Health: तुमचे मेडिकल टेस्टचे रिपोर्ट चुकीचे तर नाही ना? लॅबच रिपोर्टवर कितपत विश्वास ठेवता येईल? तज्ज्ञांकडून जाणून घ्या
Health: एखाद्या रोगाचे निदान करण्यात तसेच उपचार पद्धती ठरवण्यात लॅब रिपोर्टची भूमिका खूप महत्त्वाची असते. या रिपोर्टवर कितपत विश्वास ठेवता येईल? जाणून घ्या तज्ज्ञांकडून...
Health: आपल्याला जेव्हा एखाद्या आजाराचे निदान करायचे असेल, तेव्हा डॉक्टर आपल्याला संबंधित काही चाचण्या करायला सांगतात, जेणेकरून आपल्याला व्यवस्थित उपचार करता येतील. एखाद्या रोगाचे निदान करण्यात आणि उपचार पद्धती ठरवण्यात प्रयोगशाळेच्या अहवालांची म्हणजेच मेडिकल टेस्ट रिपोर्टची भूमिका खूप महत्त्वाची असते. पण, हे अहवाल कितपत अचूक आहेत? त्यावर कितपत विश्वास ठेवता येईल, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? नियमित रक्त तपासणी असो किंवा मोठी चाचणी असो, बहुतेक लोक प्रयोगशाळेतील अहवालांच्या परिणामांवर आंधळेपणाने विश्वास ठेवतात. परंतु, चाचणीच्या पद्धतीसह अनेक घटक आहेत, जे चाचणीच्या निकालांवर परिणाम करू शकतात. जाणून घ्या...
लॅबच्या रिपोर्ट्सवर किती विश्वास ठेवू शकता?
जीवनशैली तज्ज्ञ ल्यूक कौटिन्हो यांनी त्यांच्या पॉडकास्टच्या एका एपिसोडमध्ये आरोग्य सेवा तज्ज्ञ ध्रुव गुप्ता यांच्याशी या विषयावर तपशीलवार चर्चा केली. ल्यूकने या एपिसोडच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, तुम्ही तुमच्या लॅबच्या रिपोर्ट्सवर किती विश्वास ठेवू शकता? असा प्रश्न कधी तुमच्या मनात येतो का? खरं तर, प्रयोगशाळेच्या चाचण्यांची अचूकता, चाचणीसाठी वापरल्या जाणाऱ्या पद्धती आणि विश्वासार्ह प्रयोगशाळेशी संबंधित प्रश्न हे प्रत्येक व्यक्तीसाठी महत्वाचे आहेत, याबाबत तज्ज्ञांचे म्हणणे जाणून घेऊया.
From testing methodologies to the lab’s accreditation, there are various factors that can influence the outcomes of your medical test report. Lifestyle expert Luke Coutinho discussed this with healthcare expert Dhruv Gupta In His Podcast. https://t.co/pw4lFxeCWb
— Gaurav Pandey (@penn_gaurav_) September 27, 2024
रिपोर्टमध्ये चुका कशा होतात? काय म्हणतात डॉक्टर?
इंडियन एक्स्प्रेसमधील वृत्तानुसार, यशोदा सुपर-स्पेशालिटी हॉस्पिटल, कौशांबी येथील पॅथॉलॉजी लॅब आणि रक्तपेढीचे संचालक डॉ. सचिन रस्तोगी म्हणतात की स्वतंत्र प्रयोगशाळांमध्ये टेस्ट रिपोर्टबाबत अशी गोष्ट घडण्याची शक्यता कमीच शकते. परंतु, हॉस्पिटल-आधारित प्रयोगशाळांमध्ये असं घडण्याची शक्यता आहे, तसं पाहायला गेलं तर तिथले पॅथॉलॉजिस्ट रुग्णाचा क्लिनिकल इतिहास सहजपणे पाहू शकतात. डॉ. रस्तोगी म्हणतात की अशा प्रयोगशाळांमधील चाचण्या रुग्णाच्या क्लिनिकल स्थितीशी जोडल्या जाऊ शकतात. अशा परिस्थितीत, विश्लेषणपूर्व तपासणी करणे खूप महत्वाचे आहे.
WARNING: Fake Laboratory Report Alert!
— Faniyi Akinwale (@faniyi_akinwale) September 19, 2024
It’s crucial for patients to be vigilant and verify the authenticity of their lab reports to protect their health. Let's break down this fake report: pic.twitter.com/TSARH6mids
विश्वसनीय अहवालासाठी काय करावे?
डॉ. रस्तोगी म्हणाले की, उदाहरणार्थ, कधीकधी डिहायड्रेशनच्या बाबतीत, वाढलेले पॅरामीटर्स दिसतात, जे उपचारानंतर बरे होतात. परंतु, हा रिपोर्ट वाढलेल्या पॅरामीटर्सचा विचार करून तयार केला जातो, जो चुकीचा असू शकतो. अगदी डाइल्यूटेड किंवा क्लॉटेड सॅंपल देखील चुकीचे परिणाम देऊ शकतो. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन, चाचणी केवळ NABL (National Accreditation Board for Testing and Calibration Laboratories) द्वारे मान्यता दिलेल्या प्रयोगशाळेतच घेण्यात यावी, जेणेकरून वैद्यकीय चाचणी अहवालातील त्रुटींची शक्यता कमी करता येईल.
हेही वाचा>>>
Health: कोरोनानंतर आता वटवाघूळ पसरवतायत 'हा' विषाणू? WHO कडून अलर्ट, नवीन विषाणूची लक्षणं जाणून घ्या
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )