Men Health Tips : पुरुषांनी रोज करा 'हे' काम, वयाच्या 50 व्या वर्षीही तरुण आणि तंदुरुस्त राहा
Men Health Tips : जर तुम्हाला वयाच्या 50 व्या वर्षीही तरुण आणि तंदुरुस्त दिसायचे असेल तर तुम्ही काही सोप्या पद्धतींचा अवलंब करू शकता. कसं ते वाचा.
Men Health Tips : वाढत्या वयानुसार आपल्या विविध समस्यांचा सामना करावा लागतो. वाढत्या वयानुसार आजारांपासून (Health Tips) दूर राहून निरोगी आयुष्य जगायचे असेल तर आपण वाईट सवयी टाळल्या पाहिजेत आणि अनेक सवयी स्विकारल्या पाहिजेत. तरुण वयात आपली रोगप्रतिकारशक्ती चांगली असते, त्यामुळे अनेक आजारांपासून आपले संरक्षण होते. पण जसजसे वय वाढते तसतसे आपली रोगप्रतिकारशक्ती कमी होते, याचा परिणाम आरोग्यावर दिसू लागतो. त्यामुळे अशाच काही टिप्स शेअर जाणून घ्या ज्याचा तुमच्या शरीरासाठी फायदा होईल.
प्रत्येक पुरुषाला वयाच्या 50 व्या वर्षीही तंदुरुस्त राहायची इच्छा असते. पुरुषही यासाठी खूप मेहनत घेतात, पण अनेक जण वयाच्या आधीच म्हातारे दिसू लागतात. जर तुम्हाला वयाच्या 50 व्या वर्षीही तरुण आणि तंदुरुस्त दिसायचे असेल तर तुम्ही काही सोप्या पद्धतींचा अवलंब करू शकता.
आहार
निरोगी आरोग्यासाठी तुम्ही चांगला आहार घेणे महत्त्वाचे आहे. आहारामध्ये आहारात हिरव्या भाज्यांचा समावेश करावा. प्रोसेस्डचे सेवन टाळा. वाढत्या वयाबरोबर शरीरात पोषक तत्वांची कमतरता जाणवते. त्यामुळे तंदुरुस्त राहण्यासाठी कोणता आहार पाळला जाऊ शकतो हे तपासल्यानंतर डॉक्टरांचा आवश्यक सल्ला घ्या. जेवणात साखर, मीठ, मसाले आणि तेलाचे प्रमाण जितके कमी ठेवाल तितके चांगले. तसेच बाहेरचे अन्न खाणे टाळा. जेवणाच्या वेळा ठरवा. रात्रीचे जेवण पचनासाठी खूप हलके असावे.
वजन नियंत्रित ठेवा
जास्त वजनामुळे मधुमेह, हृदयविकार, उच्च रक्तदाब, श्वासोच्छवासाचा त्रास अशा अनेक समस्या सुरू होतात. त्यामुळे या समस्यांपासून दूर राहून निरोगी जीवन जगायचे असेल, तर आहार, योगासने, वर्कआऊटच्या माध्यमातून वजन नियंत्रणात ठेवा.
व्यायाम
वयानुसार शरीरातील चरबीही वाढते, त्यामुळे व्यायामाच्या मदतीने तुम्ही शरीरावरील नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे. दिवसभरात किमान अर्धा किंवा एक तास व्यायम करणे फार आवश्यक आहे. तुम्ही योगासने, चालणे किंवा पायऱ्या चढणे आणि उतरणे अशा सोप्या व्यायामाच्या सवयींचा अवलंब करु शकता. शरीराची हालचाल करणे फार गरजेचे आहे. शरीराची हालचाल न झाल्यास स्थूलपणा वाढतो.
पुरेशी झोप
पुरेशी झोप घेतल्याने तुमचं वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. हा सोपा पण प्रभावी उपाय आहे. दररोज सुमारे 7 ते 8 तास झोपं घेणं आवश्यक आहे. तुम्ही कितीही व्यस्त असाल तरी झोपेकडे दुर्लक्ष करू नका. किमान सहा तास किंवा त्याहून अधिक झोप शरीरासाठी आवश्यक आहे.
तणावमुक्त राहा
तंदुरुस्त आणि तरुण राहण्यासाठी तुम्ही नेहमी आनंदी राहणे महत्त्वाचे आहे. तणावमुक्त राहिल्याने शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी मदत होते.
शरीर हायड्रेटेड ठेवा
शरीर तरूण आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी तुम्ही तुमचे शरीर हायड्रेटेड ठेवणे गरजेचे आहे. पुरुषांनी दररोज किमान आठ ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. निरोगी राहण्यासाठी पुरुषांनी आपल्या आहारात सुक्या मेव्यांचा समावेश करावा.
नियमित वैद्यकिय तपासणी
वयाच्या 30 वर्षानंतर नियमित वैद्यकिय तपासणी करणे फार आवश्यक आहे. जर तुम्ही वैद्यकिय तपासणी केली तर यासाठी उशीर करू नका. नियमितपणे आरोग्य तपासणी करत रहा. जेणेकरून शरीरातील बदल, कमतरता, अतिरेक ओळखून त्यावर वेळीच उपाय करता येतील.
Disclaimer : या लेखात नमूद केलेले दावे फक्त सूचना आणि माहिती म्हणून आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा याची पुष्टी करत नाही. कोणतेही उपचार/औषध/आहार आणि सूचना लागू करण्यापूर्वी, कृपया डॉक्टरांचा किंवा संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्या.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )