यूस्ड’ तंत्रज्ञानावर आधारित प्रणाली असून, उच्च दाबामुळे औषध तब्बल 4 सेंटीमीटरपर्यंत आत शरीरात प्रवेश करते. यामध्ये सुईचाच वापर टाळल्यामुळे न केवळ टिश्यू डॅमेज होत नाही, तर आरोग्य सेवक व रुग्ण यांना संसर्ग होण्याचा धोका देखील टळतो.
कोणते इंजेक्शन नव्या पद्धतीने देता येणार नाहीत?
भारतामध्ये सहा महिन्यांपेक्षा अधिक वयाच्या मुलांवर या प्रणालीची चाचणी यशस्वीपणे पार पडली आहे. या माध्यमातून लिक्विड बेस इंजेक्शन आणि सर्व प्रकारची लस देता येते. लहान मुलांपासून ते प्रौढांपर्यंत याचा उपयोग होऊ शकतो. मात्र, ऑइल बेस्ड इंजेक्शन या तंत्राने देणं सध्या शक्य नाही. विदेशात या प्रणालीचा वापर आधीच सुरू आहे आणि मास व्हॅक्सिनेशनसाठी ही एक उत्तम व सुरक्षित पर्याय म्हणून पुढे येत आहे.
“ही पद्धत सुईशिवाय औषध देण्याची नवी दिशा दाखवते. संसर्गाचा धोका कमी करणे, सुलभता वाढवणे आणि रुग्णांचा भीतीचा अडथळा दूर करणे हे या तंत्रज्ञानाचे प्रमुख फायदे आहेत,”
— डॉ. अविनाश गावंडे, बालरोगतज्ज्ञ, अधीक्षक, शासकीय मेडिकल रुग्णालय.
इतर महत्त्वाच्या बातम्या
Kolhapur Municipal Corporation: पब्लिक फंडाचा गैरवापर एकट्या कंत्राटदारानं केला नाही, गुन्ह्यात सहाय्य करणाऱ्या मनपा अधिकाऱ्यांवरही फौजदारी करा; कोणी केली मागणी?
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )























