Health Tips : आयव्हीएफ करताय का? मग महत्त्वाच्या टिप्स नक्की फॉलो करा
Health Tips : महिलांमध्ये वंध्यत्वाची समस्या ही हार्मोनल असंतुलन, पीसीओएस, ब्लॉक झालेल्या फॅलोपियन ट्यूब किंवा अंड्यांची गुणवत्ता खराब होण्यासारख्या समस्यांमुळे होऊ शकते.

Health Tips : तुम्हाला माहित आहे का? आहार, व्यायाम, झोप आणि ताण यांसारख्या जीवनशैलीतील घटकांमध्ये सुधारणा केल्याने आयव्हीएफ (IVF) उपचार सुरू करण्यापूर्वी देखील प्रजनन आरोग्य सुधारु शकते. याच संदर्भात नवी मुंबईच्या वरिष्ठ स्त्रीरोगत व वंधत्व निवारण तज्ज्ञ, मेडिकव्हर हॉस्पिटल्स, खारघरच्या डॉ. अनुरंजिता पल्लवी यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
महिलांमध्ये वंध्यत्वाची समस्या ही हार्मोनल असंतुलन, पीसीओएस, ब्लॉक झालेल्या फॅलोपियन ट्यूब किंवा अंड्यांची गुणवत्ता खराब होण्यासारख्या समस्यांमुळे होऊ शकते. पुरुषांमध्ये वंधत्वाची समस्या ही शुक्राणूंची संख्या कमी होणे, त्यांची गतिशीलता कमी होणे किंवा हार्मोनल समस्या ही त्यामागची कारणे आहेत. तथापि, अनेक जोडपी यशस्वीरित्या गर्भधारणा करण्यासाठी एआरटीचा पर्याय निवडतात. जेव्हा एखादं जोडपं आयव्हीएफ (इन व्हिट्रो फर्टिलायझेशन) ची योजना आखतात तेव्हा त्यांनी जीवनशैलीतील बदलांकडे देखील तितकेच लक्ष दिले पाहिजे. हे समजून घ्या की जीवनशैली प्रजनन आरोग्यात मोठी भूमिका बजावते आणि आयव्हीएफच्या यशावर परिणाम करू शकते. कमी झोप किंवा जास्त ताण यासारख्या सवयी देखील हार्मोनल संतुलन बिघडवू शकतात, अंडी आणि शुक्राणूंच्या गुणवत्तेवर परिणाम करू शकतात आणि गर्भधारणेची शक्यता कमी करू शकतात. निरोगी जीवनशैली द्वारे शरीराची तयारी केल्याने आयव्हीएफ प्रक्रिया अधिक सुरळीत होऊन यशाचा दर देखील वाढतो .
जीवनशैलीचा प्रजनन क्षमतेवर कसा परिणाम होतो?
- खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे जसे की जीवनसत्त्व आणि खनिजांची कमतरता यामुळे हार्मोनल असंतुलन होऊ शकते.
- शारीरिक हालचालींच्या अभावाने वजन वाढण्याची आणि इन्सुलिन प्रतिरोधकतेची शक्यता वाढवू शकतो, ज्यामुळे ओव्हुलेशनवर परिणाम होतो.
- धूम्रपान आणि अल्कोहोलमुळे अंडी आणि शुक्राणूंची गुणवत्ता कमी होते आणि प्रजनन क्षमता खराब होऊ शकते.
- तणाव हा ओव्हुलेशन आणि इम्प्लांटेशनसाठी आवश्यक असलेल्या हार्मोनल सिग्नलमध्ये व्यत्यय आणतो आणि गर्भधारणा साध्य करणे अधिक आव्हानात्मक ठरते.
- अपुऱ्या झोपेमुळे शरीराची नैसर्गिक प्रजनन लय बिघडते.
आयव्हीएफचे नियोजन करण्यापूर्वी अशी करा तयारी :
आयव्हीएफ उपचार घेत असलेल्यांनी संतुलित आहाराचे सेवन करावे, ताजी फळे, भाज्या, तृणधान्य आणि हेल्दी फॅट्सची निवड करावी. योग्य वजन राखणे गरजेचे आहे, कारण कमी वजन आणि जास्त वजन अशा दोन्ही परिस्थिती प्रजनन क्षमतेवर परिणाम करतात. धूम्रपान, अल्कोहोल आणि स्वमर्जीने औषधांचे सेवन करणे टाळा, न चुकता व्यायाम करा, जे हार्मोन नियमनात मदत करू शकताच आणि मूड स्विग्ज सुधारू शकतात. हार्मोनल संतुलन राखण्यासाठी दररोज किमीन 7 ते 8 तासांची शांत झोप घ्या. योग आणि ध्यानाच्या मदतीने तणावाची पातळी कमी करा, तज्ञांच्या सल्ल्यानुसार व्हिटॅमिन सप्लिमेंट्स चे सेवन करा, कॅफिन युक्त पदार्थांचे सेवन कमी करा, थायरॉईडचे नियंत्रणात ठेवा, उच्च रक्तदाब, रक्तातील साखर आणि कोलेस्टेरॉलची पातळी व्यवस्थापित करा. लक्षात ठेवा की आयव्हीएफ प्रक्रियेतून जाताना हे छोटे छोटे बदल खूप मदत करू शकतात. म्हणूनच जोडप्यांनी आवश्यक ती सावधगिरी बाळगली पाहिजे आणि तज्ञांनी दिलेल्या आवश्यक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले पाहिजे.
हे ही वाचा :
पावसाळ्यात पाठदुखी अन् सांधेदुखीनं डोकं वर काढलंय? डॉक्टरांनी दिलेल्या 'या' सोप्या टीप्स नक्की वाचा
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )























