Health Tips : घातक निपाह व्हायरसपासून संरक्षण कसं कराल? रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी 'या' टिप्स फॉलो करा
Nipah Virus : निपाह विषाणूवर कोणताही इलाज नसला तरी, निरोगी आहाराचे पालन करून, नियमित व्यायाम करणं गरजेचं आहे.
Nipah Virus : केरळमध्ये निपाह विषाणूच्या (Nipah Virus) केसेस वेगाने पसरत आहेत. आतापर्यंत 6 जणांना या विषाणूची लागण झाली आहे. तर, दोन जणांचा या विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. निपाह व्हायरस हा प्राणी आणि पक्ष्यांमुळे पसरणारा व्हायरस आहे. हा व्हायरस प्राण्यांपासून मानवांमध्ये प्रसारित तर होतोच पण माणसाकडून माणसांमध्ये देखील हा विषाणू पसरतो. निपाह व्हायरस विरुद्ध प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी काही उपाय आहेत ते फॉलो करा,
निपाह विषाणूवर कोणताही इलाज नसला तरी, निरोगी आहाराचे पालन करून, नियमित व्यायाम करून आणि वारंवार हात धुणे यासारख्या चांगल्या स्वच्छतेचा सराव करून रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपाय केले पाहिजेत.
1. योग्य स्वच्छता राखा
निपाह व्हायरसपासून स्वत:चं संरक्षण करण्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे ती म्हणजे स्वच्छता. यासाठी कमीत कमी 20 सेकंद साबणाने आणि पाण्याने वारंवार हात धुवा.
संक्रमित व्यक्तींशी जवळचा संपर्क टाळा, विशेषत: ज्यांची लक्षणं दिसतायत अशा लोकांपासून दूर राहा.
2. मास्क वापरा
जर तुम्ही संक्रमित व्यक्तीच्या जवळच्या संपर्कात असाल तर, मास्क आणि हॅन्ड ग्लोव्ह्जचा वापर करा. तसेच, प्राण्यांच्या आणि माणसांच्या संपर्कात येणं टाळा.
3. हायजिन पाळा
अनेकजण फळांचं सेवन तर करतात. पण, योग्य हायजिन पाळत नाहीत. यासाठी कोणत्याही फळाचं, भाज्यांचं सेवन करण्याआधी त्या नीट स्वच्छ धुतल्या पाहिजेत. आणि मगच त्याचं सेवन केलं पाहिजे. भाज्या योग्य शिजवून घ्या.
4. निरोगी आहार ठेवा
तुम्हाला व्हायरसपासून दूर राहायचं असेल तर निरोगी आहाराचं सेवन करणं गरजेचं आहे. यासाठी फळे, भाज्या, संपूर्ण धान्य आणि प्रथिने यांचा तुमच्या आहारात समावेश करावा. संतुलित आहार घ्या. जीवनसत्त्वे आणि खनिजे, विशेषत: व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन डी आणि जस्त अशा पदार्थांचा आहारात समावेश करा.
5. हायड्रेटेड रहा
निरोगी जीवनशैलीसाठी हायड्रेडेट असणं फार गरजेचं आहे. यासाठी दिवसातून किमान 2-3 लीटर पाण्याचं सेवन करा. कारण यामुळे तुमची रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होते.
6. पुरेशी झोप घ्या
तुमची रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी फक्त पुरेसा पौष्टिक आणि निरोगी आहारच गरजेचा नाही तर त्याचबरोबर पुरेशी झोप घेणं देखील तितकंच गरजेचं आहे. रोज किमान 6-8 तासांची झोप घेणं महत्त्वाचं आहे.
7. स्ट्रेस मॅनेजमेंट गरजेचं
मानसिक तणावात तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ शकते. यासाठी शरीराला योग्य शिस्त लावणं गरजेचं आहे. यासाठी ध्यान, योग, दीर्घ श्वास, प्राणायाम यांसारखे व्यायाम करत राहा. आणि मानसिक तणावापासून मुक्त व्हा.
8. धूम्रपान टाळा आणि अल्कोहोलचं मर्यादित सेवन करा
धुम्रपान आणि जास्त मद्यपान केल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ शकते, म्हणून ते टाळणे किंवा ते कमी प्रमाणात त्याचं सेवन करणं गरजेचं आहे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )