Health Tips : अनोशापोटी 'हे' पदार्थ खाणं टाळाच; नाहीतर पश्चाताप करण्याची वेळ येईल
Good Health Tips : अनोशापोटी काही गोष्टींचं सेवन करणं आरोग्यासाठी अपायकारक ठरतं. जाणून घेऊयात अशा पदार्थांबाबत सविस्तर...
Good Health Tips : घरातील मोठी माणसं नेहमीच आपल्याला अनेक सल्ले देतात. अनेकदा आपल्याला सांगितलं जातं की, अनोशापोटी राहू नका. बराच काळ उपाशी राहिल्यानं अॅसिडिटी, पोटदुखी, मळमळ आणि उलटी यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे घरातील मोठ्या माणसांपासून अगदी तज्ज्ञांपर्यंत सकाळी पोटभर नाश्ता करण्याचा सल्ला देण्यात येतो. पण सध्याच्या धकाधकीच्या जगात आपल्याला आरोग्याची नीट काळजी घेता येत नाही. बऱ्याचदा कामाच्या ताणामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होतं. एवढंच नाहीतर नाश्ता करायलाही वेळ मिळत नाही. पण असं करणं आरोग्यासाठी खरंच अत्यंत अपायकारक ठरतं. यामुळे मोठ्या प्रमाणावर शरीराची हानी होते. अशातच आज आम्ही तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहोत. आज आम्ही अनोशापोटी कोणत्या गोष्टी खाऊ नयेत, याबाबत सांगणार आहोत.
मद्यपान करणं टाळावं (Liquor) :
जर तुम्ही काहीच खाल्लं नसेल तर अनोशापोटी मद्यपान करणं टाळावं. अनोशापोटी मद्यपान केल्यानं मद्य थेट रक्तात मिसळतं. तसेच अनोशापोटी मद्यपान केल्यानं पल्स रेट कमी होतात आणि ब्लड प्रेशर कमी-जास्त होतं. त्यामुळे चुकूनही अनोशापोटी मद्यपान करु नये.
च्युईंगम चघळू नये (Chewing Gum) :
अनोशापोटी च्युईंगम चघळणं आरोग्यासाठी अपायकारक ठरतं. असं म्हटलं जातं की, चावणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. जसं एखादी व्यक्ती च्युईंगम चघळण्यास सुरुवात करते, त्यावेळी आपल्या पोटात डायजेस्टिव्ह अॅसिड तयार होण्यास सुरुवात होते. पण अनोशापोटी काही चघळण्यानं किंवा चावल्यानं तयार होणारं डायजेस्टिव अॅसिड अॅसिडिटी किंवा अल्सर यांसारख्या अनेक समस्यांसाठी कारणीभूत कारणीभूत ठरु शकतं. त्यामुळे शक्यतो अनोशापोटी च्युईंगम चघळणं किंवा चावणं टाळाणंच फायदेशीर ठरतं.
कॉफी पिणं टाळा (Coffee) :
चहा प्रमाणेच कॉफीही अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय. पण काही वेळी ही कॉफी शरीरासाठी घातक ठरते. जर तुम्ही अनोशापोटी कॉफी पित असाल, तर मात्र वेळीच असं करणं थांबवा. अनोशापोटी कॉफी पिणं अॅसिडिटीचं कारण ठरु शकतं. कॉफीमधील घटक पोटातील हायड्रोक्लोरिक अॅसिड वाढवतात त्यामुळे अनोशापोटी कधीही कॉफी पिणं टाळावं.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Health Care Tips : हिवाळ्यात सुस्तपणा घालवण्यासाठी आहारात 'या' पदार्थांचा समावेश करा
- Health Care Tips : शाकाहारी असल्यामुळे प्रोटीनची कमतरता जाणवतेय? 'हा' आहे उपाय
- बनावट औषधांचा सुळसुळाट; FDA म्हणतं काळजी घ्या, पण बनावट औषधे ओळखायची कशी?
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )