एक्स्प्लोर

Health Tips : काय सांगता! सिगारेटचं व्यसन नसणाऱ्यांनाही कॅन्सरचा धोका; फुफ्फुसाच्या कर्करोगाबाबत डॉक्टर काय सांगतात?

Health Tips : सिगारेट ओढणाऱ्यांमध्ये मृत्यूचे प्रमाण 15 ते 30 टक्क्यांहून अधिक असते. पण, धूम्रपान न करता केवळ धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीच्या सानिध्यात राहून देखील कॅन्सरचा धोका कायम असतो.

पुणे : जगभरात नोव्हेंबर महिना हा 'फुफ्फुसाचा कर्करोग जागृती महिना' (Lung Cancer Awairness Month) म्हणून पाळला जातो. धूम्रपान (Smoking) हे आरोग्यासाठी किती घातक आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. धूम्रपानाच्या सेवनाने फुफ्फुसाचा कॅन्सर हे एक प्रमुख कारण मानले जाते. फुफ्फुसाच्या कर्करोगाने दगावणारे अंदाजे 80 टक्के रुग्ण हे धूम्रपान करणारेच असतात. सिगारेट ओढणाऱ्यांमध्ये मृत्यूचे प्रमाण 15 ते 30 टक्क्यांहून अधिक असते. पण, तुम्हाला माहीत आहे का धूम्रपान न करता केवळ धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीच्या सानिध्यात राहून देखील कॅन्सरचा धोका कायम असतो. कारण धूम्रपान न करणाऱ्या व्यक्तीच्या शरीरात देखील थेट तंबाखूचा धूर जात असतो. एका सर्वेक्षणानुसार जगातील प्रत्येक चौथी व्यक्ती दुसऱ्याने केलेल्या धूम्रपानाचा बळी ठरतेय.

जगभरात कर्करोगाचा वाढता धोका...

ग्लोबोकॉनच्या-2018’च्या अहवालानुसार, जगभरात 2018 मध्ये 18.1 मिलियन नव्या कर्करोग रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 9.6 मिलियन रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये फुफ्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण 11.6 टक्के आहे जे सर्वाधिक आहे. या रोगाच्या मृत्यूचे प्रमाणही सर्वाधिक, 18.4 टक्के आहे. पहिल्या टप्प्यात हा कर्करोग फुफ्फुसांमध्ये आढळतो. पण, शरीराच्या इतर भागांमध्ये पसरत नाही. सुरुवातीच्या टप्प्यात उपचार केल्याने रुग्णांमध्ये मृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. दुसऱ्या टप्प्यात, लिम्फ नोड्ससह फुफ्फुसांमध्ये हा कर्करोग पसरल्याचे दिसून येतो. 

याच संदर्भात पुण्याचे मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट, टीजीएच-आँन्को लाईफ कँन्सर सेंटरचे डॉ. रविकुमार वाटेगावकर सांगतात की, फुफ्फुसाच्या कर्करोगाचे एकदा निदान झाल्यावर, या रोगाचा प्रसार किती झाला हे शोधणे महत्वाचे असते. यासाठी, फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या अवस्थेचे मूल्यांकन केले जाते आणि हा रोग कोणत्या टप्प्यात आहे, हे लक्षात आल्यावर त्यावर उपचार करता येतात. कर्करोगाचा प्रकार, ट्यूमरचा आकार, तो किती प्रमाणात पसरला आणि रुग्णाची स्थिती यावर हे उपचार अवलंबून असतात.

फुफ्फुसाच्या कर्करोगाचे दोन प्रकार

डॉ. वाटेगावकर पुढे सांगतात की, फुफ्फुसाच्या कर्करोगाची दोन प्रकारे विभागणी करण्यात येते. ‘स्मॉल सेल’ आणि ‘नॉन-स्मॉल सेल’ फुफ्फुसांचा कर्करोग. नॉन-स्मॉल सेल’ फुफ्फुस कर्करोगाचे चार मुख्य टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यात कर्करोग फुफ्फुसात आढळतो. परंतु तो फुफ्फुसांच्या बाहेर पसरत नाही. कर्करोग फुफ्फुसात आणि जवळच्या नोड्समध्ये आढळतो, तेव्हा त्यास दुसरा टप्पा असे म्हटले जाते आणि जेव्हा कर्करोग छातीच्या मध्यभागी फुफ्फुसात आणि ‘लिम्फ नोड्स’मध्ये असतो, तेव्हा त्याला तिसरा टप्पा म्हणतात. शेवटच्या, म्हणजे चौथ्या टप्प्यात कर्करोग दोन्ही फुफ्फुसांमध्ये, फुफ्फुसांच्या आसपासच्या अवयवांमध्ये पसरतो.

स्मॉल सेल’ फुफ्फुसांच्या कर्करोगाचे दोन प्रमुख टप्पे आहेत. कर्करोग फक्त एका फुफ्फुसात किंवा त्याच बाजूच्या जवळच्या ‘लिम्फ नोड्स’मध्ये मर्यादित प्रमाणात आढळतो. तर, विस्तृत टप्प्यात, कर्करोगाचा प्रसार हा एका फुफ्फुसात संपूर्णपणे, तसेच उलट बाजूच्या फुफ्फुसात, उलट बाजूच्या ‘लिम्फ नोड्स’पर्यंत, फुफ्फुस द्रवापर्यंत आणि दूरच्या अवयवांमध्ये आणि ‘बोन मॅरो’मध्ये होतो.

पहिल्या टप्प्यात असलेला ‘नॉन-स्मॉल सेल’ फुफ्फुसाचा कर्करोग आढळल्यास, शस्त्रक्रिया हाच एकमेव उपचार करावा लागतो. त्यामध्ये फुफ्फुस आणि ‘लिम्फ नोड्स’चा प्रभावित झालेला भाग काढून टाकण्यात येतो. दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात असलेल्या कर्करोगासाठी शस्त्रक्रिया, रेडिएशन, केमोथेरपी हे उपचार करण्याची आवश्यकता निर्माण होते. तसेच शस्त्रक्रियेतही फुफ्फुसाचा कर्करोगग्रस्त भाग किंवा संपूर्ण फुफ्फुस आणि लिम्फ नोड्स हे भाग काढून टाकावे लागतात. तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातील कर्करोगासाठी अन्य उपचार करणे अतिशय अवघड असते, तेथे इम्युनोथेरपी आणि लक्ष्यित उपचारपद्धतीचा वापर करण्यात येतो.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 

महत्त्वाच्या बातम्या :

Health Tips : वायू प्रदूषणाचा मानसिक आरोग्यावरही वाईट परिणाम होतो; तणाव, चिंता, नैराश्य वाढण्याची भीती

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gondia Crime : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
Shitanshu Kotak Batting Coach : टीम इंडियाला नवा बॅटिंग कोच मिळाला, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपासूनच जबाबदारी सांभाळणार!
टीम इंडियाला नवा बॅटिंग कोच मिळाला, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपासूनच जबाबदारी सांभाळणार!
Raju Shetti on Almatti Dam : अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाला स्थगिती द्या; राजू शेट्टींची केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडे मागणी
अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाला स्थगिती द्या; राजू शेट्टींची केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडे मागणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Health Update | जखमेमुळे पॅरालिसिसचा धोका होता, सैफ अली खानवर सर्जरी करणारे डॉक्टर EXCLUSIVEABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 7PM 16 January 2025ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6PM 16 January 2025Saif Ali Khan Attacked Criminal CCTV : सैफ अली खानवर चाकू हल्ला करणारा आराेपी सीसीटीव्हीत कैद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gondia Crime : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
Shitanshu Kotak Batting Coach : टीम इंडियाला नवा बॅटिंग कोच मिळाला, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपासूनच जबाबदारी सांभाळणार!
टीम इंडियाला नवा बॅटिंग कोच मिळाला, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपासूनच जबाबदारी सांभाळणार!
Raju Shetti on Almatti Dam : अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाला स्थगिती द्या; राजू शेट्टींची केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडे मागणी
अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाला स्थगिती द्या; राजू शेट्टींची केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडे मागणी
ती माझी बहीण, व्हिडिओ-फिडिओ काही नाही; धस म्हणाले, मी धुतल्या तांदळासारखं आयुष्य जगलोय
ती माझी बहीण, व्हिडिओ-फिडिओ काही नाही; धस म्हणाले, मी धुतल्या तांदळासारखं आयुष्य जगलोय
Buldhana Hair Loss : वातावरणातील विषारी घटकामुळे शेगाव तालुक्यात केस गळती, ICMR पथकातील संशोधकांचा प्राथमिक अंदाज
वातावरणातील विषारी घटकामुळे शेगाव तालुक्यात केस गळती, ICMR पथकातील संशोधकांचा प्राथमिक अंदाज
Amit Shah Video : जेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह थेट आयसीसी चेअरमन जय शाहांवर भडकतात!
Video : जेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह थेट आयसीसी चेअरमन जय शाहांवर भडकतात!
Video : सडपातळ बांधा, अंगात टी-शर्ट, पाठीवर बॅग; सैफवर हल्ला करणारा आरोपी कॅमेऱ्यात कैद, फोटो समोर
Video : सडपातळ बांधा, अंगात टी-शर्ट, पाठीवर बॅग; सैफवर हल्ला करणारा आरोपी कॅमेऱ्यात कैद, फोटो समोर
Embed widget