Health: फोनचं व्यसन 'असं' पडेल महागात, थेट शुक्राणूंवर होईल परिणाम, मोबाईल आणि मूल न होण्याचा संबंध काय? तज्ज्ञांकडून कारण जाणून घ्या ...
Health: आरोग्य तज्ज्ञ सांगतात, 'फोनच्या व्यसनामुळे व्यक्तीच्या शुक्राणूवर गंभीर परिणाम होतोय. ज्यामुळे मूल न होण्याची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होतेय.''
Health: आजकाल स्मार्टफोन हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. आज इंटरनेटच्या जमान्यात माणूस तासन्तास सोशल मीडियावर घालवत आहे. अनेकांना तर दर 5-5 मिनीटाला फोनवर रिल्स स्क्रोल करण्याची सवय जडलीय. तर काही लोकांना या मोबाईलमुळे कशाचेही भान राहत नाही. मोबाईलचं हे व्यसन तुम्हाला गंभीर आरोग्याकडे ढकलत आहे. आरोग्य तज्ज्ञ सांगतात. याच फोनच्या व्यसनामुळे व्यक्तीच्या शुक्राणूवर गंभीर परिणाम होतोय. ज्यामुळे मूल न होण्याची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होतेय.
पालक होऊ न शकण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे...
प्रख्यात IVF विशेषज्ञ डॉ. नेहा प्रियदर्शिनी यांनी यासंदर्भात महत्त्वाची माहिती दिलीय. त्या म्हणतात, पुरुषांमध्ये शुक्राणूंच्या कमतरतेशी संबंधित समस्या आणि त्यावरील उपाय याविषयी महत्त्वाची माहिती देताना ते म्हणाले की, पालक होऊ न शकण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे पुरुषांच्या वीर्यातील शुक्राणूंची कमतरता. अनेक जीवनशैली आणि पर्यावरणीय कारणांमुळे ही समस्या उद्भवत असल्याचे त्यांनी सांगितले. जास्त ताण, झोप न लागणे, दारू, तंबाखू, विडी, सिगारेटचे सेवन करणाऱ्या पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी होते. याशिवाय मोबाईल रेडिएशनच्या संपर्कात जास्त वेळ घालवल्याने शुक्राणूंची गुणवत्ता आणि संख्या यावरही परिणाम होतो.
दारूची सवय त्वरित सोडून द्या..
डॉक्टरांनी सांगितले की जर पुरुषांना शुक्राणूंची संख्या वाढवायची असेल तर सर्वप्रथम त्यांना या वाईट सवयी सोडून द्याव्या लागतील. अल्कोहोल आणि तंबाखू सारख्या पदार्थांचे सेवन पूर्णपणे बंद करणे आणि आपली जीवनशैली सुधारणे खूप महत्वाचे आहे. संतुलित आहार आणि नियमित व्यायाम हे शुक्राणूंची संख्या वाढवण्यात महत्त्वाचे योगदान असल्याचेही त्यांनी सांगितले.
पौष्टिक अन्न खूप महत्वाचे
डॉ. नेहाच्या मते, हिरव्या भाज्या, ताजी फळे, प्रथिनेयुक्त आहार यांसारख्या पौष्टिक आहाराचे सेवन शुक्राणू निर्मितीसाठी उपयुक्त ठरते. यासोबतच रोजचा व्यायाम आणि तणावमुक्त जीवनशैलीचा अवलंब केल्याने शुक्राणूंची गुणवत्ता सुधारते. शुक्राणूंना तुमच्या जीवनात अत्यंत महत्त्व आहे, कारण त्यांच्याशिवाय तुम्हाला पालक बनण्याचा आनंद मिळू शकत नाही यावर त्यांनी भर दिला.
वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या
एखाद्या जोडप्याला मूल होणे अशक्य असेल तर त्यांनी वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा आणि आपल्या सवयी आणि जीवनशैलीत सकारात्मक बदल घडवून आणावा असा संदेश डॉक्टरांनी दिला. तुमच्या जीवनशैलीतील छोटे बदल तुमच्या आयुष्यात खूप आनंद आणू शकतात.
हेही वाचा>>>
Men Health: पुरुषांनो...तुमच्यातील व्हिटॅमिन्सची कमतरता 'अशी' दूर करा, अन्यथा शुक्राणूंवर होईल परिणाम
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )